AUS vs AFG | वर्ल्ड कपमधील तिसऱ्या उलटफेरसाठी वानखेडे सज्ज, ऑस्ट्रेलिया-अफगाणिस्तान भिडणार
AUS vs AFG : आज वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान संघ एकमेकांना भिडणार आहेत. अफगाणिस्तान संघ आताही सेमी फायनलच्या रेसमध्ये असून तिसऱ्या उलटफेरसाठी सज्ज आहे.
मुंबई : वर्ल्ड कप 2023 मधील 39 वा सामना ऑस्ट्रेलिया आणि अफगाणि्स्तानमध्ये होणार आहे. या सामन्यामध्ये अफगाणिस्तान संघाने आणखी एक उलटफेर केला तर सेमी फायनलच्या रेसमध्ये आणखी चुरस होण्याची शक्यता आहे. जर ऑस्ट्रेलियाने आजचा सामना जिंकला तर सेमी फायनलमध्ये जाणारा तिसरा संघ ठरणार आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये दुपारी दोन वाजता सामन्याला सुरूवात होणार आहे.
अफगाणिस्तान संघाने सात सामन्यांमध्ये 4 सामने जिंकत पॉईंट टेबलमध्ये सहाव्या स्थानावर आहेत. तर ऑस्ट्रेलिया संघाने सात सामन्यांमध्ये पाच सामन्यात विजय मिळवत पॉईंट टेबलमध्ये तिसऱ्या स्थानी आपला जागा पक्की केलीये. आजचा सामना जिंकला तर अफगाणिस्तानचा संघ सेमी फायनलमध्ये जवळपास आपली जागा निश्चित करेलं. मात्र त्यासाठी त्यांना कागांरूंना हरवावं लागणार आहे.
सुरुवातीचे दोन सामने सोडले तर कांगारूंनी कात टाकत सलग पाच विजय मिळवले आहेत. त्यामुळे अफगाणिस्तान संघासाठी हे लक्ष्य इतकं सोपं नसणार आहे. पण हेसुद्धा विसरू नका की याच अफगाणिस्तान संघाने वर्ल्ड कप विनर इंग्लंड संघाचा पराभव केला आहे.
दरम्यान, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांना पराभूत करत उर्वरित दोन्ही सामने जिंकले तर अफगाणिस्तान पॉईंट टेबलमध्ये १२ गुणांसह जागा मिळवू शकतं. मात्र एकही सामन्यात त्यांना विजय मिळवता नाही आला तर ते सेमी फायनलच्या रेसमधून बाहेर पडतील. ऑस्ट्रेलियाचा आजचा सामना अफगाणिस्तान आणि दुसरा सामना पाकिस्तान संघासोबत आहे.
ऑस्ट्रेलिया संघ जोश इंग्लिस (विकेटकीपर), पॅट कमिन्स (C), ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस स्टॉइनिस, मिचेल स्टार्क, अॅडम झाम्पा, जोश हेझलवूड, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, शॉन अॅबॉट, अॅलेक्स कॅरी
अफगाणिस्तान संघ हशमतुल्ला शाहिदी (C), इकराम अलीखिल रहमानउल्ला गुरबाज, इब्राहिम झदरन, रहमत शाह, अजमतुल्ला उमरझाई, मोहम्मद नबी, रशीद खान, मुजीब उर रहमान, फजलहक फारुकी, नूर अहमद, नजीबुल्ला झदरन, नवीन-उल-हक, अब्दुल रहमान, रियाझ हसन