World cup 2023 | टीम इंडिया-पाकिस्तान सामन्यात मोठा बदल! जाणून घ्या अपडेट

India vs Pakistan Icc World Cup 2023 | टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात वर्ल्ड कपमध्ये होणाऱ्या सामन्याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष लागलंय. या सामन्याबाबत आयसीसी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.

World cup 2023 | टीम इंडिया-पाकिस्तान सामन्यात मोठा बदल! जाणून घ्या अपडेट
Follow us
| Updated on: Jul 31, 2023 | 5:42 PM

मुंबई | आयसीसी वनडे वर्ल्ड कप स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. सलामीचा आणि अंतिम सामना हा अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. टीम इंडिया वर्ल्ड कप मोहिमेतील सुरुवात ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्याने करणार आहे. टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना हा 8 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. तर त्यानंतर टीम इंडियाचा दुसरा सामना अफगाणिस्तान विरुद्ध होणार आहे. या सामन्याचं आयोजन दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये केलं गेलय.  तर त्यानंतर होणारा सामना हा संपूर्ण क्रिकेट विश्वासाठी अतिशय महत्तावाचा आहे.

टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात   15 ऑक्टोबर रोजी पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. या सामन्यासाठी क्रिकेट चाहत्यांना उत्सूकता लागून राहिली आहे. वर्ल्ड कप पेक्षा या सामन्याबाबत क्रिकेट चाहते उत्सूक झाले आहेत. मात्र या सामन्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. या सामन्याची तारीख बदलण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे.मिळालेल्या माहितीनुसार, हा सामना 15 ऐवजी 14 ऑक्टोबरला खेळवण्यात येऊ शकतो. म्हणजेच नियोजित तारखेच्या एक दिवस आधी ही मॅच खेळवण्यात येऊ शकते.

नक्की कारण काय?

वर्ल्ड कप दरम्यान नवरात्रीचा सण असणार आहे. गुजरातमध्ये मोठ्या उत्साहात नवरात्री साजरी करण्यात येते. तसेच ठिकठिकाणी गरबा आणि दांडीयाचं आयोजन केलं जातं. याच नवरात्री उत्सवामुळे टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान सामन्याची तारीख बदलण्यात येणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे.

हे सुद्धा वाचा

सुरक्षा यंत्रणांनी सामन्याची तारीख बदलण्यात यावी,असा सल्ला बीसीसीआयला दिला दिला होता. नवरात्री आणि त्यात हा हायव्होल्टेज सामना यामुळे मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून तारीखेत बदल करण्याचा विचार केला गेल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे.

आणखी काय बदल होणार?

टीम इंडिया-पाकिस्तान सामन्याच्या तारखेसह अनेक बदल हे वर्ल्ड कप वेळापत्रकात करण्यात येणार आहेत. या सर्व बदलांबाबत 31 जुलैपर्यंत घोषणा करण्यात येऊ शकते. वेळापत्रकात बदल होऊ शकतात, असं बीसीसीआय सचिव यांनी नमूद केलं होतं. त्यामुळे आता कशाप्रकारे या वेळापत्रकात बदल होतात, याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष लागून राहिलं आहे.

रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं.
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?.
बीड सरपंचाच्या हत्येची टीप देणाऱ्यासह 3 फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या
बीड सरपंचाच्या हत्येची टीप देणाऱ्यासह 3 फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका डॉक्टरलाच अटक, त्याची भूमिका काय?
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका डॉक्टरलाच अटक, त्याची भूमिका काय?.
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दादांचे आमदार एकवटले?या आमदारांनी केली मागणी
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दादांचे आमदार एकवटले?या आमदारांनी केली मागणी.
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले...
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले....
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक.
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?.