WIND vs WSL Final Toss: टीम इंडियाचा टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय, फायनलसाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोण?

| Updated on: Jul 28, 2024 | 2:56 PM

India Women vs Sri Lanka Women Final Toss: टीम इंडियाने हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात आतापर्यंत एकूण 3 वेळा आशिया कप जिंकला आहे. त्यामुळे हरमनप्रीत आता भारतीय संघाला चौथ्यांदा ही ट्रॉफी मिळवून देणार का? हे काही तासात स्पष्ट होईल.

WIND vs WSL Final Toss: टीम इंडियाचा टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय, फायनलसाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोण?
WIND vs WSL Final Toss
Image Credit source: bcci women x account
Follow us on

वूमन्स आशिया कप 2024 फायनलमध्ये टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका आामनेसामने आहेत. दोन्ही संघ या स्पर्धेत अजिंक्य आहेत. या महामुकाबल्याचं आयोजन हे रणगिरी दांबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. हरमनप्रीत कौर टीम इंडियाचं नेतृत्व करत आहे. तर चमारी अथापथुकडे श्रीलंकेच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 2 वाजून 30 मिनिटांनी टॉस झाला. टीम इंडियाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कॅप्टन हरमनप्रीत हीने बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. आता टीम इंडिया श्रीलंकेला किती धावांचं आव्हान देणार? याकडे बारीक लक्ष असणार आहे.

स्मृतीने या महाअंतिम सामन्यासाठी मोठा निर्णय घेतलाय. तिने आपल्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोणताबी बदल केलेला नाही. स्मृतीने आपल्या खेळाडूंवर विश्वास दाखवला आहे. तसेच विजयी संघात कोणताही बदल करत नाही, तसंच स्मृतीने केलंय. तर दुसऱ्या बाजूला श्रीलंका प्लेइंग ईलेव्हनमध्ये एकमेव बदल करण्यात आला आहे. अचिनि कुलसूर्या हीच्या जागी संघात सचिनि निसांसला हीचा समावेश करण्यात आल्याची माहिती कॅप्टन चमारी अथापथू हीने टॉस दरम्यान दिली.

दरम्यान टीम इंडियाने आतापर्यंत एकूण 7 तर हरमनप्रीत कौर हीच्या कॅप्टन्सीत 3 वेळा आशिया कप ट्रॉफी जिंकण्याचा कारनामा केला आहे. त्यामुळे आता भारतीय महिला संघाकडे आणखी एक सामना जिंकून आठव्यांदा आशिया कप ट्रॉफी उंचावण्याची सुवर्ण संधी आहे. या प्रयत्नात टीम इंडिया यशस्वी होते की श्रीलंका पहिल्यांदाच ही ट्रॉफी जिंकते, हे लवकरच स्पष्ट होईल.

टीम इंडियाच्या बाजूने नाणेफेक

श्रीलंका वूमन्स प्लेइंग ईलेव्हन : चमारी अथापथु (कर्णधार), विश्मी गुणरत्ने, हर्षिता समरविक्रमा, कविशा दिलहरी, निलाक्षी डी सिल्वा, अनुष्का संजीवनी (विकेटकीपर), हसिनी परेरा, सुगंधिका कुमारी, इनोशी प्रियदर्शनी, उदेशिका प्रबोधनी आणि सचिनि निसांसला.

टीम इंडिया वूमन्स प्लेइंग ईलेव्हन : हरमनप्रीत कौर (कॅप्टन), स्मृती मंधाना, शफाली वर्मा, उमा चेत्री, जेमिमा रॉड्रिग्स, रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, राधा यादव, तनुजा कंवर आणि रेणुका ठाकूर सिंग.