ENG vs BAN : बांगलादेश विरुद्धच्या सामन्यापूर्वी इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने केले गंभीर आरोप, “धर्मशाळेतीन मैदान…”

World Cup 2023, ENG vs BAN : इंग्लंड विरुद्ध बांगलादेश यांच्यात दुसरा सामना होणार आहे. पहिल्या सामन्यात बांगलादेशने अफगाणिस्तानला पराभूत केलं होतं. तर इंग्लंडला पराभवाची धूळ चाखावी लागली होता. त्यामुळे हा सामना इंग्लंडसाठी महत्त्वाचा आहे. पण या सामन्यापूर्वी इंग्लंडच्या कर्णधार असं काही बोलून गेला

ENG vs BAN : बांगलादेश विरुद्धच्या सामन्यापूर्वी इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने केले गंभीर आरोप, धर्मशाळेतीन मैदान...
ENG vs BAN : धर्मशाळा मैदानावरून वादाला फोडली, इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने असं काही बोलून गेला आणि...Image Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Oct 09, 2023 | 4:28 PM

मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धा प्रत्येक एका सामन्यातनंतर रंगतदार वळणारवर पोहोचत आहे. प्रत्येक विजय आणि पराभवानंतर गुणतालिकेत उलथापालथ होत आहे. दुसऱ्या टप्प्यात इंग्लंड आणि बांगलादेश यांच्यात सामना होणार आहे. इंग्लंडला या स्पर्धेत कमबॅकसाठी बांगलादेश विरुद्धचा सामना जिंकावाच लागणार आहे. पण हा सामना सुरु होण्यापूर्वीच वादाला फोडणी मिळाली आहे. हा वाद धर्मशाळेच्या मैदानावरून होत आहे. इंग्लंड आणि बांगलादेश यांच्यात धर्मशाळेच्या एचपीसीपीए मैदानावर सामना होणार आहे. या दरम्यान इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर याने गंभीर आरोप लागवला आहे. त्यामुळे एचपीसीपीएवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर याने सामन्यापूर्वी हे मैदान खराब असल्याचं सांगितलं आहे.

काय म्हणाला जोस बटलर?

जोस बटलरने सांगितलं की, “धर्मशाळा मैदानाची आउटफिल्ड खराब आहे. त्यामुळे मैदानावर चेंडू अडवण्यासाठी उड्या मारताना विचार करावा लागणार आहे. जेव्हा तुम्ही देशासाठी खेळता तेव्हा कोणताच विचार करत नाही. प्रत्येक धाव वाचवण्यासाठी धडपड करत असतो. पण धर्मशाळा मैदानाची आउटफिल्ड तितकी चांगली नाही.”

अफगाणिस्तान बांगलादेश सामन्यातही झाला होता वाद

बांगलादेश अफगाणिस्तान सामन्यातही आउटफिल्ड बाबत असाच प्रश्न उपस्थित केला होता. मुजीब जादरान याने उडी मारली तेव्हा गवत पूर्णपण निघालं होतं. मुजीबचं नशीब चांगलं होतं नाही तर त्याला जबर दुखापत झाली असती, असं अफगाणिस्तानच्या कोचने सांगितलं होतं. धर्मशाळेतील मैदानाचं नुकतंच नुतनीकरण करण्यात आलं आहे. पण तरीही आउटफिल्डबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

भारताचा या मैदानावर 22 ऑक्टोबरला सामना होणार आहे. हा सामना न्यूझीलंड सोबत होणार आहे. त्यामुळे या सामन्यात काळजी बाळगणं गरजेचं आहे. कारण एखादा खेळाडू दुखापतग्रस्त झाला तर संपूर्ण संघाचं चित्र पालटू शकतं. टीम इंडियाचं या आउट फिल्डबाबत काय मत आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

इंग्लंडचा संघ : इंग्लंड संघ: जॉनी बेयरस्टो, डेविड मलान, जो रूट, हॅरी ब्रूक, मोईन अली, जोस बटलर (विकेटकीपर/कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन, ख्रिस वोक्स, आदिल रशीद, मार्क वुड, बेन स्टोक्स, गस ऍटकिन्सन, डेव्हिड विली, रीस टोपली.

दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'.
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?.
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप.
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त.
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट.
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.