धीरूभाई अंबानींनी BCCI ला PM राजीव गांधींसोबत भारत-पाक मॅच पाहण्याची का ठेवलेली अट? जाणून घ्या

देशातील बड्या उद्योजकांमध्ये येणाऱ्या अंबानींच्या रिलायन्सला क्रिकेटमुळे जगभर ओळख मिळाली. तुम्हाला आयपीएल वाटेल पण क्रिकेट वर्ल्ड कपमुळे रिलायन्स सर्वत्र पोहोचलं गेलं. वर्ल्ड कपमधील भारत-पाक सामना पंतप्रधानांसोबत पाहण्याची अट घातली होती. नेमकं काय घडलेलं आणि ही अट मान्य केल्यावर काय होणार होतं? जाणून घ्या.

धीरूभाई अंबानींनी BCCI ला PM राजीव गांधींसोबत भारत-पाक मॅच पाहण्याची का ठेवलेली अट? जाणून घ्या
Follow us
| Updated on: May 04, 2024 | 6:06 PM

रिलायन्स इंडस्ट्रीचे संस्थापक धीरूभाई अंबानी हे देशातील मोठे उद्योजक होते. दहावीनंतर शाळा अर्धवट सोडलेली, एका पेट्रोल पंपवर नोकरी करत धीरूभाईंनी मोठं साम्राज्य उभं केलं. हा प्रवास काही सोपा नव्हता, एका उद्योजकाला जर यशस्वी व्हायचं असेल तर संधी ओळखता यायला हव्यात. धीरूभाई अंबानी यांनीही अशीच एक संधी हेरली अन् रिलायन्सला जगभरात ओळख मिळवून दिली होती. ही गोष्ट आहे 1987 च्या वर्ल्ड कपची, भारताने 1983 साली वर्ल्ड कपवर पहिल्यांदा नाव कोरलं होतं. त्यानंतर बीसीसीआयने पुढच्या वर्ल्ड कपचं यजमानपद घेतलं. यजमानपद घेतलं खरं पण अंगाशीच आल्यासारखं झालं होतं. मात्र धीरूभाई यांनी पुढाकार घेतल्याने बीसीसीआयची जगभरात प्रतिमा राखली गेली. त्यावेळी नेमकं काय घडलं होतं.

इंग्लंडनंतर वर्ल्ड कपचं बाहेर आयोजन

भारताने क्रिकेट वर्ल्ड कपवर 1983 साली कपिल देव यांच्या नेतृत्त्वाखाली नाव कोरलं होतं. वेस्ट इंडिजसारख्या बलाढ्य संघाला भारत पराभूत करेल असा विचारही कोणी केला नव्हता. वर्ल्ड कप जिंकल्यावर भारतामध्ये मोठ्या प्रमाणात क्रिकेटची क्रेज वाढली. बीसीसीआयने पुढच्या वन डे वर्ल्ड कपचं यजमानपद घेतलं होतं. त्याआधी झालेल्या तिन्ही वर्ल्ड कपचे आयोजन हे इंग्लंडने केलं होतं. चौथ्याही वर्ल्ड कपचं आयोजन करण्यासाठी इंग्लंड क्रिकेट बोर्ड तयार होते. मात्र बीसीसीआयने इंग्लंडपेक्षा दोन-चार ते पाच पटीने जास्त रकमेचा प्रस्ताव आयसीसीला दिला होता. कारण उद्योजक धीरूभाई अंबानी यांनी आपण वर्ल्ड कपची स्पॉन्सरशिप घेत असल्याचा शब्द तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी दिलेला. मात्र दुर्देवाने त्यांची हत्या झाली. त्यानंतर मोठा गोंधळ झाला. राजीव गांधी यांची सत्ता आल्यावर व्ही. पी. सिंह यांना महसूल मंत्रीपद दिलं गेलं होतं. व्ही. पी. सिंह यांनी आयकर विभागाला अंबानींकडे पाठवलं, मग काय अंबानी यांनी स्पॉन्सरशीप मागे घेण्याचा निर्णय घेतला. दोन्ही पार्ट्यांमध्ये वाद झाले होते.

कोण होते धीरूभाई अंबानी ?

धीरूभाई अंबानी यांच जन्म 28 डिसेंबर 1933 मध्ये गुजरातमधील एका गावामध्ये झाला होता. त्यांना पाच भाऊ आणि एक बहिण अशी भावंडे होतीत. दहावी झाल्यावर ते त्यांचा भाऊ रमणीकलाल यांच्याकडे यमन या देशात गेले होते. तिथे त्यांनी पेट्रोल पंपावर नोकरी 300 रूपये महिना या पगारावर काम केलं. मुंबईमध्ये त्यांनी चंपलाल दिमानी यांच्यासोबत रिलायन्स कमर्शियल कॉर्परेशन कंपनीची स्थापना केली. पश्चिमी देशातून हळद, अद्रक आणि इतर मसाले पाठवण्याचं काम केलं. पेट्रोकेमिकल, रिफायनिंग, टेलिकॉममध्ये आपला व्यवसाय वाढवला. गुजरातमधील अहमदाबादमध्ये त्यांनी कापड मिल सुरू केली होती. रिलायन्स टेक्सटाईल्स असं या कंपनीचं नाव होतं. दिवसेंदिवस त्यांनी आपला व्यवसाय वाढवला आणि देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये स्थान मिळवलं होतं.

बीसीसीआयची झाली मोठी गोची

धीरूभाई अंबानी यांनी स्पॉन्सरशीप मागे घेतल्याने बीसीसीआयचे धाबे दणाणले होते. कारण नवीन स्पॉन्सर मिळत नव्हता. वर्ल्ड कप साठी 30 कोटींचा खर्च करावा लागणार होता. बीसीसीआयला 1984 पर्यंत 4 कोटी आयसीसीला द्यायचे होते, मात्र सर्व कंपन्यांकडून अवघ्या 32 लाखांची स्पॉन्सरशीप मिळत होती. बीसीसीआयने मोठ्या ऐटीत वर्ल्ड कपचं यजमानपद घेतलं मात्र असं काही होईल विचारही केला नव्हता. आता इतके पैसे कसे जमा करायचे? हा प्रश्न बीसीसीआयला पडला होता. बीसीसीआय आता जगातील श्रीमंत मंडळ आहे पण त्यावेळची परिस्थिती खूप वेगळी होती.

BCCIच्या अध्यक्षांनी घेतली राजीव गांधींची भेट

आता दुसरा काहीच मार्ग नव्हता ना कोणती आश होती. बीसीसीआयचे तत्कालीन अध्यक्ष एन के पी साळवे यांनी पंतप्रधान राजीव गांधी यांची भेट घेतली. सरकारसोबत बोलणी करण्यात त्यांना यश आलं. भारत सरकारने त्यावेळी 4 कोटी भरले. पण त्यानंतर मीडिया राईट्सचा प्रश्न उपस्थित झाला. दूरदर्शनने बीसीसीआयला मीडिया राईट्सची रक्कम देण्यास असमर्थता दर्शविली. यजमानपद घेताना बीसीसीआयने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणार असल्याचं आयसीसीला सांगितलं होतं. मात्र याचा खर्च 30 कोटींपर्यंत जाणार होता. दुरदर्शनच्या पूर्णपणे बजेट बाहेरचं होतं.

राजीव गांधी यांच्या एका निर्णयाने अखेर मार्ग मोकळा

पंतप्रधान राजीव गांधी आणि अर्थमंत्री व्ही पी सिंह यांच्यामध्ये आलबेल नसल्याचं समोर येऊ लागलं. राजीव गांधी यांनी व्ही पी सिंह यांना संरक्षण खात्याची जबाबदारी दिली. त्यामुळे अर्थखात्यातून त्यांना मुक्त करण्यात आल होतं. मग काय बीसीसीआयचे अध्यक्ष साळवे यांनी परत एकदा धीरूभाईंसोबत संपर्क साधला. परक एकदा त्यांना स्पॉन्सरशीपसाठी विचारलं. त्यावेळी अंबानींनी याकडे वेगळ्या दृष्टीने पाहिलं. त्यांनी होकार देत भारत सरकारने भरलेले 4 कोटी परत करत आपल्याकडे संपूर्ण वर्ल्ड कप आयोजनाचे हक्क घेतले. परंतु त्यांनी त्यावेळी एक अट घातली होती, ती अट मान्य असेल तरच आपण वर्ल्ड कपची स्पॉन्सरशीप घेणार असल्याचं सांगितलं.

या अटीवर धीरूभाईंनी घेतली वर्ल्ड कपची स्पॉन्सरशीप

धीरूभाई अंबानी यांची अट मान्य करण्यात आली. वर्ल्ड कपमधील टीम इंडिया-पाकिस्तानमधील सामना पंतप्रधान राजीव गांधी यांच्यासोबत एकत्र बसून पाहण्याची ही अट होती. धारूभाई यांनी या वर्ल्ड कपमधून आपल्या रिलायन्सचे नाव देशासह जगभरात पोहोचवलं. रिलायन्स कंपनीने कितीही पैसे ओतला असता तरी इतक्या प्रमाणात प्रसिद्धी मिळणं कठीण होतं. कारण 1983 चा वर्ल्ड कप भारताने जिंकल्यामुळे क्रिकेटची क्रेज वाढली होती. शहरांपासून-खेड्यापाड्यात कपिल देव, सुनील गावसकर, मदन लाल, सय्यद किरमाणी आणि मोहिंदर अमरनाथ या खेळाडूंचे चाहते वाढले होते. नवीन पिढी क्रिकेटर होण्याची स्वप्न पाहू लागली होती. त्यामुळे वर्ल्ड कपची स्पॉन्सरशीप घेणं व्यावसायिक दृष्टीने रिलायन्ससाठी फायद्याचं ठरणारं होतं.

रिलायन्सचा खतरनाक जुगाड

भारतामध्ये ज्या मैदानांवर सामने होणार होते तिथल्या सर्व जाहिरातीचे हक्क रिलायन्सकडे होते. मार्केटमध्ये रिलायन्स नावाची जोरदार चर्चा होती. काही कंपन्यांनी हा मुद्दा बीसीसीआयकडे नेला. मात्र बीसीसीआय अध्यक्ष साळवे यांनी रिलायन्सची बाजू घेतली. ज्यवेळी आम्ही अडचणीत होतो त्यावेळी कोणी मदतीला धावलं नाही, असं सांगत हा मुद्दा मिटवला. आता सर्व झालं खरं पण आंतरराष्ट्रीय संघ भारतामध्ये आल्यावर त्यांच्या राहण्याची-खाण्याची व्यवस्था कशी करणार? हा खर्च बीसीसीआयला करावा लागणार होता. परंतु रिलायन्सने तिथेही पुढाकार घेतला. मात्र रिलायन्सचं एकही पंचतारांकित हॉटेल नसताना हे कसं शक्य होतं? इथेही रिलायन्सने चांगला जुगाड केला.

धीरूभाई अंबानी जगातील श्रीमंत व्यक्ती

धीरुभाई अंबानी हे त्यांच्या काळात भारतातील सर्वात मोठे श्रीमंत होते. 2002 मध्ये त्यांनी अंतिम श्वास घेतला तेव्हा ते जगातील 138 वे श्रीमंत होते. फोर्ब्सच्या आकडेवारीनुसार, तेव्हा त्यांची एकूण संपत्ती 2.9 अब्ज डॉलर इतकी होती. आताच्या डॉलर-रुपयात त्याचे मूल्य 24 हजार कोटी रुपये होते. सध्या रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजारातील भांडवल 17.50 लाख कोटी रुपये पोहचले आहे. तर त्यावेळी रिलायन्स इंडस्ट्रीजचे मूल्य 60 हजार कोटी रुपये होते.

1987 च्या वर्ल्ड कपचा धावता आढावा

ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, पाकिस्तान, भारत, वेस्ट इंडिज, श्रीलंका आणि झिम्बाब्बे या आठ संघांनी सहभाग घेतला होता. यामधील बाद फेरीमध्ये ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत आणि पाकिस्तान हे चार संघ गेले होते. इंग्लंडने भारताचा तर ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा पराव करत फायनल गाठली होती. फायनल सामना कोलकातामधील ईडन गार्डन मैदानावर पार पडला. यामध्ये ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा सात धावांनी पराभव करत विजय मिळवला होता.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.