वूमन्स टीम इंडियाने आशिया कप 2024 स्पर्धेतील महाअंतिम सामन्यात श्रीलंकेला विजयासाठी 166 धावांचं आव्हान दिलं आहे. टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 165 धावा केल्या. भारतासाठी स्मृती मंधाना हीने सर्वाधिक 60 धावांची खेळी केली. तसेच रिचा घोष हीने 30 आणि जेमिमाह रॉड्रिग्स हीने 29 धावा जोडल्या. तर शफाली वर्मा हीने 16 रन्स केल्या. तर इतरांना काही योगदान देता आलं नाही. श्रीलंकेसाठी कविषा दिलहारी हीने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. आता श्रीलंकेला पहिल्यांदा आशिया कप जिंकून इतिहास रचणार की टीम इंडिया एकूण आठव्यांदा ट्रॉफी उंचावणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.
टीम इंडियाने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय केला. टीम इंडियासाठी स्मृती मंधाना हीने सर्वाधिक धावा केल्या. स्मृतीने 47 बॉलमध्ये 10 फोरसह 60 रन्स केल्या. रिचा घोष हीने 30 धावा जोडल्या. जेमिमाह रॉड्रिग्सने 29 रन्स केल्या. तर शफाली वर्मा आणि कॅप्टन हरमनप्रीत कौर या दोघींनी अनुक्रमे 16 आणि 11 धावांचं योगदान दिलं. उमा चेत्रीने 9 धावा केल्या. तर पूजा वस्त्राकर आणि राधा यादव या दोघी नाबाद परतली. पूजाने 5 आणि राधाने 1 धाव केली. तर श्रीलंकेकडून कविषा दिलहारीने दोघींनी मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर प्रबोधिनी, सचिनी निसंसला आणि कॅप्टन चमारी अथापथू या तिघींनी 1-1 विकेट घेतली. टीम इंडियाला फायनलच्या हिशोबाने मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आलं. त्यामुळे आता भारतीय खेळाडू 166 धावांचा बचाव करणार का? याकडे क्रिकेट चाहत्याचं लक्ष लागून आहे.
श्रीलंकेसमोर 166 धावांचं आव्हान
Innings Break!
Vice-captain @mandhana_smriti‘s elegant 60(47), and brisk knocks from @JemiRodrigues (29 off 16) & @13richaghosh (30 off 14) help #TeamIndia post 165/6.
Over to our bowlers 🙌
Scorecard ▶️ https://t.co/RRCHLLmNEt#WomensAsiaCup2024 | #INDvSL | #ACC | #Final pic.twitter.com/j5UgyYeq3R
— BCCI Women (@BCCIWomen) July 28, 2024
श्रीलंका वूमन्स प्लेइंग ईलेव्हन : चमारी अथापथु (कर्णधार), विश्मी गुणरत्ने, हर्षिता समरविक्रमा, कविशा दिलहरी, निलाक्षी डी सिल्वा, अनुष्का संजीवनी (विकेटकीपर), हसिनी परेरा, सुगंधिका कुमारी, इनोशी प्रियदर्शनी, उदेशिका प्रबोधनी आणि सचिनि निसांसला.
टीम इंडिया वूमन्स प्लेइंग ईलेव्हन : हरमनप्रीत कौर (कॅप्टन), स्मृती मंधाना, शफाली वर्मा, उमा चेत्री, जेमिमा रॉड्रिग्स, रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, राधा यादव, तनुजा कंवर आणि रेणुका ठाकूर सिंग.