Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Women’s T20 World Cup 2024 : न्यूझीलंडने श्रीलंकेला 8 गडी राखून केलं पराभूत, भारताचं टेन्शन वाढलं

वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील 15 वा सामना न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात पार पडला. या सामन्यात न्यूझीलंडचा वरचष्मा दिसून आला. श्रीलंकेने नाणेफेकीचा कौल जिंकला मात्र सामन्यावर पकड राहिती ती न्यूझीलंडची..श्रीलंकेचं स्पर्धेत सलग चौथा पराभव असून स्पर्धेतील आव्हान आधीच संपुष्टात आलं आहे.

Women's T20 World Cup 2024 : न्यूझीलंडने श्रीलंकेला 8 गडी राखून केलं पराभूत, भारताचं टेन्शन वाढलं
Image Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Oct 12, 2024 | 6:26 PM

वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील उपांत्य फेरीची लढत आता चुरशीच्या वळणावर येऊन ठेपली आहे. साखळी फेरीत न्यूझीलंड आणि श्रीलंका हे दोन संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात न्यूझीलंडने श्रीलंकेचा पराभव केला आणि पुन्हा एकदा 2 गुणांसह नेट रनरेटमध्ये उसळी घेतली आहे. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात पाच गडी गमवून 115 धावा केल्या आणि विजयासाठी 116 धावांचं आव्हान ठेवलं. हे आव्हान झटपट गाठण्याासठी न्यूझीलंडने आक्रमक सुरुवात केली. त्यामुळे न्यूझीलंडचा विजय पक्का झाला होता. पण नेट रनरेटच्या हिशेबाने आक्रमक खेळी सुरु होती. सुझी बेट्स आणि जॉर्जिया प्लिमर या जोडीने आक्रमक सुरुवात केली. या जोडीने पहिल्या विकेटसाठी 49 धावांची भागीदारी केली. पण सुझी बेट्स 17 धावांवर असताना सचिनी निसलंकाच्या गोलंदाजीवर बाद झाली. त्यानंतर जॉर्जिया प्लिमरने आक्रमक खेळी सुरुच ठेवली. तिने 44 चेंडूत 53 धावा केल्या. चमारी अटापट्टूच्या गोलंदाजीवर बाद होत तंबूत परतली.

अमेलिया केर आणि सोफी डेव्हाईन या जोडीने नंतर मोर्चा सांभाळला. या दोघांनी विजयी भागीदारी केली आणि संघाला विजय मिळवून दिला. अमेलिया केरने सावध, पण नेट रनरेटचं गणित डोक्यात ठेवून खेळी केली. साखळी फेरीत श्रीलंकेचा शेवट एकदम वाईट झाला. साखळी फेरीत चार पैकी चारही सामन्यात श्रीलंकेला पराभवाचं तोंड पाहावं लागलं. दुसरीकडे, पाकिस्तानचं उपांत्य फेरीचं गणित चुकलेलं आहे. त्यामुळे आता भारत आणि न्यूझीलंड यांच्यात चुरशीची लढाई होणार आहे. या सामन्यापूर्वी न्यूझीलंडचा नेट रनरेट हा -0.050 इतका होता. आता त्यात सुधारणा झाली असून 4 गुण आणि +0.282 नेट रनरेटसह तिसरं स्थान गाठलं आहे. त्यामुळे आता भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना जिंकावाच लागले. तसेच पाकिस्तानकडून न्यूझीलंडच्या पराभवाची अपेक्षा ठेवावी लागेल.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

न्यूझीलंड महिला (प्लेइंग इलेव्हन): सुझी बेट्स, जॉर्जिया प्लिमर, अमेलिया केर, सोफी डेव्हाईन (कर्णधार), ब्रुक हॅलिडे, मॅडी ग्रीन, इसाबेला गेज (विकेटकीपर), लेह कॅस्परेक, ली ताहुहू, रोझमेरी मायर, ईडन कार्सन.

श्रीलंका महिला (प्लेइंग इलेव्हन): विश्मी गुणरत्ने, चामरी अटापट्टू (कर्णधार), हर्षिता समरविक्रमा, कविशा दिलहारी, निलाक्षी डी सिल्वा, अनुष्का संजीवनी (विकेटकीपर), सचिनी निसांसला, अमा कांचना, सुगंधिका कुमारी, इनोशी प्रियदर्शनी, उदेशिका प्रबोधनी.

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.