Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Women’s T20 World Cup 2024 : वर्ल्ड कपसाठी न्यूझीलंडकडून टीमची घोषणा, भारताच्या दोन शत्रूंची टीममध्ये एन्ट्री, पाहा कोण?

Women's T20 World Cup 2024 : आगामी वर्ल्ड कपसाठी न्यूझीलंडने आपल्या संघाची घोषणा केली आहे. न्यूझीलंडने आपल्या संघामध्ये भारतासाठी कायम डोकेदुखी ठरलेल्या दोन खेळाडूंचा समावेश केला आहे. कोण आहेत दोन खेळाडू जाणून घ्या.

Women's T20 World Cup 2024 : वर्ल्ड कपसाठी न्यूझीलंडकडून टीमची घोषणा, भारताच्या दोन शत्रूंची टीममध्ये एन्ट्री, पाहा कोण?
Follow us
| Updated on: Sep 10, 2024 | 5:12 PM

टीम इंडियाच्या पुरूष संघाने यंदाच्या टी-20 वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरलं. आता येत्या ऑक्टोबर महिन्यामध्ये वुमन्स टी-20 वर्ल्डकप सुरू होत आहे. महिला संघानेही वर्ल्डकप जिंकावा अशी आशा सर्व चाहत्यांना आहे. भारतीय संघ या वर्ल्डकपसाठी जोरदार तयारी करत आहे. अशातच न्यूझीलंड संघाने वर्ल्ड कपसाठी आपल्या संघाची घोषणा केलीय. न्यूझीलंडच्या संघात अशा दोन खेळाडूंना स्थान देण्यात आलं आहे, जे भारताचे मोठे शत्रू आहेत. कोण आहेत त्या दोन खेळाडू जाणून घ्या.

वुमन्स टी-20 वर्ल्ड कप पुढील महिन्यात UAE मध्ये होणार आहे. न्यूझीलंडच्या संघात सोफी डेव्हाईन आणि सुझी बेट्स यांचा समावेश आहे. दोघी सलग नऊवा टी-20 वर्ल्ड कप खेळणार असल्याने न्यूझीलंड संघ दांडग्या अनुभवासह मैदानात उतरेल. भारत आणि न्युझीलंड संघाचा पहिला सामना असणार आहे. न्यूझीलंड संघ 2009 आणि 2010 मध्ये उपविजेता राहिला आहे. 2009 मध्ये स्पर्धेच्या सुरुवातीपासून या अनुभवी जोडीने या महिला मेगा स्पर्धेच्या प्रत्येक हंगामात भाग घेतला आहे. सोफी डेव्हाईन आणि सुझी बेट्स यांनी भारताविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळताना न्यूझीलंडकडून सर्वाधिक धावा केल्या आहेत.  भारतासाठी या दोन्ही खेळाडू डोकेदुखी ठरू शकतात.

सुरुवातीपासूनच मी या स्पर्धेचा भाग आहे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. जागतिक दर्जाच्या संघांविरुद्ध स्पर्धा करण्यासाठी मी आणखी एका संधीची वाट पाहत आहे. आमच्या संघामध्ये विकेटकीपर इझी गेज ही एकमेव वर्ल्ड कप न खेळण्याचा अनुभव नसलेली खेळाडू असल्याचं सोफी डेव्हाईन म्हणाली.

दरम्यान, भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि न्यूझीलंड हे संघ ‘अ’ गटामध्ये आहेत. न्यूझीलंडचा पहिला सामना 4 ऑक्टेबरला भारतसोबत असणार आहे. या सामन्याआधी न्यूझीलंड संघाचा दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडविरुद्ध सराव सामना होणार आहे. तर येत्या 16 सप्टेंबरल न्यूझीलंडचा संघ ऑस्ट्रेलियासोबत तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळणार नाही.

टी-20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघ:-

सोफी डेव्हाईन (कर्णधार), सुझी बेट्स, ईडन कार्सन, इझी गेज, मॅडी ग्रीन, ब्रूक हॅलिडे, फ्रॅन जोनास, लेह कॅस्परेक, अमेलिया केर, जेस केर, रोझमेरी मेयर, मॉली पेनफोल्ड, जॉर्जिया प्लिमर, हन्ना रो, ली ताहुहू.

'त्यांनी कोणत्या बागेचा आंबा खाल्ला माहीत नाही', ठाकरेंचा भिडेंना टोला
'त्यांनी कोणत्या बागेचा आंबा खाल्ला माहीत नाही', ठाकरेंचा भिडेंना टोला.
शाहरुखच्या बंगल्याचा रंजक इतिहास; व्हिला व्हिएनावरून असा बनला 'मन्नत'
शाहरुखच्या बंगल्याचा रंजक इतिहास; व्हिला व्हिएनावरून असा बनला 'मन्नत'.
'सुरेश धसांची दाढी अचानक पांढरी झाली...', अंजली दमानियांनी डिवचलं
'सुरेश धसांची दाढी अचानक पांढरी झाली...', अंजली दमानियांनी डिवचलं.
'सौगात ए मोदी'वरून उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका
'सौगात ए मोदी'वरून उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका.
विधानभवन परिसरात उद्धव ठाकरे म्हणाले, 'हरामखोर आहेत ते...',रोख कोणाकडे
विधानभवन परिसरात उद्धव ठाकरे म्हणाले, 'हरामखोर आहेत ते...',रोख कोणाकडे.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पठ्ठ्या थेट विहिरीत उतरला
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पठ्ठ्या थेट विहिरीत उतरला.
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरही धंगेकरांना काँग्रेसचा 'पंजा' काही सुटेना
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरही धंगेकरांना काँग्रेसचा 'पंजा' काही सुटेना.
उद्धव ठाकरेंनी त्यांना सगळं दिलं, राऊतांची टीका
उद्धव ठाकरेंनी त्यांना सगळं दिलं, राऊतांची टीका.
'ते' गाणं ट्वीट करून आमच्या व्यथा...; कामराचे मनसे नेत्याकडून आभार
'ते' गाणं ट्वीट करून आमच्या व्यथा...; कामराचे मनसे नेत्याकडून आभार.
दिशा सालियान मृत्यूप्रकरणी तपासात नेमकं काय म्हटलंय?
दिशा सालियान मृत्यूप्रकरणी तपासात नेमकं काय म्हटलंय?.