IND vs NZ Toss : न्यूझीलंडच्या बाजूने नाणेफेकीचा कौल, टीम इंडियाची बॅटिंग की फिल्डिंग?

| Updated on: Oct 04, 2024 | 7:42 PM

India Women vs New Zealand Women Toss: न्यूझीलंडने वर्ल्ड कप मोहिमेतील पहिल्या सामन्यात टॉस जिंकला आहे. न्यूझीलंडने टीम इंडिया विरुद्ध बॅटिंगचा निर्णय घेतला आहे.

IND vs NZ Toss : न्यूझीलंडच्या बाजूने नाणेफेकीचा कौल, टीम इंडियाची बॅटिंग की फिल्डिंग?
wind vs wnz toss t20 world cup 2024
Follow us on

टीम इंडिया आयसीसी वूमन्स टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील मोहिमेची सुरुवात करण्यासाठी सज्ज आहे. भारतीय संघासमोर सलामीच्या सामन्यात न्यूझीलंडचं आव्हान आहे. स्पर्धेतील या चौथ्या सामन्याचं आयोजन हे दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. हरमनप्रीत कौर हीच्याकडे भारतीय संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी आहे. तर सोफी डिव्हाईन ही न्यूझीलंडची कॅप्टन आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस झाला. न्यूझीलंडने टॉस जिंकला. कॅप्टन सोफी डिव्हाईन हीने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला आहे.

कॅप्टन हरमनप्रीत कौर काय म्हणाली?

“आम्हाला फक्त तिथे जाऊन चांगले क्रिकेट खेळायचे आहे. ही सर्वोत्तम टीम आहे. आमच्याकडे या फॉरमॅटमधील सर्वोत्तम टीम आहे. आमची बाजू संतुलित आहे. आमच्याकडे शेवटपर्यंत फलंदाज आहेत”, असं कॅप्टन हरमनप्रीत हीने टॉसनंतर म्हंटलं. “तसेच खेळपट्टीमध्ये फार बदल झालेला नाही. त्यामुळे आम्ही पहिले बॅटिंगचा निर्णय घेत आहोत”, असं न्यूझीलंडची कॅप्टन सोफी डिव्हाईन हीने सांगितलं.

न्यूझीलंड टीम इंडियावर वरचढ

दरम्यान टी 20i फॉर्मेटमध्ये न्यूझीलंड टीम इंडियावर वरचढ राहिली आहे. उभयसंघात एकूण 13 सामने झाले आहेत. टीम इंडियाला त्यापैकी 4 सामनेच जिंकता आले आहेत. तर न्यूझीलंडने टीम इंडियावर 9 वेळा विजय मिळवला आहे. त्यामुळे टीम इंडिया विजयी सुरुवात करुन न्यूझीलंडला ‘पंच’ देणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

न्यूझीलंडचा टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय

वूमन्स टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : हरमनप्रीत कौर (कॅप्टन), शफाली वर्मा, स्मृती मानधना, जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, अरुंधती रेड्डी, पूजा वस्त्राकर, श्रेयंका पाटील, आशा शोभना आणि रेणुका ठाकूर सिंग.

न्यूझीलंड वूमन्स प्लेईंग ईलेव्हन : न्यूझीलंड वूमन्स प्लेइंग ईलेव्हन : सोफी डेव्हाईन (कॅप्टन), सुझी बेट्स, जॉर्जिया प्लिमर, अमेलिया केर, ब्रुक हॅलिडे, मॅडी ग्रीन, इसाबेला गेज (विकेटकीपर), जेस केर, रोझमेरी मायर, ली ताहुहू आणि ईडन कार्सन.