World Cup 2023 : वर्ल्ड कप मध्ये आता डीआरस घेता येणार नाही, ICC ने घेतला मोठा निर्णय!

2011 साली झालेल्या वर्ल्ड कपनंतर भारतामध्ये पहिल्यांदा वर्ल्ड कप होणार आहे. त्यामुळे रोहित शर्माला आपल्या नेतृत्त्वाखाली ट्रॉफी जिंकून देण्याची सुवर्णसंधी आहे. मात्र वर्ल्ड कप 2023 मध्ये डीआरएसचा वापर करता येणार नाही.

World Cup 2023 : वर्ल्ड कप मध्ये आता डीआरस घेता येणार नाही, ICC ने घेतला मोठा निर्णय!
Follow us
| Updated on: Apr 07, 2023 | 7:55 PM

मुंबई : अवघ्या काही दिवसांवर वनडे वर्ल्ड कप 2023 आला असन यंदाचा वर्ल्ड कप भारतामध्ये होणार असल्याने टीम इंडिया प्रबळ दावेदार मानलं जात आहे. 2011 साली झालेल्या वर्ल्ड कपनंतर भारतामध्ये पहिल्यांदा वर्ल्ड कप होणार आहे. त्यामुळे रोहित शर्माला आपल्या नेतृत्त्वाखाली ट्रॉफी जिंकून देण्याची सुवर्णसंधी आहे. मात्र वर्ल्ड कप 2023 मध्ये डीआरएसचा वापर करता येणार नाही.

डीआरएसचा वापर का करता येणार नाही?

वर्ल्ड कप 2023 ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार आहे. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये 10 संघ सहभागी होणार आहेत. या वर्ल्ड कपची पात्रता फेरी जून-जुलैमध्ये होणार आहे. क्रिकट्रॅकरने दिलेल्या माहितनुसार पात्रता फेरीमध्ये होणाऱ्या सामन्यांमध्ये संघांना डीआरएसचा वापर करता येणार नाही. त्यासोबतच कोणत्याही रन आऊटचा निर्णय हा तिसरे पंच घेणार आहेत. यावर आयसीसीनेही शिक्कामोर्तब केलं असल्याची माहिती समजत आहे. पात्रता फेरी झिम्बाब्वेमध्ये खेळवली जाणार आहे.

वनडे वर्ल्ड कपची पात्रता फेरी 18 जून ते 9 जूलै यावेळी 10 संघांमध्ये होणार आहे. रँकिंगमध्ये तळाशी असलेल्या नेदरलँड, झिम्बाब्वे, श्रीलंका, वेस्ट इंडिज आणि आयर्लंड किंवा दक्षिण आफ्रिका यांच्यामधील एक संघ तर नेपाळ, ओमान आणि स्कॉटलंड हे आयसीसी विश्वचषक क्रिकेट लीग 2 मधील शीर्ष तीन संघ होते, तर युनायटेड स्टेट्स आणि संयुक्त अरब अमिराती हे क्वालिफायर प्लेऑफमधील शीर्ष दोन संघ म्हणून होते. हे सर्व संघ डीआरएस वापरू शकत नाही.

दरम्यान, 1983 मध्ये भारताने पहिला वर्ल्ड कप कपिल देव यांच्या नेतृत्त्वाखाली जिंकला होता. त्यानंतर भारताल दुसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकण्यासाठी 28 वर्ष वाट पाहावी लागली होती. 2011 मध्ये धोनी अँड कंपनीने हा कारनामा केला होता. आता तिसऱ्यांदा वर्ल्डच्या ट्रॉफीवर नाव कोरण्यासाठी रोहित शर्माला संधी आहे. त्यामुळे रोहित अंँड कंपनीकडून 130 कोटी देशवासियांना अपेक्षा आहेत.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.