World Cup 2023 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे टॉप 5 गोलंदाज, एकही भारतीय नाही!
Most Wickets taker World Cup : प्रत्येक संघाकडे तोडीस तोड बॉलर असल्याचं पाहायला मिळत आहे. जर इतिसावर नजर मारली तर वर्ल्डकपमध्ये सर्वात जास्त विकेट घेण्याच्या यादीमध्ये एकाही भारतीयाचा समावेश नाही. पाहा कोण आहेत मग ते टॉप 5 गोलंदाज
मुंबई : आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023च्या थराराला सुरू व्हायला काहीच दिवस बाकी आहेत. यंदाचा वर्ल्ड कप भारतीयांसाठी खास आहे कारण भारताकडे यंदाच्या वर्ल्ड कपचं यजमानपद आहे. यंदाच्या वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक विकेट्ससाठी चुरस लागलेली दिसणार आहे. प्रत्येक संघाकडे तोडीस तोड बॉलर असल्याचं पाहायला मिळत आहे. जर इतिसावर नजर मारली तर वर्ल्डकपमध्ये सर्वात जास्त विकेट घेण्याच्या यादीमध्ये एकाही भारतीयाचा समावेश नाही. सर्वाधिक विकेट्स घेणारे टॉप 5 गोलंदाज कोण आहेत जाणून घ्या.
सर्वाधिक विकेट घेण्याच्या यादीतील पाचव्या स्थानी मिचेल स्टार्क असून यंदाच्या वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा तो एकमेव गोलंदाज आहे. स्टार्कने आतापर्यंत 49 विकेट्स असून त्याने जर यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये 23 विकेट्स घेतल्या तर वर्ल्ड कप मध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम त्याच्या नावावर होईल. वर्ल्ड कपमध्ये स्टार्कने तीन वेळा पाचपेक्षा जास्त विकेट्स घेतल्या आहेत.
या यादीमध्ये चौथ्या स्थानी पाकिस्तान संघाचा माजी खेळाडू वसीम अक्रम आहे. वसीमच्या नावावर 55 विकेट्स असून त्याने अवघ्या 38 डावांमध्ये ही कामगिरी केली आहे. अक्रमने त्याचा शेवटचा वर्ल्ड कप 2003 साली खेळला होता. तिसऱ्या स्थानी श्रीलंकेचा माजी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा असून त्याने 29 सामन्यात 56 विकेट्स घेतल्या आहेत. अवघ्या 38 धावा देत त्याने 6 विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती.
दरम्यान, दुसऱ्या क्रमांकावर श्रीलंकेचाच मुरलीधरन असून त्याने 68 विकेट्स घेतल्या आहेत. वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या टॉप 5 मध्ये तो एकमेव स्पिनर आहे. 19 धावा देत त्याने 4 विकेट्स त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. 2011 साली झालेल्या श्रीलंका-भारत सामन्यामध्ये मुरलीधर संघाचा खेळाडू होता. या यादीमध्ये पहिल्या स्थानी ऑस्ट्रेलिया संघाचा ग्लेन मॅकग्रा असून त्याने वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक 71 विकेट्स घेतल्या आहेत. वर्ल्ड कपमध्ये 19 धावा देत 7 विकेट्स ही त्याची बेस्ट कामगिरी आहे. इतकंच नाहीतर ग्लेन मॅकग्राने वर्ल्ड कपमध्ये तब्बल 42 ओव्हर्स मेडन टाकल्या आहेत.