डिसेंबर महिन्यात या तारखेला पुन्हा लागणार खेळाडूंवर बोली, बंगळुरुत होणार लिलाव

आयपीएल 2025 मेगा लिलाव नुकताच पार पडला आहे. कोट्यवधी रुपयांची बोली लावून खेळाडूंना आपल्या संघात फ्रेंचायझींनी घेतलं आहे. आता बंगळुरुच मिनी ऑक्शन पार पडणार आहे. यावेळी बंगळुरुत लिलाव असणार आहे.

डिसेंबर महिन्यात या तारखेला पुन्हा लागणार खेळाडूंवर बोली, बंगळुरुत होणार लिलाव
Image Credit source: PTI
Follow us
| Updated on: Nov 28, 2024 | 9:17 PM

आयपीएल 2025 स्पर्धेसाठी मेगा लिलाव प्रक्रिया नुकतीच पार पडली. 24 आणि 25 नोव्हेंबरला खेळाडूंवर बोली लागली. या लिलाव प्रक्रियेत दहा फ्रेंचायझींनी कोट्यवधी रुपयांची उधळण केली. लखनौ सुपर जायंट्स सर्वाधिक बोली लावत ऋषभ पंतला आपल्या ताफ्यात घेतलं. ऋषभ पंतसाठी लखनौने 27 कोटी रुपये मोजले. अस असताना क्रीडाप्रेमींना आणखी लिलाव प्रक्रिया पाहण्याचा योग जुळून येणार आहे. वुमन्स प्रीमियर लीग 2025 स्पर्धेसाठी मिनी लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेत पाच संघ खेळतात. तसेच प्रत्येक संघात सहा विदेशी खेळाडूंसह 18 खेळाडूंची परवानगी आहे. सर्व संघांना 15 कोटींची रक्कम ठरवली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला संघांनी रिटेंशन यादी जाहीर केली होती. यात फ्रेंचायझींनी काही ठरावीक खेळाडू रिलीज केले आहेत. कारण यावेळेस मिनी ऑक्शन होणार आहे.

ईएसपीएनक्रिकइन्फोच्या रिपोर्टनुसार, वुमन्स प्रीमियर लीगचं 2025 हे तिसरं पर्व आहे. या पर्वाआधी 15 डिसेंबरला बंगळुरुत मिनी लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. या लिलावात लिलावात इंग्लंडची कर्णधार हीदर नाइट, न्यूझीलंडची वेगवान गोलंदाज ली ताहुहू, वेस्ट इंडिजची अष्टपैलू डिआंड्रा डॉटिन, भारताची अष्टपैलू खेळाडू स्नेह राणा, लेगस्पिनर पूनम यादव आणि फलंदाज वेदा कृष्णमूर्ती यांसारखे स्टार खेळाडू लिलावाचा भाग आहेत. याशिवाय नवोदित खेळाडूंवरही संघांची नजर असणार आहे.  आतापर्यंत वुमन्स प्रीमियर लीगचे दोन पर्व पार पडली आहेत. पहिल्या पर्वात मुंबई इंडियन्स, तर दुसऱ्या पर्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने विजय मिळवला आहे.

गुजरात जायंट्स संघाकडे सर्वाधिक 4.40 कोटी रुपये आहेत. तसेच संघात 4 जागा शिल्लक आहे. त्यामुळे मोठी बोली लावण्यास गुजरात मागेपुढे पाहाणार नाही. युपी वॉरियर्सकडे 3.90 कोटी रुपये आहेत. लिलावात त्यांना 3 खेळाडू घेता येतील. कारण त्यांनी 15 खेळाडूंना आधीच रिटेन केलं आहे. दुसरीकडे, गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 14 खेळाडू रिटेन केले आहेत. त्यांच्याकडे 3.25 कोटी आहेत. या पैशातून त्यांना 4 खेळाडूंसाठी बोली लावायची आहे. मुंबई इंडियन्सकडे 2.65 कोटींची रक्कम शिल्लक आहे. दिल्ली कॅपिटल्सने 14 खेळाडू रिटेन केले आहेत आणि त्यांच्याकडे 4 खेळाडू घेण्यासाठी 2.5 कोटी शिल्लक आहेत.

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.