वेस्ट इंडिज आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील तिसरा सामना सुरु आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल दक्षिण अफ्रिकेच्या बाजूने लागला. दक्षिण अफ्रिकेने मैदानाचा अंदाज घेत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. दक्षिण अफ्रिकेची कर्णधार लॉरा वॉल्ववार्ड्टने धावसंख्या गाठणं सोपं असल्याचं म्हंटलं. तसेच पहिल्या डावात फिरकीपटूला मदत असं सांगितलं होतं. झालंही तसंच नॉनकुलुलेको मलाबाने वेस्ट इंडिजचं कंबरडं मोडलं. 4 षटकात 29 धावा देत आघाडीचे चार फलंदाज झटपट बाद केले. त्यामुळे वेस्ट इंडिजला मोठी धावसंख्या उभारताना अडचण आली. एकीकडे झटपट विकेट जात असताना वन डाऊन आलेल्या सॅफनी टेलरने डाव सावरला. पण दुसऱ्या बाजूने तिला काही साथ मिळाली नाही. समोरून झटपट विकेट जात होते. संघावरील दडपण दूर करण्याचा तिने पूरेपूर प्रयत्न केला. वेस्ट इंडिजने 20 षटकात 6 गडी गमवून 118 धावा केल्या आणि विजयासाठी 119 धावांचं आव्हान दिलं आहे.
वेस्ट इंडिजकडून कर्णधार हिले मॅथ्यूज आमि क्विना जोसेफ ही जोडी मैदानात उतरली होती. या दोघींनी सावध सुरुवात केली खरी पण संघाच्या 15 धावा असताना हिलेने चूक केली. मारिजाने कॅपच्या गोलंदाजीवर फटका मारताना चुकली आणि हातात झेल दिला.त्यानंतर फिरकीपटू नॉनकुलुलेको मलाबा एक एक करून विकेट घेण्यास सुरुवात केली. क्वेना जोसेफला 4 धावांवर असताना त्रिफळाचीत केलं. त्यानंतर मारिजाने कॅपने डिएंड्राची विकेट काढली आणि जल्लोष केला. कारण तिची विकेट खूपच महत्त्वाची होती. शेमेन कॅम्पबेल 17, चिनेल हेन्री 0, आलिया ॲलेने 7 धावा करून तंबूत परतले. स्टॅफनी टेलर नाबाद 44 आणि झैदा जेम्स नाबाद 15 धावांवर राहिली.
दक्षिण आफ्रिका महिला (प्लेइंग इलेव्हन): लॉरा वोल्वार्ड (कर्णधार), तझमिन ब्रिट्स, मारिजाने कॅप, ॲनेके बॉश, सुने लुस, क्लो ट्रायॉन, नादिन डी क्लर्क, ॲनेरी डेर्कसेन, सिनालो जाफ्ता (विकेटकीपर), नॉनकुलुलेको म्लाबा, अयाबोंगा खाका.