बांगलादेश गमावणार वूमन्स टी 20 वर्ल्ड कपचं यजमानपद! आयसीसी केव्हा घेणार अंतिम निर्णय?
Womens T20 World Cup 2024: बांगलादेशमध्ये सध्या असलेलं वातावरणामुळे आयसीसी वूमन्स टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेचं आयोजन हे दुसऱ्या ठिकाणी करणार असल्याची माहिती आहे.
बांगलादेशमध्ये सध्या भयंकर स्थिती आहे. शेजारील देशात अराजकतेची स्थिती आहे. अशात बांगलादेशला आता आगामी आयसीसी वूमन्स टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेचं यजमानपद गमवावं लागू शकतं. या वर्ल्ड कप स्पर्धेला ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयसीसीने बांगलादेश क्रिकेट बोर्डासह संपर्क साधला. आयसीसीने बांगलादेशला वर्ल्ड कप आयोजनाच्या अंतिम निर्णयासाठी ठराविक अवधी दिला आहे. त्यामुळे आयसीसी बांगलादेशकडून यजमानपद काढून घेणार असल्याचं निश्चित समजलं जात आहे. त्याबाबत आता मोठी अपडेट समोर आली आहे. तसेच बीसीसीआय सचिव जय शाह यांनी या स्पर्धेचं भारतात आयोजन करण्यात कोणताही रस दाखवला नाहीय.
बांगलादेशकडे शेवटचे काही तास
क्रिकबझच्या रिपोर्ट्सनुसार, बीसीबी अर्थात बांगलादेश क्रिकेट बोर्डातील एका सूत्राने सांगितलं की आयसीसीकडे अंतिम निर्णयाआधी 5 दिवसांचा अवधी मागितला आहे. आयसीसीने बीसीबीला वाढीव मुदत दिली, तर 20 ऑगस्ट रोजी बोर्डाच्या बैठकीत वूमन्स टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या आयोजनाबाबत चर्चा होईल. आयसीसी 15 ऑगस्ट रोजी वूमन्स टी 20 वर्ल्ड कप आयोजनाबाबत अंतिम निर्णय घेणार होती, मात्र आता बीसीबी अधिकाऱ्यांच्या विनंतीनुसार, मुदतवाढ देण्यात आली आहे.
तर दुसऱ्या बाजूला बांगलादेश क्रिकेट बोर्डाने सेनाप्रमुखांना पत्राद्वारे आयसीसी टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या सुरक्षेसाठी पत्र लिहिलं होतं. मात्र त्यातंर बीसीबीने याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. आता आयसीसी यजमानपदाबाबतचा अंतिम निर्णय हा 20 ऑगस्ट रोजी घेऊन शकते. सूत्रांनुसार, या टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या यजमानपदाचा मान हा यूएईला मिळू शकतो. कारण बीसीसीआय सचिव जय शाह यांनी भारतात टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेचं आयोजन करण्यास नकार दिला आहे. तर श्रीलंकेत पावसामुळे आयोजन केलं जाऊ शकत नाही. त्यामुळे यूएईला यजमानपदाची संधी मिळू शकते.
महिला टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेचं वेळापत्रक
Mark your calendars 🗓️
Unveiling the fixtures for the ICC Women’s #T20WorldCup 2024 👇https://t.co/yKKfvEGguZ
— ICC (@ICC) May 5, 2024
वर्ल्ड कपबाबत थोडक्यात
दरम्यान वूमन्स टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेला 27 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत एकूण 10 संघांमध्ये चढाओढ पाहायला मिळणार आहे.तसेच एकूण 23 सामने खेळवण्यात येणार आहेत.