WT20 World Cup : बांगलादेशने स्कॉटलंडसमोर विजयासाठी ठेवलं 119 धावांचं आव्हान, कोण मारणार बाजी?

वुमन्स टी20 क्रिकेट स्पर्धेत बांग्लादेश विरुद्ध स्कॉटलंड यांच्यात सामना सुरु आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल बांगलादेशच्या बाजूने लागला आणि त्यांनी फलंदाजीचा निर्णय घेतला. बांगलादेशने 20 षटकात 7 गडी गमवून 119 धावा केल्या आणि विजयासाठी 120 धावांचं आव्हान दिलं आहे.

WT20 World Cup : बांगलादेशने स्कॉटलंडसमोर विजयासाठी ठेवलं 119 धावांचं आव्हान, कोण मारणार बाजी?
Image Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Oct 03, 2024 | 5:05 PM

वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धा पहिल्या सामन्यापासून चर्चेचा विषय आली आहे. पहिला सामना बांग्लादेश आणि स्कॉटलंड यांच्यात सुरु आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर बांगलादेशने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. बांगलादेशने 20 षटकात 7 गडी गमवून 119 धावा केल्या आणि विजयासाठी 120 धावांचं आव्हान दिलं आहे. आता स्कॉटलंडचा संघ हे विजयी आव्हान पूर्ण करतं का? की, बांगलादेश स्कॉटलंड रोखतं? याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. बांगलादेशकडून शाथी राणी आणि मुर्शिदा खातुन ही जोडी मैदानात उतरली होती. या जोडीने सावध सुरुवात केलीय. 4.3 षठकात 26 धावा केल्या. पण नेमकी त्यावेळी मुर्शिदा खातुन बाद झाली आणि दबाव वाढला. पण साथी राणी आणि शोभना मोश्तरी यांनी डाव सावरला. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 42 धावांची भागीदारी केली. शाथी राणी 29 धावांवर खेळत असताना कॅथरिन फ्रेझरने तिची विकेट काढली. त्यानंतर आलेली ताज नेहर काही खास करू शकली नाही. तिला आपलं खातही खोलता आलं नाही. एका बाजूने शोभना मोश्तरीने डाव पुढे नेण्याचा प्रयत्न सुरुच ठेवला. तिने 38 चेंडूत 2 चौकारांच्या मदतीने 36 धावा केल्या आणि बाद झाली. कर्णधार निगर सुल्तानाने एका बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. पण तिला काही इतरांची साथ मिळाली नाही. शोमा अक्तर आणि रितू मोनी अवघ्या 5 धावा करून तंबूत परतले.

स्कॉटलंडकडून सस्किया हॉर्ले जबरदस्त गोलंदाजी केली. दोन षटकात 11 धावा देत 2 गडी बाद केले. कॅथरीन ब्राइसने 1, ऑलिव्हिया बेलने 1, सास्किया हॉर्लेने 3, तर कॅथरिन फ्रेझरने 1 गडी बाद केला. आता बांगलादेशच्या गोलंदाजांवर कमान असणार आहे. कारण 6 धावांच्या सरासरीने स्कॉटलंडला धावा करायच्या आहेत.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

स्कॉटलंड वुमन्स (प्लेइंग इलेव्हन): सास्किया हॉर्ले, सारा ब्राइस (विकेटकीपर), कॅथरीन ब्राइस (कर्णधार), आयल्सा लिस्टर, प्रियानाझ चॅटर्जी, डार्सी कार्टर, लोर्ना जॅक, कॅथरीन फ्रेझर, रेचेल स्लेटर, अबताहा मकसूद, ऑलिव्हिया बेल.

बांगलादेश वुमन्स (प्लेइंग इलेव्हन): मुर्शिदा खातून, शाठी राणी, शोभना मोस्तारी, निगार सुल्ताना (विकेटकीपर/कर्णधार), ताज नेहर, शोर्ना अक्टर, रितू मोनी, फहिमा खातून, राबेया खान, नाहिदा अक्टर, मारुफा अख्तर.

'आसूरांचा संहार करण्यासाठी मशाल हाती घे', ठाकरेंचं नवं मशाल गीत लाँच
'आसूरांचा संहार करण्यासाठी मशाल हाती घे', ठाकरेंचं नवं मशाल गीत लाँच.
दोन रोहित अन् एकच मंच... दोघांची तुफान बॅटिंग, बघा काय म्हणाला हिटमॅन?
दोन रोहित अन् एकच मंच... दोघांची तुफान बॅटिंग, बघा काय म्हणाला हिटमॅन?.
घराणेशाही नष्ट करण्यासाठी 'तो यतोय', सिंधुदुर्गातील त्या बॅनरची चर्चा
घराणेशाही नष्ट करण्यासाठी 'तो यतोय', सिंधुदुर्गातील त्या बॅनरची चर्चा.
सदावर्ते बिग बॉसमध्ये दिसणार, डंके की चोट पर म्हणाले, 'आगे आगे देखो..'
सदावर्ते बिग बॉसमध्ये दिसणार, डंके की चोट पर म्हणाले, 'आगे आगे देखो..'.
माहूर गडावर नवरात्रौत्सवाला सुरुवात,रेणुकेच्या दर्शनासाठी भक्तांची रिघ
माहूर गडावर नवरात्रौत्सवाला सुरुवात,रेणुकेच्या दर्शनासाठी भक्तांची रिघ.
अंबाबाईला तोफेची सलामी अन् नवरात्रोत्सवाला सुरूवात, भाविकांची गर्दी
अंबाबाईला तोफेची सलामी अन् नवरात्रोत्सवाला सुरूवात, भाविकांची गर्दी.
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सप्तश्रृंगी गडावर दर्शनासाठी भाविकांची रिघ
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सप्तश्रृंगी गडावर दर्शनासाठी भाविकांची रिघ.
भिडेंचं वादग्रस्त वक्तव्य, महामूर्ख हिंदू, गणेशोत्सवाचा चोथा अन्...
भिडेंचं वादग्रस्त वक्तव्य, महामूर्ख हिंदू, गणेशोत्सवाचा चोथा अन्....
पुण्यात स्कूल बसमध्ये 2 चिमुकलींवर अत्याचार, नराधमानं काय दिली धमकी?
पुण्यात स्कूल बसमध्ये 2 चिमुकलींवर अत्याचार, नराधमानं काय दिली धमकी?.
सरकारकडून मुद्रांक शुल्कात वाढ, आता 'इतके' रूपये मोजावे लागणार
सरकारकडून मुद्रांक शुल्कात वाढ, आता 'इतके' रूपये मोजावे लागणार.