On This Day : हुक मारके दिखा ! अख्तरने सेहवागला डिवचलं अन सचिनने शोएबच्या गोलंदाजीवर खेचला सिक्सर

2003 च्या वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात वेगवान गोलंदाज शोएब अख्तरच्या गोलंदाजीवर सचिनने मारलेला सिक्सर आजही प्रत्यके भारतीय क्रिकेट चाहत्याला लक्षात आहे.

On This Day : हुक मारके दिखा ! अख्तरने सेहवागला डिवचलं अन सचिनने शोएबच्या गोलंदाजीवर खेचला सिक्सर
2003 च्या वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात वेगवान गोलंदाज शोएब अख्तरच्या गोलंदाजीवर सचिनने मारलेला सिक्सर आजही प्रत्यके भारतीय क्रिकेट चाहत्याला लक्षात आहे.
Follow us
| Updated on: Mar 01, 2021 | 3:15 PM

सेंच्युरियन : टीम इंडिया आणि पाकिस्तान (Team india and Pakistan) पारंपरिक प्रतिस्पर्धी. उभय संघात होणारा क्रिकेट सामना हा दोन्ही संघासाठी युद्धापेक्षा कमी नसतो. या दोन्ही संघांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सामना खेळवण्यात आलेला नाही. पण आतार्यंत दोन्हा संघात खेळवण्यात आलेले सामने हे नेहमीच हायव्होल्टेज राहिले आहेत. सामन्यांमध्ये दोन्ही टीमच्या खेळाडूंमध्ये अनेकदा हमरीतुमरी पाहायला मिळाली आहे. अनेकदा काही खेळाडू हे एकमेकांच्या अंगावर धावून गेले होते. 2003 च्या वर्ल्ड कपमध्ये (World Cup 2003) पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात वेगवान गोलंदाज शोएब अख्तरच्या गोलंदाजीवर सचिनने मारलेला सिक्सर (Sachin six in 2003 world cup) आजही प्रत्यके भारतीय क्रिकेट चाहत्याला लक्षात आहे. आजपासून बरोबर 21 वर्षांपूर्वी हा सामना खेळवण्यात आला होता. या निमित्ताने आपण सिक्समागची इनसाईड स्टोरी जाणून घेणार आहोत. (world cup 2003 sachin tendulkar hit six on shoaib akhatar bowling on this day)

नक्की काय झालं होतं?

1 मार्च 2003 रोजी सेंच्युरियनमध्ये वर्ल्ड कपमधील 36 वा सामना हा टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात खेळवण्यात आला. एका बाजूला पाकिस्तानचे शोएब अख्तर, वसीम अकरम आणि वकार यूनुससारखे वेगवान गोलंदाज. तर दुसऱ्या बाजूला सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, सौरव गांगुली आणि राहुल द्रविडसारखे दिग्गज फलंदाज होते. पाकिस्तानने टॉस जिंकला. सइद अनवरच्या शतकी खेळीच्या जोरावर पाकिस्तानने भारताला विजयासाठी 274 धावांचं आव्हान दिलं.

सचिन-सेहवाग मैदानात

विजयी आव्हानाचं पाठलाग करण्यासाठी टीम इंडियाकडून सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग ही सलामी जोडी मैदानात आली. शोएब अख्तरने सुरुवातीपासूनच स्लेजिंग (डिवचणं) करण्याची सुरुवात केली. शोएब सेहवागला चिडवून आऊट करण्याच्या विचारात होता. शोएब सेहवागला “हुक मारके दिखा”, असं सारखं म्हणत होता. यावर सेहवाग शोएबला म्हणाला की “नॉन स्ट्राईकर एंडवर तुझा बाप उभा आहे. त्याला सांग.तो मारुन दाखवेल”. नॉन स्ट्राईक एंडवर सचिन उभा होता.

सचिनचा बाऊन्सरवर भन्नाट सिक्सर

अख्तरने सेहवागला दिलेलं चॅलेंज सचिनने स्वीकारालं. सचिननेने दुसऱ्या ओव्हरमधील पहिल्या चेंडू डॉट केला. दुसऱ्या चेंडूवर सचिनने एक धाव घेतली. तिसऱ्या बोलवर सेहवागने सिंगल रन घेतली. त्यामुळे पुन्हा सचिन स्ट्राईकवर आला. अख्तरचं चॅलेंज सचिनच्या डोक्यात होतं. सचिनने या चौथ्या चेंडूवर थर्ड मॅनच्या दिशेने खणखणीत सिक्स खेचला. यामुळे मैदानात सचिनचा जयघोष करण्यात आला. यानंतर सेहवाग अख्तरला जाऊन म्हणाला, “बाप बाप होता है, बेटा बेटा.” सचिनने मारलेला हा सिक्स आजही चाहत्यांना चांगलाच लक्षात आहे.

सेहवागला एका कार्यक्रमात स्लेजिंगबाबत काही प्रश्न करण्यात आले होते. या कार्यक्रमाला पाकिस्तानचे काही खेळाडू उपस्थित होते. यावेळेस सेहवागने हा वरील किस्सा सांगितला होता.

दरम्यान या सामन्यात सचिनचे शतक अवघ्या 2 धावांनी हुकले. सचिनने 98 धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर टीम इंडियाने पाकिस्तानचा 6 विकेट्सने पराभव केला होता. सचिन व्यतिरिक्त मोहम्मद कैफने 35, तर युवराज सिंह आणि द्रविडने अनुक्रमे नाबाद 50 आणि 44 धावा केल्या होत्या.

संबंधित बातम्या :

New Zealand vs Australia | ऑकलंडमधील लॉकडाऊनचा ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड टी 20 मालिकेवर परिणाम, सामन्यांच्या ठिकाणात बदल

India vs England T 20 Series | फिटनेस टेस्टमध्ये अनफिट, ‘या’ खेळाडूला टीम इंडियामधून डच्चू मिळण्याची शक्यता

( world cup 2003 sachin tendulkar hit six on shoaib akhatar bowling on this day)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.