पाकिस्तानात होणार टी20 वर्ल्डकप, आयसीसीने दाखवला हिरवा कंदील; पण…

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेबाबत गेल्या काही दिवसांपासून तिढा होता तो आता सुटला आहे. दुसरीकडे, पाकिस्तानी क्रीडाप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. टी20 वर्ल्डकपची यजमानपद आता पाकिस्तानला मिळणार आहे. आयसीसीने हिरवा कंदील दाखवला आहे.

पाकिस्तानात होणार टी20 वर्ल्डकप, आयसीसीने दाखवला हिरवा कंदील; पण...
Follow us
| Updated on: Dec 19, 2024 | 5:10 PM

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेबाबत गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त चर्चा रंगली होती. आता यावर पडदा पडला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड हायब्रीड मॉडेलवर स्पर्धा भरवण्यास तयार झाला आहे. त्यात भारताचे सामने तटस्थ देशात होणार यावरही मोहोर लागली आहे. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील सर्व अडथळे दूर झाले आहेत. भारत पाकिस्तान सामनाही तटस्थ देशात खेळवला जाणार आहे. दुसरीकडे, आयसीसीने स्पष्ट केलं की, 2024 ते 2027 दरम्यान आयसीसी स्पर्धांमधील भारत पाकिस्तान सामने तटस्थ ठिकाणी खेळवले जातील. भारतात आयोजित केलेल्या स्पर्धेत पाकिस्तानशी निगडीत सामने तटस्थ ठिकाणी खेळले जातील. हा नियम पाकिस्तानात होणाऱ्या 2025 चॅम्पियन्स ट्रॉफी, भारतात होणाऱ्या महिला वनडे वर्ल्डकप 2025 आणि भारत-श्रीलंका यांच्यात संयुक्तपणे होणाऱ्या टी20 वर्ल्डकप 2026 साठी लागू असेल. असं असताना पाकिस्तानी क्रीडाप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी समोर आली. पाकिस्तानला आणखी एका आयसीसी स्पर्धेचं यजमानपद मिळालं आहे.

आयसीसीने टी20 वर्ल्डकप स्पर्धेचं यजमानपद दिलं आहे. हा टी20 वर्ल्डकप पुरुष नाही तर महिलांचा असणार आहे. हा टी20 वर्ल्डकप 2028 मध्ये होणार आहे. म्हणजेच 4 वर्षात पाकिस्तानला दोन मोठ्या स्पर्धा आयोजित करण्याची संधी मिळणार आहे. या शिवाय ऑस्ट्रेलियाही 2029 ते 2031 दरम्यान आयसीसीच्या सीनियर वूमन्स स्पर्धेचं एक यजमानपद भूषवणार आहे.

दरम्यान, चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धा पाकिस्तान आणि दुबईत होतील असं सांगण्यात येत आहे. 19 फेब्रुवारी ते 9 मार्च दरम्यान आयोजित केली जाईल. या स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत. या 8 संघांना दोन गटात विभागलं आहे. चार संघातून साखळी फेरीत टॉप दोन संघांची उपांत्य फेरीत निवड होईल. जर भारतीय संघाने अंतिम सामन्यात धडक मारली तर हा सामना तटस्थ ठिकाणी होईल.

भारतीय संघ रोहित शर्माच्या नेतृत्वात चॅम्पियन्स ट्रॉफी खेळणार हे आधीच निश्चित झालं आहे. दुसरीकडे, भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरी गाठणार की नाही याबाबत अजून जर तरचं गणित आहे.  या दोन्ही स्पर्धांमध्ये रोहित शर्मा आणि प्रशिक्षक गौतम गंभीरची कस लागणार आहे.

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.