IND vs AUS : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यात हे 11 खेळाडू ठरतील बेस्ट, पिच रिपोर्ट आणि इतर बाबी
World Cup 2023, IND vs AUS : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात वनडे वर्ल्डकपमधील पहिला सामना होत आहे. दोन्ही संघ तगडे असून तुल्यबल सामना होणार यात शंका नाही. पण या सामन्यात काही खेळाडू आपली छाप नक्कीच सोडतील.
मुंबई : वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला सामना होत आहे. दोन्ही संघांसाठी हा पेपर कठीण असणार आहे. कारण दोन्ही संघ जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत. चेन्नईच्या एमए चिदंबरम मैदानात हा सामना रंगणार आहे.नुकतीच भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 3 वनडे सामन्यांची मालिका पार पडली होती. ही मालिका भारताने 2-1 ने जिंकली होती.पण सराव सामन्यात ऑस्ट्रेलियाने आपली छाप सोडली आहे. पाकिस्तानसमोर 351 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पाकिस्तान कसंबसं करत टार्गेटपर्यंत पोहोचण्यासाठी धडपडत होती. पण संपू्र्ण संघ 337 धावांवर बाद झाला आणि ऑस्ट्रेलियाने 14 धावांनी विजय मिळवला.
पिच रिपोर्ट
एमए चिदंबरम स्टेडियम फलंदाजीसाठी पुरक आहे. पण वेगवान गोलंदाजांना काही संधी मिळू शकतात. या मैदानावर धावांचा पाठलाग करणं सोपं जातं असा इतिहास आहे. त्यामुळे नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करणं पसंत केलं जाईल. त्यामुळे नाणेफेकीवर बरंच काही अवलंबून असणार आहे.
हे खेळाडू ठरू शकतात बेस्ट
कर्णधाराची निवड करताना त्याचे क्षमताही तितकीच महत्त्वाची आहे. रोहित शर्मा, विराट कोहली आणि ग्लेन मॅक्सवेल सध्या फॉर्मात आहेत. त्यामुळे त्यांच्यापैकी एकाची निवड बेस्ट ठरू शकते. पण काही खेळाडू जर तरची भूमिकेत असतात त्यात एलेक्स कॅरे आणि इशान किशन हे दोघं असतील. टॉप पिकअप खेळाडूंमध्ये मिचेल मार्श, डेविड वॉर्नर आणि जसप्रीत बुमराह असतील. बजेट खेळाडूंमध्ये रवींद्र जडेजा, कुलदीप यादव आणि मिचेल स्टार्क असतील.
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (विकेटकीपर), विराट कोहली, डेविड वॉर्नर, मिचेल मार्श, रवींद्र जडेजा, हार्दिक पांड्या, ग्लेन मॅक्सवेल, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मिशेल स्टार्क
संभाव्य प्लेइंग इलेव्हन
टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, इशान किशन, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादव
ऑस्ट्रेलिया : स्टीव्ह स्मिथ, डेविड वॉर्नर, मार्कस स्टोयनिस, मार्नस लाबुशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, एलेक्स कॅरे (विकेटकीपर), पॅट कमिन्स, जोश हेझलवूड, एडम झम्पा, मिचेल स्टार्क