ENG vs NZ : पराभवानंतर इंग्लंडचा कर्णधार जो रूटने व्यक्त केला संताप, “असा पराजय स्वीकारणं म्हणजे..”
ODI World Cup 2023, NZ vs ENG : वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने विजयी सलामी दिली. तसेच गेल्या वर्ल्डकप स्पर्धेतील अंतिम फेरीचा वचपा देखील काढला. पराभवानंतर इंग्लंडचा कर्णधार जो रूट याने संताप व्यक्त केला.
मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील इंग्लंड विरुद्धचा सामना न्यूझीलंडने एकतर्फी जिंकला. सुरुवातीला हा सामना अतितटीचा होईल असं सांगण्यात येत होतं. मात्र न्यूझीलंडने सर्व अंदाज धुळीस मिळवले. तसेच वनडे वर्ल्डकप 2019 स्पर्धेतील अंतिम फेरीचा वचपा देखील काढला आहे. न्यूझीलंडने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम इंग्लंडला फलंदाजीचं आमंत्रण दिलं. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 9 गडी 282 धावा केल्या आणि विजयसाठी 283 धावांचं आव्हान दिलं. मात्र हे आव्हान इंग्लंडने एक गडी गमवून सहज पूर्ण केलं. त्यामुळे न्यूझीलंडने मागचा वर्ल्डकपचा वर्ल्डकप पराभवाचा वचपा काढल्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. न्यूझीलंडच्या डेवॉन कॉनव्हे आणि रचिन रविंद्र यांनी इंग्लंडच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. तसेच विकेट घेण्यासाठी इंग्लंडच्या गोलंदाजांची चांगलीच दमछाक झाली. यानंतर कर्णधार जो रूट याने संताप व्यक्त केला आहे.
काय म्हणाला इंग्लंडचा कर्णधार जो रूट?
“आजचा दिवस खरंच निराशाजनक होता. न्यूझीलंडकडून पराभव स्वीकारणे कठीण आहे. पहिला पराभव असून अजून स्पर्धा बागी आहे. आमच्या संघातील खेळाडूंनी भरपूर क्रिकेट खेळले आहे. याआधीही आम्ही संघांना अशाप्रकारे पराभूत केले आहे. यापूर्वीही आम्हाला असेच हरवले आहे. पण आमची खेळी हवी तशी झाली नाही हेही तितकंच खरं आहे. आम्ही 330 धावांचा अंदाज बांधला होता. पण झालं नाही. तसेच न्यूझीलंडच्या फलंदाजीबाबत अशी काही कल्पना नव्हती. आता पुढच्या स्पर्धेत आम्ही सकारात्मकतेने पुढे जाऊ.” असं इंग्लंडचा कर्णधार जो रुट याने सांगितलं.
इंग्लंडला पराभूत करत न्यूझीलंडच्या पारड्यात दोन गुण पडले आहेत. तसेच रनरेट +2.149 इतका आहे. त्यामुळे उपांत्य फेरीत या सरासरीचा नक्कीच फायदा होईल. त्यामुळे स्पर्धेतील एक कठीण पेपर सोडवला असंच म्हणावं लागेल. न्यूझीलंडचा पुढचा सामना नेदरलँडशी 9 ऑक्टोबरला होणार आहे. तर इंग्लंड 10 ऑक्टोबरला बांगलादेशशी सामना करणार आहे.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): जॉनी बेयरस्टो, डेविड मलान, जो रूट, हॅरी ब्रूक, जोस बटलर (कर्णधार/विकेटकीपर), लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, सॅम कुरन, ख्रिस वोक्स, आदिल रशीद, मार्क वुड
न्यूझीलंड (प्लेइंग इलेव्हन): डेव्हॉन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (कर्णधार/विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मॅट हेन्री, मिचेल सँटनर, जेम्स नीशम, ट्रेंट बोल्ट