SAw Vs WIw : दक्षिण अफ्रिका आणि वेस्ट इंडिज आमनेसामने, नाणेफेकीचा कौल जिंकत लॉरा वॉल्ववार्ड्टने निवडली..
Women's T20 World Cup, SA vs WI : वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या तिसऱ्या सामन्यात दक्षिण अफ्रिका आणि वेस्ट इंडिज हे संघ आमनेसामने आले आहेत. या सामन्यात नाणेफेकीचा कौल वेस्ट इंडिजच्या बाजूने लागला. नाणेफेक जिंकताच कर्णधार लॉरा वॉल्ववार्ड्ट गोलंदाजीला प्राधान्य दिलं.

वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धा आता हळूहळू पुढे सरकत आहे. वेस्ट इंडिज आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात पहिला आणि स्पर्धेतील तिसरा सामना होत आहे. या सामन्यातील निकालानंतर खऱ्या अर्थाने गुणतालिकेत रस्सीखेच सुरु होणार आहे. कारण या स्पर्धेत एकूण 10 संघ असून पाच पाच संघांचे दोन गट पाडले आहेत. त्यामुळे एका गटात प्रत्येक संघाला 4 सामने खेळायचे आहेत. त्यामुळे दुसऱ्या सामन्यापासून उपांत्य फेरीसाठी चुरस पाहायला मिळणार आहे. दरम्यान, दक्षिण अफ्रिकेची कर्णधार लॉरा वॉल्ववार्ड्टने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे. ही खेळपट्टी फिरकीला मदत करणारी आहे. त्यामुळे धावांचा पाठलाग कठीण जाऊ शकतं. तरी दक्षिण अफ्रिकेने प्रथम गोलंदाजी स्वीकारल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. नाणेफेकीनंतर दक्षिण अफ्रिकेची कर्णधार लॉरा वॉल्ववार्ड्टने सांगितलं की, ‘आम्ही प्रथम गोलंदाजी करू. ही एक नवीन आणि फ्रेश विकेट आहे, बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की पाठलाग करणं सोपं जाईल. तयारी चांगली झाली आहे, पण टी20 क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं. त्यामुळआम्ही एकावेळी एकाच गेमचा विचार करतोय आज आमच्याकडे एक अतिरिक्त फिरकीपटू आहे.’
वेस्ट इंडिजची कर्णधार हेली मॅथ्यूजने सांगितलं की, “आम्हीही नाणेफेकीनंतर कदाचित प्रथम गोलंदाजी केली असती, परंतु ही एक चांगली विकेट दिसत आहे. आम्ही आक्रमक सुरुवात करू शकतो. आमच्याकडे चांगले वेगवान गोलंदाज आणि फिरकीपटू आहेत. आम्ही आठव्या नंबरपर्यंत फलंदाजी करतो. डिआंड्रा डॉटिन आनंद घेत आहे. तिला पुन्हा संघात परत पाहून आनंद झाला. इथेच खूपच उकाडा आहे. परंतु बरेच खेळाडू लीगमध्ये समान परिस्थितीत खेळले आहेत. परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी आम्ही शिबिर घेतले होतं.”
दोन्ही संघांची प्लेइंग 11
दक्षिण आफ्रिका महिला (प्लेइंग इलेव्हन): लॉरा वोल्वार्ड (कर्णधार), तझमिन ब्रिट्स, मारिजाने कॅप, ॲनेके बॉश, सुने लुस, क्लो ट्रायॉन, नादिन डी क्लर्क, ॲनेरी डेर्कसेन, सिनालो जाफ्ता (विकेटकीपर), नॉनकुलुलेको म्लाबा, अयाबोंगा खाका.
वेस्ट इंडीज महिला (प्लेइंग इलेव्हन): हेली मॅथ्यूज (कर्णधार), कियाना जोसेफ, स्टॅफनी टेलर, डिआंड्रा डॉटिन, शेमेन कॅम्पबेल (विकेटकीपर), चिनेल हेन्री, आलिया ॲलेने, झैदा जेम्स, एफे फ्लेचर, करिश्मा रामहारक, शामिलिया कोनेल.