PAK vs SL : पाकिस्तानची विजयी सलामी, आशिया किंग श्रीलंकेवर 31 धावांनी मात
Pakistan Women vs Sri Lanka Women Highlights In Marathi: पाकिस्तानने वूमन्स टी 20i वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत विजयाने सुरुवात केली आहे. पाकिस्तानने आशिया किंग श्रीलंकेवर 31 धावांनी मात केली आहे.
पाकिस्तान क्रिकेट टीमने आयसीसी वूमन्स टी 20I वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत विजयी सुरुवात केली आहे. पाकिस्तानने श्रीलंकेवर 31 धावांनी विजय मिळवला आहे. पाकिस्तानच्या गोलंदाजांनी 116 धावांचा शानदार बचाव केला आहे. पाकिस्तानने श्रीलंकेला विजयासाठी 117 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र श्रीलंकेला 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून फक्त 85 धावाच करता आल्या. तर आशिया किंग श्रीलंकेला पराभवाचा सामना करावा लागलाय. श्रीलंकेकडून फक्त दोघींनाच 20 पेक्षा अधिक धावा करता आल्या. तर पाकिस्तानकडून तिघींनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर एकीने सर्वाधिक 3 विकेट्स मिळवल्या.
श्रीलंकेची बॅटिंग
श्रीलंकेकडून निलाक्षी डी सिल्वा हीने सर्वाधिक 22 धावा केल्या. तर ओपनर विश्मी गुणरत्ने हीने 20 धावांचं योगदान दिलं. या दोघीव्यतिरिक्त एकीलाही 8 पेक्षा अधिक धावा करता आल्या नाहीत. श्रीलंकेचे फलंदाज पाकिस्तानच्या गोलंदाजांसमोर निष्प्रभ ठरले. श्रीलंकेसाठी 117 धावांचं लक्ष्य हे आव्हानात्मक नव्हतं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मात्र पाकिस्तानच्या गोलंदाजांनी कमाल केली. पाकिस्तानच्या गोलंदाजांनी श्रीलंकेला ठराविक अंतराने झटके देत विजयी आव्हानापासून चार हात दूरच ठेवलं आणि विजय मिळवला.
कॅप्टन फातिमा सना हीची ऑलराउंड कामगिरी
पाकिस्तानच्या या विजयात कॅप्टन फातिमा सना हीने मोलाचं योगदान दिलं. फातिमाने बॅटिंग आणि त्यानंतर बॉलिंगने धमाका केला. फातिमाने आधी पाकिस्तानकडून सर्वाधिक 30 धावा केल्या. फातिमाच्या या खेळीत 1 षटकार आणि 3 चौकारांचा समावेश होता. त्यानंतर फातिमाने 2.5 षटकांमध्ये 10 धावांच्या मोबदल्यात 2 विकेट्स घेतल्या. फातिमाच्या या कामगिरीसाठी तिला ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्काराने गौरवण्यात आलं.
पाकिस्तानची विजयी सुरुवात
We are off to a winning start in the ICC Women’s #T20WorldCup! 🙌
A tremendous bowling performance as Pakistan triumph by 31 runs ✨#PAKWvSLW | #BackOurGirls pic.twitter.com/S1BUEAquuw
— Pakistan Cricket (@TheRealPCB) October 3, 2024
पाकिस्तान वूमन्स प्लेइंग ईलेव्हन: फातिमा सना (कॅप्टन), मुनीबा अली (विकेटकीपर), गुल फिरोजा, सिद्रा अमीन, निदा दार, आलिया रियाझ, ओमामा सोहेल, तुबा हसन, नशरा संधू, डायना बेग आणि सादिया इक्बाल.
श्रीलंका वूमन्स प्लेइंग ईलेव्हन : चामारी अथापथु (कॅप्टन), विश्मी गुणरत्ने, हर्षिता समरविक्रमा, कविशा दिलहारी, अनुष्का संजीवनी (विकेटकीपर), निलाक्षी डी सिल्वा, हसिनी परेरा, सुगंधिका कुमारी, इनोशी प्रियदर्शनी, सचिन निसांसाला आणि उद्देशिका प्रबोधिनी.