Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आशिया कपच्या फायनलमध्ये भारतीय महिला संघाच्या पराभवाची पाच मुख्य कारणे, हरमनप्रीतचा तो निर्णय ठरला घातक

आशिया कपच्या फायनलमध्ये भारतीय महिला संघाचा श्रीलंका संघाने आठ विकेटने पराभव केला. या विजयासह श्रीलंका महिला संघाने आशिया कपवर पहिल्यांदा नाव कोरलं. या पराभवाची पाच मुख्य कारणे जाणून घ्या.

आशिया कपच्या फायनलमध्ये भारतीय महिला संघाच्या पराभवाची पाच मुख्य कारणे, हरमनप्रीतचा तो निर्णय ठरला घातक
Follow us
| Updated on: Jul 28, 2024 | 11:07 PM

महिला आशिया कप 2024 च्या फायनलमध्ये भारताचा श्रीलंकेच्या महिला संघाने 8 विकेटने पराभव केला. श्रीलंका संघाने आपल्या घरच्या मैदानावर पराभव करत पहिल्यांदाच आशिया कपवर नाव कोरलं. भारतीय महिला संघाने प्रथम फलंदाजी करताना 165-6 धावा केल्या होत्या. हे आव्हान श्रीलंका संघाने 18.4 ओव्हरमध्ये 166 धावा करत पूर्ण केलं. भारतीय महिला संघाच्या पराभवाची पाच कारणे जाणून घ्या.

सर्वात पहिलं कारण म्हणजे टीम इंडियाची सुरूवातच एकदम खराब झाली. शेफाली शर्माने तर फायनल सामन्यात 19 चेंडूत अवघ्या 16 धावा केल्या. त्यामुळे भारतीय महिला संघाला आक्रमक सुरूवात करता आली नाही. पाच ओव्हरमध्ये फक्त ३० धावा झाल्यामुळे शेवटपर्यंत श्रीलंकेच्या गोलंदाजांनी शेवटपर्यंत भारतीय फलंदाजांवर दबाव टाकला.

फायनल सामन्यामध्ये हरमनप्रीत कौरने सर्वात मोठा बदल केला तो म्हणजे उमा छेत्री खेळायला पाठवलं. फायनलसारख्या सामन्यात अनुभवाला प्रोत्साहन द्यायला हवं होतं. मात्र तसं काही झालं नाही. मिळालेल्या संधीचा तिलाही फायदा उठवता आला नाही. 7 चेंडूत 9 धावा करून आऊट झाली.

हरमनप्रीत कौर जास्तीचे फलंदाज घेऊन आज उतरली होती. मात्र कोणत्याही फलंदाजाने जबाबदारी घेत वादळी खेळी केली नाही. हरमनलाही मोठी खेळी करता आली नाही. गोलंदाजांमध्ये योग्य वेळी बदल करता आले नाही. त्यासोबतच हरमनने एक कॅचही सोडला. त्यामुळे कॅप्टन म्हणून हरमनप्रीत कौर अपयशी ठरली.

श्रीलंक महिला संघाची कर्णधार चामरी अथापथु ही एकटी वन मॅन आर्मीसारखी खेळते हे सर्वांना माहित आहे. भारतीय महिला संघातील वेगवान गोलंदाजांना तिला रोखण्यात यश आलं नाही. उलट तिला एक जीवदानही मिळालं. तिने 43 चेंडूत 61 धावांची दमदार खेळी करत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.

हर्षिताने समरविक्रमाने सर्वांनाच धक्का दिला. भारतीय महिला संघाच्या एकही स्पिनर किंवा वेगवान गोलंदाजाला तिने सुट्ट नाही दिली. हर्षिताने वादळी अर्धशतकी खेळी केली. 51 चेंडूत नाबाद 69 धावा केल्या यामध्ये 6 चौकार आणि 2 षटकार मारले. त्यासोबतच कविशा दिलहरीने 16 चेंडूत 30 धावा केल्या.

श्रीलंका महिला (प्लेइंग इलेव्हन): विश्मी गुणरत्ने, चामरी अथापथु (कर्णधार), हर्षिता समरविक्रमा, कविशा दिलहरी, निलाक्षी डी सिल्वा, अनुष्का संजीवनी (विकेटकीपर), हसिनी परेरा, सुगंधिका कुमारी, इनोशी प्रियदर्शनी, उदेशिका प्रबोधनी, सचीला प्रबोधन.

भारतीय महिला (प्लेइंग इलेव्हन): स्मृती मानधना, शफाली वर्मा, उमा चेत्री, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, राधा यादव, तनुजा कंवर, रेणुका ठाकूर सिंग.

साहब के बारे में क्या बोला तूने, शिवसैनिकाची कामराला धमकी,ऑडिओ व्हायरल
साहब के बारे में क्या बोला तूने, शिवसैनिकाची कामराला धमकी,ऑडिओ व्हायरल.
कोरटकरच्या सुनावणी दरम्यान कोर्टात काय झालं? इनसाईड स्टोरी
कोरटकरच्या सुनावणी दरम्यान कोर्टात काय झालं? इनसाईड स्टोरी.
हातात कोल्हापूरी अन् चिल्लर, कोरटकर विरोधात शेकडो शिवप्रेमी आक्रमक
हातात कोल्हापूरी अन् चिल्लर, कोरटकर विरोधात शेकडो शिवप्रेमी आक्रमक.
सेना-भाजप युतीवरून राऊतांनी घेतली फडणवीसा बाजू
सेना-भाजप युतीवरून राऊतांनी घेतली फडणवीसा बाजू.
संजय राऊत अन् कुणाल कामरा एकाच बापाचे..., शिवसेना आमदाराचा हल्लाबोल
संजय राऊत अन् कुणाल कामरा एकाच बापाचे..., शिवसेना आमदाराचा हल्लाबोल.
कार्यकर्त्यांची रेलचेल अन् संभाषणासाठी वापरायला पोलिसांचे मोबाईल..
कार्यकर्त्यांची रेलचेल अन् संभाषणासाठी वापरायला पोलिसांचे मोबाईल...
मी दुर्लक्ष केलं...कामराने उलडवलेल्या खिल्लीनंतर शिंदे स्पष्टच म्हणाले
मी दुर्लक्ष केलं...कामराने उलडवलेल्या खिल्लीनंतर शिंदे स्पष्टच म्हणाले.
कामराची माफी नाहीच...शिवसैनिकांच्या आक्रमक भूमिकेनंतर पहिलं ट्वीट काय?
कामराची माफी नाहीच...शिवसैनिकांच्या आक्रमक भूमिकेनंतर पहिलं ट्वीट काय?.
शिव्या देतो माझ्या छातीला..,माजी नगरसेवकाला महिला कार्यकर्त्याकडून चोप
शिव्या देतो माझ्या छातीला..,माजी नगरसेवकाला महिला कार्यकर्त्याकडून चोप.
धारावीत ब्लास्ट, 10 हून अधिक सिलिंडरचा भीषण स्फोट, क्षणार्धात भस्मसात
धारावीत ब्लास्ट, 10 हून अधिक सिलिंडरचा भीषण स्फोट, क्षणार्धात भस्मसात.