IND vs AUS Final : ऑस्ट्रेलियाचा चिडीचा डाव पाहून गावस्कर भडकले, केएल राहुलला बाद करण्यासाठी अशी केली खेळी
World Cup 2023, IND vs AUS Final : अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने मजबूत पकड मिळवली आहे. आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाल्यानंतर टीम इंडियाला 200 धावा करताना दमछाक झाल्याची पाहायला मिळाली. त्यामुळे भारतावर दबाव वाढवण्यासाठी ऑस्ट्रेलियाने खेळी केली.
मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत टीम इंडिया पूर्णपणे बॅकफूट गेल्याचं पाहायला मिळालं. सुरुवातीला रोहित शर्माने चांगली सुरुवात करून दिली. पण त्यानंतर गाडी रुळावरून घसरली. शुबमन गिलनंतर रोहित शर्मा बाद झाला. त्यामुळे टीम इंडिया दबावात असताना श्रेयस अय्यर तंबूत परतला. त्यामुळे मधल्या फळीत विराट कोहली आणि केएल राहुल यांच्यावर सावध खेळण्याची जबाबदारी आली. विराट कोहली 63 चेंडूत 54 धावा करून बाद झाला आणि रवींद्र जडेजा फलंदाजी वर आला. पण तो सुद्धा काही खास करू शकला नाही. 22 चेंडूत 9 धावा करून बाद झाला. त्यामुळे टीम इंडियावर दबाव असल्याची पूर्ण जाणीव ऑस्ट्रेलियन संघाला होती. त्यामुळे आणखी दबाव टाकण्यासाठी ऑस्ट्रेलियन संघाने नवीन रणनिती आखली. सेट असलेल्या केएल राहुल याला बाद करण्यासाठी आणि रिव्ह्यू कायम ठेवण्यासाठी पंचांकडे अपील केली.
केएल राहुलच्या स्टंपिंगसाठी स्क्वेअर लेगच्या पंचांकडे अपील केली. ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या जोरदार अपीलला दाद देत स्क्वेअर लेगला उभ्या असलेल्या पंचांनी थर्ड अम्पायरकडे इशारा केला. तिसऱ्या पंचांनी तंत्राद्वारे पाहताना पहिल्यांदा बॅटला कट लागली की नाही याची तपासणी केली. त्यानंतर स्टंपिंगसाठी क्रिजमध्ये पाय होता की नाही याची तपासणी केली. पण केएल राहुलचा पूर्ण पाय क्रिजमध्ये होता. त्यामुळे ते चित्र पाहून समालोचक सुनील गावस्कर वैतागले.
काय म्हणाले सुनील गावस्कर?
‘ही कोणत्या प्रकारची पंचगिरी आहे. पंचांनी कट नसल्याचं सांगितलं आणि ऑस्ट्रेलियाने स्टंपिंगसाठी स्क्वेअर लेगच्या पंचांकडे दाद मागितली. जर केएल राहुलचा पाय क्रिजमध्ये होता तर तिसऱ्या पंचांकडे दाद मागण्याची काय गरज होती. हे तर रिव्ह्यू वाचवून आणि कट लागली असेल बाद घेण्यासाठी ऑस्ट्रेलियन खेळाडूंची चाल आहे. नशिबाने कट नव्हती म्हणून बरं झालं. नाही तर स्टपिंगसाठी अपील आणि कट आऊट झाला असता.’, असं सुनील गावस्कर यांनी सांगितलं.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज
ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, जोश इंग्लिस (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स (कर्णधार), अॅडम झाम्पा, जोश हेझलवूड