World Cup 2023 : पाकिस्तानसमोर आयसीसी झुकलं, टीम इंडियाला मोठा झटका
पाकिस्तानने वर्ल्ड कप बाबतीत एक अट आयसीसीला घातली होती होती ती अट ICC ने मान्य केलीये. मात्र याचा टीम इंडियाला फटका बसण्याची शक्यता आहे.
मुंबई : वर्ल्ड कप 2023 चे वारे वाहू लागले असून आयसीसीकडून वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. पाकिस्तान आणि भारतामधील सामना रद्द होऊ नये यासाठी आयसीसी सर्व प्रयत्न करताना दिसत आहे. आशिया कपमध्ये पाकिस्तानमध्ये खेळण्यावर टीम इंडियाने नकार दिला होता. यावर तोडगा म्हणून बाकी सामने श्रीलंकेमध्ये ठेवले आहेत. मात्र अशातच पाकिस्तानने वर्ल्ड कप बाबतीत एक अट आयसीसीला घातली होती होती ती अट ICC ने मान्य केलीये. मात्र याचा टीम इंडियाला फटका बसण्याची शक्यता आहे.
नेमकी कोणती मागणी?
मुंबईत न खेळण्याच्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (पीसीबी) मागणीला सहमती दिल्यानंतर आयसीसीने आणखी एक बदल केला आहे. पाकिस्तान संघ एकाही आशियाई संघासोबत सराव सामना खेळणार नाही, अशी अट पाकिस्ताने आयसीसीला घातली होती. इनसाइडस्पोर्टने दिलेल्या माहितीनुसार न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाकिस्तान संघ सराव सामना खेळणार आहे. त्यांचा सराव सामना आशियाई संघांसोब होणार नाही त्यामुळे याचा फटका टीम इंडियाला बसण्याची शक्यता आहे.
आयसीसीने जाहीर केलेल्या वेळापत्रकामध्ये पाकिस्तान संघाचे सराव सामने हे आशियाई संघांसोबत होणार नाहीत. कारण वर्ल्ड कपधील सामने हे होणारच आहेत, मात्र पाकिस्तानला स्पिनर्सची भीती असल्याने त्यांनी आयसीसीकडे हैदराबादमधील मैदानावर ठेवू नये अशी मागणी केली होती. मात्र आयसीसीने फक्त सराव सामना आशियाई देशांसोबत ठेवला नाही.
दरम्यान, 15 ऑक्टोबरला भारतीय संघाचा पाकिस्तानविरुद्ध हाय व्होल्टेज सामना होणार आहे. या सामन्याची क्रिकेट चाहते मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र, त्याआधी हे दोन्ही संघ आशिया कपमध्ये एकमेकांना भिडणार आहेत. वर्ल्डकपमधील भारत-पाक सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट मैदानावर होणार आहे.