PAKW vs NEPW: पाकिस्तानचा करो या मरो सामन्यात विजय, नेपाळवर 9 विकेट्सने मात

Pakistan Women vs Nepal Women Match Result: पाकिस्तानने नेपाळवर 9 विकेट्सने विजय मिळवला आहे. पाकिस्तानने या विजयासह स्पर्धेतील आव्हान कायम राखलं आहे.

PAKW vs NEPW: पाकिस्तानचा करो या मरो सामन्यात विजय, नेपाळवर 9 विकेट्सने मात
pakistan womensImage Credit source: acc x account
Follow us
| Updated on: Jul 21, 2024 | 11:49 PM

वूम्नस आशिया कप 2024 स्पर्धेतील 6 व्या सामन्यात पाकिस्तानने नेपाळवर 9 विकेट्सने विजय मिळवला आहे. पाकिस्तानला पहिल्या सामन्यात टीम इंडियाकडून पराभूत व्हावं लागलं होतं. त्यामुळे पाकिस्तानसाठी नेपाळ विरुद्धचा सामना हा ‘करो या मरो’ असा होता. मात्र या सामन्यात पाकिस्तानने नेपाळला लोळवत आव्हान कायम ठेवलं आहे. नेपाळने पाकिस्तानला विजयासाठी 109 धावांचं आव्हान दिलं होतं. पाकिस्तानने या धावा 11.5 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून पूर्ण केल्या. पाकिस्तानचा हा या स्पर्धेतील पहिला विजय ठरला.

पाकिस्तानची बॅटिंग

गुल फिरोजा आणि मुनिबा अली या सलामी जोडीने 105 धावांची भागीदारी केली. गुल फिरोजाने 35 बॉलमध्ये 10 चौकारांसह 57 धावांची खेळी केली. त्यानंतर तुबा हसन आणि मनुबी अली या जोडीने पाकिस्तानला विजयापर्यंत पोहचवलं. मुनीबाने 34 चेंडूत 8 चौकारांसह नाबद 46 धावांची खेळी केली. तर नेपाळकडून कबिता जोशी हीने एकमेव विकट घेतली.

पाकिस्तानच्या सलामी जोडीची शतकी भागीदारी

नेपाळची बॅटिंग

दरम्यान त्याआधी पाकिस्तानने टॉस जिंकून नेपाळला बॅटिंगसाठी भाग पाडलं. नेपाळने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 108 धावा केल्या. नेपाळकडून कबिता जोशी हीने सर्वाधिक आणि नाबाद 31 धावांची खेळी केली. सिता मगर हीने 26 धावांचं योगदान दिलं. तर पुजा महतोने 25 रन्स केल्या. तसेच कबिता कनवर हीने 13 धावांची भर घातली. या चौघींशिवाय कुणालाही दुहेरी आकडा गाठता आला नाही. पाकिस्तानकडून सादिया इक्बालने 2 विकेट्स घेतल्या. तर फातिमा सनाला 1 विकेट मिळाली.

पाकिस्तान प्लेइंग ईलेव्हन: निदा दार (कॅप्टन), गुल फिरोजा, मुनीबा अली (विकेटकीपर), सिद्रा अमीन, आलिया रियाझ, तुबा हसन, ओमामा सोहेल, फातिमा सना, सय्यदा आरूब शाह, नशरा संधू आणि सादिया इक्बाल.

नेपाळ प्लेइंग ईलेव्हन: इंदू बर्मा (कॅप्टन), समझ खडका, सीता राणा मगर, कविता कुंवर, रुबिना छेत्री, रोमा थापा, पूजा महातो, बिंदू रावल, काजल श्रेष्ठ (विकेटकीपर), कविता जोशी आणि कृतिका मरासिनी.

'मी परफ्यूम मारून जातो, उलट्या कशा होतील', भुजबळांचा कुणाला खोचक टोला?
'मी परफ्यूम मारून जातो, उलट्या कशा होतील', भुजबळांचा कुणाला खोचक टोला?.
रोज भूमिका बदलण्यापेक्षा हिंमत असेल तर...भुजबळांचं जरांगेना ओपन चॅलेंज
रोज भूमिका बदलण्यापेक्षा हिंमत असेल तर...भुजबळांचं जरांगेना ओपन चॅलेंज.
लाडकी बहीण दादांचीच? अजित पवारांनी ती योजना हायजॅक केली? भुजबळ म्हणाले
लाडकी बहीण दादांचीच? अजित पवारांनी ती योजना हायजॅक केली? भुजबळ म्हणाले.
'लाडकी बहीण'च्या तोडीस तोड नवी योजना, 1500 नाहीतर इतकी रक्कम मिळणार?
'लाडकी बहीण'च्या तोडीस तोड नवी योजना, 1500 नाहीतर इतकी रक्कम मिळणार?.
'टप्प्यात येण्याआधी बोलायचं नसतं', जयंत पाटील मिश्किलपणे काय म्हणाले?
'टप्प्यात येण्याआधी बोलायचं नसतं', जयंत पाटील मिश्किलपणे काय म्हणाले?.
सरकारच्या माफीनाम्यावरून जयंत पाटील म्हणाले, ‘...ही आमची मागणी नव्हती’
सरकारच्या माफीनाम्यावरून जयंत पाटील म्हणाले, ‘...ही आमची मागणी नव्हती’.
शरद पवारांच्या मनात CM म्हणून कोण? सुप्रिया सुळे की जयंत पाटील?
शरद पवारांच्या मनात CM म्हणून कोण? सुप्रिया सुळे की जयंत पाटील?.
महायुतीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं....
महायुतीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं.....
दादा गुलाबी झाले, पण भगवे नाहीत? दादांसोबतच्या युतीवर फडणवीस म्हणाले..
दादा गुलाबी झाले, पण भगवे नाहीत? दादांसोबतच्या युतीवर फडणवीस म्हणाले...
लाडक्या बहिणींना 1500 ची ओवाळणी देणारा मोठा भाऊ कोण? फडणवीस म्हणाले...
लाडक्या बहिणींना 1500 ची ओवाळणी देणारा मोठा भाऊ कोण? फडणवीस म्हणाले....