IND W vs AUS W 3rd ODI | ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाच्या गोलंदाजांना मजबूत फोडलं, जिंकण्यासाठी इतक्या धावांचं लक्ष्य
IND W vs AUS W : वुमन्स टीम इंडिया आणि वुमन्स ऑस्ट्रेलिया यांच्याती तिसरा आणि शेवटचा वन डे सामना सुरू आहे. शेवटच्या सामन्यातही ऑस्ट्रेलिया संघाने टीम इंडियाच्या गोलंदाजांना फोडून काढलं आहे.
मुंबई : वुमन्स टीम इंडिया आणि वुमन्स ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा वन डे सामना सुरू आहे. वुमन्स ऑस्ट्रेलिया संघाने प्रथम फलंदाजी करताना 50 ओव्हरमध्ये 338-7 धावा केल्या आहेत. टीम इंडियाच्या गोलंदाजांना चांगलंच धुतलं असून डोंगराएवढ्या लक्षाचा पाठलाग करण्यात टीम इंडिया यशस्वी ठरते की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. ऑस्ट्रेलिया संघाकडून फोबी लिचफील्ड हिने 119 धावांची शतकी खेळी तर कॅप्टन अॅलिसा हिलीच्या 82 धावांच्या अर्धशतकाच्या जोरावर एक मजबूत आव्हान टीम इंडियाला दिलं आहे.
ऑस्ट्रेलिया संघाची सलामीवीर फोबी लिचफील्ड हिने सलग तिसऱ्या सामन्यात 50 पेक्षा धावा केल्या आहेत. आजच्या सामन्यात शतक ठोकलं असून संघासाठी मोठी कामगिरी केली. फोबी लिचफील्ड आणि कॅप्टन अॅलिसा हिली यांनी 189 धावांची सलामी दिली. टीम इंडियाला पहिली विकेट थेट 29 व्या ओव्हरमध्ये मिळाली. पूजा वस्त्राकर हिने ही विकेट घेत टीमला पहिलं यश मिळवून दिलं. अॅलिसा हिली 82 धावांवर आऊट झाली. चार चौकार आणि तीन षटकार मारले. तर शतकवीर लिचफील्ड हिने 125 चेंडूत 119 धावा केल्या, तब्बल 16 चौकार आणि 1 षटकार मारला.
दोन विकेट गेल्यावर श्रेयांका पाटील हिने तीन विकेट घेतल्या. त्यामुळे धावगतीला ब्रेक लागला होता पण त्यानंतर अॅशले गार्डनर 30 धावा, अॅनाबेल सदरलँड 23 धावा आणि शेवटला अलाना किंग हिने केलेल्या 26 धावांच्या आक्रमक खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलिया संघाने 330 पेक्षा जास्त धावा केल्या. टीम इंडियाकडून श्रेयांका पाटीलने तीन तर अमनजोत कौर हिने दोन विकेट घेतल्या.
Phoebe Litchfield had statisticians reaching for the record books as she struck a second ODI century in Mumbai!@JollyLauz18 has the details #INDvAUS https://t.co/amMqNK3F1E
— cricket.com.au (@cricketcomau) January 2, 2024
भारतीय महिला (प्लेइंग इलेव्हन): यास्तिका भाटिया, स्मृती मानधना, रिचा घोष (W), जेमिमा रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (C), दीप्ती शर्मा, मन्नत कश्यप, अमनजोत कौर, पूजा वस्त्राकर, श्रेयंका पाटील, रेणुका ठाकूर सिंग
ऑस्ट्रेलिया महिला (प्लेइंग इलेव्हन): फोबी लिचफील्ड, अॅलिसा हिली (W/C), एलिस पेरी, बेथ मूनी, ताहलिया मॅकग्रा, अॅशले गार्डनर, अॅनाबेल सदरलँड, जॉर्जिया वेरहॅम, अलाना किंग, किम गर्थ, मेगन शूट