IND vs PAK : टीम इंडियाची पाकिस्तानसोबत ‘करो या मरो’ची लढाई, या सामन्यावरच आता काय ते ठरणार

वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारताचं पुढचं आव्हान एका पराभवानंतर खडतर झालं आहे. मोठा गाजावाजा करत जेतेपदासाठी टीम इंडियाला दावेदार मानलं जात आहे. पण एका पराभवानेच सर्व गणित बिघडलं आहे. आता पाकिस्तान विरुद्ध करो या मरोची लढाई आहे. भारतासाठी स्पर्धेतील ही शेवटची संधी असणार आहे.

IND vs PAK : टीम इंडियाची पाकिस्तानसोबत 'करो या मरो'ची लढाई, या सामन्यावरच आता काय ते ठरणार
Follow us
| Updated on: Oct 05, 2024 | 7:26 PM

वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील साखळी फेरीतील सामने हळूहळू पुढे सरकत आहे. तस तशी या स्पर्धेतील रंगत वाढत चालली आहे. कारण या स्पर्धेत पाच पाच संघांचे दोन गट पाडले आहेत. त्यामुळे प्रत्येक संघाच्या वाटेला साखळी फेरीत चार सामने येणार आहे. त्यामुळे चार आणि तीन सामन्यात विजयी संघाला उपांत्य फेरी गाठण्याची संधी मिळणार आहे. जर दोन सामन्यांचं गणित जुळून आलं तर नेट रनरेट खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. भारताने पहिल्याच सामन्यात पराभवासोबत नेट रनरेटची माती केली आहे. त्यामुळे हा रनरेट भरून काढणं खूपच कठीण आहे. त्यामुळे तीन सामन्यात विजय मिळवला तर उपांत्य फेरीची वाट मोकळी होणार आहे. पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने भारतासमोर विजयासाठी 20 षटकात 160 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण भारतीय संघ 19 षटकात सर्व गडी बाद 102 धावाच करू शकला. त्यामुळे 58 धावांनी पराभवाचं तोंड पाहावं लागलं. भारताचा नेट रनरेट -2.900 इतका झाला आहे. तसेच गुणतालिकेत सर्वात तळाशी आहे. त्यामुळे हा रनरेट उर्वरित तीन सामन्यात कमी करणं कठीण जाईल यात शंका नाही. त्यामुळे पाकिस्तान विरुद्धचा सामना करो या मरोची लढाई आहे. या सामन्यात पराभव झाला तर स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात येईल.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात 15 टी20 सामने खेळले गेले आहेत. या सामन्यात भारताचा वरचष्मा राहिला आहे. भारताने 12 सामन्यात विजय मिळवला आहे. तर पाकिस्तानने भारताला 3 सामन्यात पराभवाची धूळ चारली आहे. तसेच वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेत दोन्ही संघ 7 वेळा आमनेसामने आले आहेत. यावेळी टीम इंडियाने पाकिस्तानला 5 वेळा पराभूत केलं आहे. तर पाकिस्तानने दोन वेळा विजय मिळवला आहे. सध्या भारताची स्थिती पाहता विजयाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे आता सर्वांचा नजरा भारतीय संघाच्या कामगिरीकडे लागून आहेत.

भारत आणि पाकिस्तानचा संपूर्ण संघ

भारत: हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृति मंधाना, शफाली वर्मा, दीप्ति शर्मा, जेमिमा रॉड्रिग्स, ऋचा घोष, यास्तिका भाटिया , पूजा वस्त्राकर, अरुंधति रेड्डी, रेणुका सिंह ठाकुर, दयालन हेमलता, आशा सोभना, राधा यादव, श्रेयंका पाटिल, सजना सजीवन.

पाकिस्तान: फातिमा सना (कर्णधार), आलिया रियाज, डायना बेग, गुल फिरोजा, इरम जावेद, मुनीबा अली, नशरा सुंधू, निदा डार, ओमैमा सोहेल, सदफ शमास, सादिया इकबाल, सिदरा अमीन, सैयदा अरूब शाह, तस्मिया रुबाब, तुबा हसन.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.