World Cup 2023 Points Table | भारत सेमी फायनलपासून फक्त चार पाऊल दूर, दोन मोठे अडथळे, समजून घ्या!

वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाने सलग तिसरा विजय मिळवतल हॅट्रीक केली आहे. भारतासाठी आता फक्त चार टप्पे बाकी आहेत त्यानंतर सेमी फायनलमध्ये भारताची जागी पक्की मानली जात आहे. दोन मोठे अडथळे आहेत ते कोणते जाणून घ्या.

World Cup 2023 Points Table | भारत सेमी फायनलपासून फक्त चार पाऊल दूर, दोन मोठे अडथळे, समजून घ्या!
Follow us
| Updated on: Oct 15, 2023 | 7:46 PM

मुंबई : वर्ल्ड कप 2023 सुरू होण्याआधी अनेक आजी माजी खेळाडूंनी सेमी फायनल फेरी गाठणाऱ्या संघांमध्ये भारताचं नावंही होतं. भारतेनेही सलग तीन सामने जिंकत आपली ताकद दाखवून दिली आहे. भारताने फक्त तीन सामने जिंकले नाहीतर चांगल्या रनरेटसह पहिल्या स्थानी झेप घेतली आहे. रोहित शर्मा याच्या नेतृत्त्वाखाली आतापर्यंत संघाने कमाल कामगिरी केलीये. आता सेमी फायनलमध्ये स्थान पक्क करण्यासाठी भारतीय संघ चार पाऊल दूर आहे. आता इथून पूढचं गणित नेमकं कसं असणार जाणून घ्या.

सेमी फायनलचं गणित कसं असणार जाणून घ्या!

भारतीय संघाला हरवण्यासाठी विरोधी संघासाठी सोपं राहिलेलं नाही. सगळे खेळाडू तोडीस तोड प्रदर्शन करताना दिसत आहेत. भारताची टॉप ऑर्डर पाहिली तर रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि के. एल. राहुल यांच्यापैकी कोणीही चाललं तरी विरोधी संघांसाठी सामना जड जाताना दिसत आहे. भारतीय संघाने आतापर्यंत सलग तीन सामने जिंकले असून आता सेमी फायनल गाठण्यापासून फक्त चार पाऊलं दूर आहेत.

भारताल आणखी 6 सामने खेळायचे असून त्यामध्ये बांगलादेश, न्यूझीलंड, इंग्लंड, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड या संघांसोबत हे सामने बाकी आहेत. भारताने यामधील चार सामने जिंकले तर सेमी फायनलमधील भारतीय संघाचं सेमी फायनलमध्ये स्थान पक्क मानलं जात आहे.  सहा संघांपैकी जे दोन संघ आहेत त्यामधील न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका या दोन संघांसोबत भारतीय संघ अडचणीत येऊ शकतो. न्यूझीलंडने भारतीय संघाला बाद फेरीमध्ये अनेकदा पराभूत केलं आहे. आतापर्यंत किवींनीही सलग तीन सामने जिंकले असून दुसऱ्या स्थानावर आहेत.

रोहित शर्मा (C), हार्दिक पंड्या (VC), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (W), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन, सूर्यकुमार यादव.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.