IND vs PAK: टीम इंडियाने पाकिस्तानला गुंडाळलं, विजयासाठी 109 धावांचं आव्हान
WIndia vs WPakistan: टीम इंडियाने पाकिस्तानला पूर्ण 20 ओव्हर खेळू दिलेलं नाहीय. पाकिस्तानचा डाव हा 19.2 ओव्हरमध्ये आटोपला.
वूमन्स आशिया कप 2024 स्पर्धेतील दुसर्या सामन्यात टीम इंडियाने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला गुंडाळलं आहे. पाकिस्तानला टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर 20 ओव्हरही खेळता आलं नाही. पाकिस्तानने 19.2 ओव्हरमध्ये ऑलआऊट 108 धावा केल्या. त्यामुळे आता टीम इंडियाला विजयासाठी 109 धावांचं आव्हान मिळालं आहे. आता पाकिस्तान या स्पर्धेत विजयी सलामी देणार की टीम इंडिया शेजाऱ्यांविरुद्ध या स्पर्धेतील सहावा विजय मिळवणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
पाकिस्तानची बॅटिंग
पाकिस्तानने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. मात्र त्यांना अपेक्षित धावासंख्या उभारण्यात यश आलं नाही. पाकिस्तानकडून केवळ तिघांनाच दुहेरी आकडा गाठता आला. तिघांना भोपळाही फोडता आला नाही. तर चौघांना दुहेरी धावसंख्या करण्याआधीच भारतीय गोलंदाजांनी रोखलं. पाकिस्तानसाठी सिद्रा अमीन हीने 35 चेंडूंमध्ये 3 चौकारांच्या मदतीने 25 धावा केल्या. तर तुबा हसान आणि फातिम सामना या दोघींनी प्रत्येकी 22 धावा केल्या. तुबा हसान हीने 19 बॉलमध्ये 3 फोरसह 22 रन्स केल्या. तर फातिमा सना हीने 16 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 1 फोरसह नॉट आऊट 22 धावांची खेळी केली. त्यामुळे पाकिस्तानला 100 पार मजल मारता आली. तर गुल फिरोजा, आलिया रियाज, कॅप्टन निदा दार आणि सईदा शाह या चौघींना दुहेरी आकडाही पार करता आला नाही.
टीम इंडियाकडून एकूण 5 जणींनी बॉलिंग केली. त्यापैकी राधा यादव हीचा अपवाद वगळता इतर सर्वांनी विकेट्स घेतल्या. दीप्ती शर्मा हीने 4 ओव्हरमध्ये 20 धावांच्या मोबदल्यात 3 विकेट्स घेतल्या. तर रेणुका सिंह, पूजा वस्त्राकर आणि श्रेयंका पाटील या तिघींनी 2-2 विकेट्स घेतल्या. राधा यादव हीला विकेट घेता आली नाही, मात्र तिने सईदा शाह हीला रन आऊट केलं.
पाकिस्तानचं 108 धावांवर पॅकअप
Innings Break!
Superb bowling performance from #TeamIndia! 👌 👌
3⃣ wickets for @Deepti_Sharma06 2⃣ wickets each for Renuka Singh Thakur, @shreyanka_patil & @Vastrakarp25
Stay Tuned for our chase! ⌛️
Scorecard ▶️ https://t.co/30wNRZNiBJ#WomensAsiaCup2024 | #ACC | #INDvPAK pic.twitter.com/dEakxdXiUX
— BCCI Women (@BCCIWomen) July 19, 2024
टीम इंडिया वूमन्स प्लेइंग ईलेव्हन: हरमनप्रीत कौर (कॅप्टन), स्मृती मंधाना, शफाली वर्मा, दयालन हेमलता, जेमिमा रॉड्रिग्स, रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, राधा यादव, श्रेयंका पाटील आणि रेणुका ठाकूर सिंग.
पाकिस्तान वूमन्स प्लेइंग ईलेव्हन: निदा दार (कॅप्टन), सिद्रा अमीन, गुल फिरोजा, मुनीबा अली (विकेटकीपर), आलिया रियाझ, इरम जावेद, फातिमा सना, तुबा हसन, सादिया इक्बाल, नशरा संधू आणि सय्यदा आरूब शाह.