Women’s T20 World Cup SA vs NZ : अंतिम सामन्यात अशी असू शकते प्लेइंग 11, पिच रिपोर्ट जाणून घ्या

वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील अंतिम फेरीत न्यूझीलंड आणि दक्षिण अफ्रिका हे संघ आले आहेत. या दोन्ही संघांनी अंतिम फेरीत गाठताना एकच सामना गमावलेला आहे. त्यामुळे या दोन्ही संघात तुल्यबल लढत होणार हे नक्की

Women's T20 World Cup SA vs NZ : अंतिम सामन्यात अशी असू शकते प्लेइंग 11, पिच रिपोर्ट जाणून घ्या
Follow us
| Updated on: Oct 19, 2024 | 9:33 PM

टी20 वर्ल्डकप स्पर्धा बांगलादेशमधील राजकीय उलथापालथीनंतर यूएईत स्थलांतरीत करण्यात आली होती. ही स्पर्धा सारजाह आणि दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानात पार पडली. या स्पर्धेचा शेवटचा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानात पार पडणार आहे. गेल्या 18 दिवसांपासून सुरु असलेला थरार आता अंतिम टप्प्यात आला आहे. अंतिम फेरीत न्यूझीलंड आणि दक्षिण अफ्रिका हे संघ आमनेसामने येणार आहेत. त्यामुळे या सामन्यात कोण बाजी मारणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. कारण या दोन्ही संघांनी आतापर्यंत एकदाही जेतेपदावर नाव कोरलेलं नाही. न्यूझीलंडने दोन वेळा अंतिम फेरी गाठली होती. तेव्हा इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामुळे जेतेपदाचं स्वप्न भंगलं होतं. तर दक्षिण अफ्रिका संघ मागच्या पर्वात अंतिम फेरीत पोहोचला होता. तेव्हा ऑस्ट्रेलियाने धोबीपछाड देत जेतेपद मिळवलं होतं. पण नवव्या पर्वात अंतिम फेरीच्या शर्यतीतून ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि वेस्ट इंडिज हे विजेते संघ बाद झाले आहेत.

दुबईची खेळपट्टी अशी आहे

दुबईच्या मैदानात आतापर्यंत 5 टी20 सामने पार पडले आहेत. या सामन्यात 115 पर्यंत धावसंख्या पुरेशी असल्याचं दिसत आहे. वेगवान गोलंदाजांच्या तुलनेत फिरकीपटू या मैदानात चालतात असं दिसतंय. दरम्यान, दक्षिण अफ्रिका आणि न्यूझीलंड हे संघ टी20 वर्ल्डकप स्पर्धेत 16 वेळा आमनेसामने आले आहेत. यात न्यूझीलंडने 11 वेळा तर दक्षिण अफ्रिकेने 4 वेळा विजय मिळवला आहे. तर एका सामना निकालाविना संपला.

वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेचा अंतिम कुठे पाहता येईल?

वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेचा अंतिम सामना न्यूझीलंड आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात होत आहे. भारतात डिस्ने हॉटस्टारवर लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येईल. स्टार स्पोर्ट्स आणि डीडी स्पोर्ट्सवर लाईव्ह टेलिकास्ट पाहता येईल.

संभाव्य प्लेइंग इलेव्हन

दक्षिण आफ्रिका महिला: लॉरा वोल्वार्ड (कर्णधार), तझमिन ब्रिट्स, ॲनेके बॉश, मारिझान कॅप, सुने लुस, क्लो ट्रायॉन, नादिन डी क्लर्क, ॲनेरी डेर्कसेन, सिनालो जाफ्ता (विकेटकीपर), नॉनकुलुलेको म्लाबा, अयाबोंगा खाका

न्यूझीलंड महिला: सुझी बेट्स, जॉर्जिया प्लिमर, सोफी डिव्हाईन (कर्णधार), अमेलिया केर, ब्रुक हॅलिडे, मॅडी ग्रीन, इसाबेला गेज (विकेटकीपर), फ्रॅन जोनास, रोझमेरी मायर, ईडन कार्सन, ली ताहुहू

Non Stop LIVE Update
भाजपाचे माजी खासदार सुरेश वाघमारे वर्ध्यातून निवडणूक लढविण्यास इच्छुक
भाजपाचे माजी खासदार सुरेश वाघमारे वर्ध्यातून निवडणूक लढविण्यास इच्छुक.
विदर्भात कॉंग्रेस सांगली पॅटर्न राबविणार ?काय म्हणाले बाळासाहेब थोरात
विदर्भात कॉंग्रेस सांगली पॅटर्न राबविणार ?काय म्हणाले बाळासाहेब थोरात.
सावंतवाडी मतदार संघावरुन शिवसेना आणि राष्ट्रवादीत खेचाखेची सुरु
सावंतवाडी मतदार संघावरुन शिवसेना आणि राष्ट्रवादीत खेचाखेची सुरु.
मेरिटच्या आधारे निर्णय घ्यावा,कोणी हेकेखोरी करु नये - नाना पटोले
मेरिटच्या आधारे निर्णय घ्यावा,कोणी हेकेखोरी करु नये - नाना पटोले.
तासगाव: संजय पाटील यांचे पूत्र प्रभाकर पाटील निवडणूकीच्या मैदानात ?
तासगाव: संजय पाटील यांचे पूत्र प्रभाकर पाटील निवडणूकीच्या मैदानात ?.
नागपूरात कॉंग्रेसचा सांगली पॅर्टन?, कॉंग्रेस-राष्ट्रवादीत घमासान
नागपूरात कॉंग्रेसचा सांगली पॅर्टन?, कॉंग्रेस-राष्ट्रवादीत घमासान.
हेचि फल काय मम तपाला,पडळकर यांना स्थानिक भाजपा नेत्यांचा विरोध
हेचि फल काय मम तपाला,पडळकर यांना स्थानिक भाजपा नेत्यांचा विरोध.
देवेंद्र फडणवीस यांनी तोंडचा घास हिरावला - मनोज जरांगे पाटील
देवेंद्र फडणवीस यांनी तोंडचा घास हिरावला - मनोज जरांगे पाटील.
जागावाटपावरून ठाकरे गट अन् पटोलेंमधील वाद पेटला, मविआत बिघाडी
जागावाटपावरून ठाकरे गट अन् पटोलेंमधील वाद पेटला, मविआत बिघाडी.
शिवाजी पार्कवर मनसेचा दावा, शेवटचा षटकार लगावणार?; रडारवर कोण?
शिवाजी पार्कवर मनसेचा दावा, शेवटचा षटकार लगावणार?; रडारवर कोण?.