डरबन : महिलांच्या T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया आज आपला दुसरा सामना खेळणार आहे. भारतीय टीमचा सामना वेस्ट इंडिज विरुद्ध होणार आहे. या मॅचआधी क्रिकेट विश्वात एका बातमीने सगळ्यांनाच धक्का बसलाय. क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा फिक्सिंगची चर्चा सुरु झालीय. बांग्लादेशच्या एका खेळाडूने स्पॉट फिक्सिंगची तक्रार केली आहे. जमुना TV च्या रिपोर्ट्नुसार, बांग्लादेशी खेळाडू लता मंडलने सनसनाटी खुलासा केलाय. शोहेल अख्तरने स्पॉट फिक्सिंगची ऑफर दिल्याच म्हटलं आहे.
कुठल्या सामन्यानंतर स्पॉट फिक्सिंगचा आरोप?
14 फेब्रुवारीला ऑस्ट्रेलिया आणि बांग्लादेशमध्ये सामना झाला. या सामन्यानंतर बांग्लादेशी खेळाडूने स्पॉट फिक्सिंगचा आरोप केलाय. स्पॉट फिक्सिंगसाठी आपल्याशी संपर्क साधण्यात आल्याचा दावा खेळाडूने केला आहे. बांग्लादेश क्रिकेट बोर्डाची अँटी करप्शन युनिट याची दखल घेणार असून लवकरच याची चौकशी सुरु होईल.
आरोप करणारी प्लेइंग 11 मध्ये नाही
लता मंडल या खेळाडूने स्पॉट फिक्सिंगचा आरोप केलाय. तिने अँटी करप्शन युनिटकडे तक्रार केलीय. पण ती ऑस्ट्रेलियाविरुद्ध बांग्लादेशच्या प्लेइंग 11 चा भाग नव्हती. ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांग्लादेशच्या टीमने सामना 8 विकेटने गमावला. ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट टीमने 10 चेंडू राखून सामना जिंकला.
अशी होती मॅचची स्थिती
बांग्लादेशच्या महिला टीमने पहिली बॅटिंग केली. 20 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावून 107 धावा केल्या. बांग्लादेशकडून सर्वाधिक धावा कॅप्टन निगार सुल्तानाने केल्या. तिने 50 चेंडूत 57 रन्स केल्या. ऑस्ट्रेलियाने 108 धावांच टार्गेट 18.2 ओव्हर्समध्ये 2 विकेट गमावून पार केल्या. ऑस्ट्रेलियाकडून मेग लेनिंगने नाबाद 48 धावा केल्या. एलिसा हिलीने 37 रन्स केल्या.
आज भारताचा सामना वेस्ट इंडिज विरुद्ध आहे. भारतीय टीमने आजचा सामना जिंकला, तर ते आपल्या ग्रुपमध्ये टॉप 2 मध्ये पोहोचू शकतात. भारताने पहिल्या सामन्यात पाकिस्तानच्या टीमला हरवलं होतं.