World Cup 2023 संघात जागा न मिळाल्याने ‘हे’ खेळाडू घेणार निवृत्ती?, दिग्गज खेळाडूचा समावेश!

टीम इंडियाची वर्ल्ड कप साठी घोषणा झाली असून या संघामध्ये युवा खेळाडूंनाही संधी मिळाली आहे. मात्र काही खेळाडूंचा हिरमोड झाल्याने ते निवृत्ती घेण्याच्या विचारात असल्याचं समजत आहे.

World Cup 2023 संघात जागा न मिळाल्याने 'हे' खेळाडू घेणार निवृत्ती?, दिग्गज खेळाडूचा समावेश!
Follow us
| Updated on: Sep 05, 2023 | 6:59 PM

मुंबई :  बीसीसीआयने वर्ल्ड कप 2023 साठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांनी पत्रकार परिषद घेत 15 खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. अनेक खेळाडूंचा हिरमोड असून काही जुन्या खेळाडूंना संधी मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र आधी आशिया कप आणि वर्ल्ड कपमधून डावललं गेल्याने काही खेळाडू आपली निवृत्ती जाहीर करण्याच्या तयारीमध्ये दिसत आहेत.

कोणते आहेत ते खेळाडू?

टीम इंडियाचा सर्वात जुन्या खेळाडूंपैकी एक असलेला दिनेश कार्तिक याने शेवटचा सामना २०२९ साली खेळलेला होता. कसोटी सामना 2018 मध्ये आणि टी-20 वर्ल्ड कप 2022 मध्ये दिसला होता. दिनेश कार्तिक याला परत एकदा संघामध्ये असं काही दिसत नाही. त्यामुळे कार्तिक हा निवृत्ती घेऊ शकतो.

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाजा उमेश यादव हा दुसऱ्या क्रमांकावर असून तोसुद्धा निवृत्ती घेऊ शकतो. मोहम्मद सिराज याच्या एन्ट्रीने उमेशची जाग धोक्यात आली आहे. 35 वर्षीय उमेश यादव याला कसोटी संघातही जागा आता मिळणं अवघड आहे.

महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्त्वाखाली केदार जाधव याची टीम इंडियामध्ये जागा मिळवली होती. मात्र त्याचा फॉर्म म्हणावा तसा काही दिसला नाही. त्यानंतर त्याला संघातून डच्चू मिळाला आणि नंतर तो टीम इंडियामधून बाहेर फेकला गेला. इतंकच नाहीतर आता आयपीएलमध्येही कोणत्याच संघात नाही.

इशांत शर्मा अशा खेळडूंपैकी एक आहे ज्याने 100 कसोटी सामन्यांमध्ये टीम इंडियाचं प्रतिनिधित्त्व केलं होतं. संघाचा नियमित बॉलर असलेला इशांत शर्मा आता कसोटीमध्येही दिसत नाही. WTC च्या फायनल सामन्यासाठी त्याची निवड झालेली नव्हती. 2021 मध्ये त्याने शेवटचा सामना खेळला होता.

ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन टीम इंडियाच्या दिग्गज खेळाडूंपैकी एक आहे. या खेळाडूने एकट्याने कित्येक सामने फिरवले आहेत. या खेळाडूने तिन्ही फॉरमॅटमध्ये दमदार प्रदर्शन केलं आहे. मात्र त्याला आता वन डे आणि टी-20 सामन्यामध्ये त्याला संघात स्थान दिलं जात नाही. यंदाच्या वर्ल्ड कपध्ये त्याला संघात स्थान मिळेल असं वाटल होतं. मात्र त्यालाही काही जागा मिळाली नाही.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.