Women’s Asia Cup 2024 : भारत श्रीलंका आशिया कप अंतिम सामना कुठे आणि कसा पाहता येईल? जाणून घ्या
वुमन्स आशिया कप स्पर्धेच्या अंतिम भारत आणि श्रीलंका यांच्यात सामना होणार आहे. या स्पर्धेत दोन्ही संघांचा वरचष्मा पाहायला मिळाला आहे. एकही सामना न गमवता दोन्ही संघांनी अंतिम फेरी गाठली आहे. त्यामुळे अंतिम फेरीची लढत चुरशीची होणार यात शंका नाही.
वुमन्स आशिया कप 2024 स्पर्धेच्या अंतिम फेरीत रविवारी भारत आणि श्रीलंका यांच्यात लढत होणार आहे. जेतेपदासाठी होणारी लढत चुरशीची होणार यात शंका नाही. कारण दोन्ही संघांनी या स्पर्धेत एकही सामना गमावलेला नाही. भारताने साखळी फेरीत पाकिस्तान, संयुक्त अरब अमिराती, नेपाळ आणि उपांत्य फेरीत बांगलादेशला पराभूत केलं. दुसरीकडे, श्रीलंकेची कामगिरीही तशीच राहिली आहे. श्रीलंकेने बांग्लादेश, मलेशिया, थायलंड आणि उपांत्य फेरीत पाकिस्तानला पराभूत केलं आहे. त्यामुळे अंतिम सामन्यात कोण वरचढ ठरणार याची उत्सुकता आहे. दुसरीकडे, भारत आणि श्रीलंका हे 24 वेळा आमनेसामने आले आहेत. या सामन्यात भारताची बाजू वरचढ राहिली आहे. भारताने 19, तर श्रीलंकेने 4 सामने जिंकले आहेत. तर एक सामना निकालाविना संपला. त्यामुळे भारताचं पारडं जरी जड असलं तरी श्रीलंकेला कमी समजणं महागात पडू शकते. चमिरा अट्टापट्टू जबरदस्त फॉर्मात आहे. मागच्या सामन्यातील तिची खेळी पाहून याचा अंदाज येतो.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील महिला आशिया कप स्पर्धेतील अंतिम सामना कधी होणार?
28 जुलै रोजी भारत आणि श्रीलंका यांच्यात महिला आशिया कप अंतिम सामना होणार आहे.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील वुमन्स आशिया कप अंतिम सामना कुठे होणार आहे?
भारत आणि श्रीलंका यांच्यातील महिला आशिया चषकाचा अंतिम सामना श्रीलंकेतील डंबुला आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील हाय व्होल्टेज सामना किती वाजता सुरू होईल?
भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरू होईल.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामन्याचे थेट प्रक्षेपण कोणत्या वाहिनीवर पाहता येईल?
भारत आणि श्रीलंका यांच्यातील महिला आशिया कप फायनलचे लाईव्ह कव्हरेज स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येईल.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामना कोणत्या एप्लिकेशनवर ऑनलाइन पाहता येईल?
भारत आणि श्रीलंका यांच्यातील महिला आशिया कप फायनल डिस्ने + हॉटस्टार ॲपवर ऑनलाइन पाहता येईल.