IND W vs AUS W 2nd ODI | टीम इंडियाच्या पराभवावर बोलताना हरमनने सांगितलं सामना कुठे गमावला, म्हणाली…

IND W vs AUS W : वुमन्स टीम इंडिया आणि वुमन्स ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या दुसऱ्या वन डे सामन्यातही टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. ऑस्ट्रेलिया संघाने शेवटला पारडं आपल्या बाजुने झुकवत सलग दुसऱ्या वन डे सामन्यात विजयाची नोंद केली.

IND W vs AUS W 2nd ODI | टीम इंडियाच्या पराभवावर बोलताना हरमनने सांगितलं सामना कुठे गमावला, म्हणाली...
Follow us
| Updated on: Dec 30, 2023 | 11:21 PM

मुंबई : वुमन्स टीम इंडिया आणि वुमन्स ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या दुसऱ्या वन डे सामन्यातही टीम इंडियाचा पराभव झाला आहे. आजच्या सामन्यात टीम इंडियाच्या हाता तोंडाशी आलेला विजय ऑस्ट्रेलियाने हिसकावून घेतला. या सामन्यामधील पराभवामुळे टीम इंडियाने मालिका गमावली आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलिया संघाने दोन सामने जिंकत मालिका खिशात घातली आहे. आज झालेल्या पराभवावर कॅप्टन हरमनप्रीत कौर याने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाली हरमनप्रीत कौर?

आजच्या सामन्यात आम्ही चांगली बॉलिंग केली. विकेट घेण्यासाठी आम्ही प्लॅनिंग केलं होतं. आजच्या खेळात अनेक सकारात्मक गोष्टी झाल्या. रिचा घोषने चांगली बॅटींग केली पण शेवटला ऑस्ट्रेलियाच्या संघाने सामना आमच्यापासून दूर नेला. ऑस्ट्रेलिया संघाकडे खोल बॅटींग लाईन अप आहे. मला वाटतं की आजच्या सामन्यात अनेक कॅच ड्रॉप झाले हा एक सामन्याचा महत्त्वाचा भाग असल्याचं हरमनप्रीत कौर याने म्हटलं आहे.

सामन्याचा धावता आढावा

ऑस्ट्रलिया संघाने प्रथम फलंदाजी करताना 50 ओव्हरमध्ये 258-8 धावा केल्या होत्या. यामध्ये  ओपनर फोबी लिचफिल्ड हिने सर्वाधिक 63 धावांची खेळी केली होती. तर एलिस पेरी हिने 50 धावा केल्या होत्या. टीम इंडियाकडून दीप्ती शर्मा हिने सर्वाधिक 5 विकेट घेतल्या.

या आव्हानाचा पाठालाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या टीम इंडियाला 50 ओव्हरमध्ये 255-8 धावा करता आल्या. अवघ्या तीन धावांनी टीम इंडियाचा पराभव झाला, रिचा घोष हिची 96 धावांची खेळी व्यर्थ गेली.

भारतीय महिला (प्लेइंग इलेव्हन): स्मृती मानधना, यास्तिका भाटिया, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (C), दीप्ती शर्मा, रिचा घोष (डब्ल्यू), स्नेह राणा, अमनजोत कौर, पूजा वस्त्राकर, श्रेयंका पाटील, रेणुका ठाकूर सिंग

ऑस्ट्रेलिया महिला (प्लेइंग इलेव्हन): अॅलिसा हिली (W/C), फोबी लिचफिल्ड, एलिस पेरी, बेथ मूनी, ताहलिया मॅकग्रा, अॅशले गार्डनर, अॅनाबेल सदरलँड, जॉर्जिया वेअरहम, अलाना किंग, किम गर्थ, डार्सी ब्राउन

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.