IND vs PAK | टीम इंडिया-पाकिस्तान हायव्होल्टेज सामन्यासाठी बीसीसीआयकडून 14 हजार तिकीटं, असं मिळवा
India vs Pakistan Match Ticket Icc World Cup 2023 | ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्याआधीच बीसीसीआयने टीम इंडियाच्या क्रिकेट चाहत्यांची पाकिस्तान विरुद्धच्या महामुकाबल्याच्या तिकीटाची सोय करुन दिली आहे. जाणून घ्या ही तिकीटं कशी मिळवायची.
मुंबई | टीम इंडिया आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मोहिमेची सुरुवात रविवार 8 ऑक्टोबरपासून करत आहे. टीम इंडियासमोर पहिल्याच सामन्यात सर्वाधिक 5 वेळा विश्व विजेता असलेल्या ऑस्ट्रेलियाचं आव्हान आहे. टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही संघांचा या वर्ल्ड कपमधील पहिलाच सामना आहे. रोहित शर्मा याच्याकडे टीम इंडियाची धुरा आहे. तर पॅट कमिन्स ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व करणार आहे. या सामन्याला दुपारी 2 वाजता सुरुवात होणार आहे. सामन्याचं आयोजन हे चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. टीम इंडियाच्या पहिल्या सामन्यासाठी क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.
टीम इंडियाच्या या सामन्याआधी बीसीसीआयने मोठी घोषणा केली आहे. टीम इंडियाचा वर्ल्ड कपमधील दुसरा सामना हा अफगाणिस्तान विरुद्ध आहे. तर तिसरा सामना हा 14 ऑक्टोबर रोजी आहे. या सामन्याची साऱ्या क्रिकेट विश्वाला प्रतिक्षा आहे. कारण या सामन्यात 2 कट्टर प्रतिस्पर्धी टीम इंडिया-पाकिस्तान भिडणार आहेत. क्रिकेट विश्वातील सर्वात मोठा सामना हा सर्वात मोठ्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. या सामन्यासाठी क्रिकेट चाहते हे विदेशातून अहमदाबादमध्ये येणार आहेत. स्टेडियमच्या आसपास परिसरातील हॉटेल बूकही झाले आहेत.
टीम इंडिया-पाकिस्तान सामन्याच्या तिकीटाची बोंब आहे. क्रिकेट चाहते दुप्पट तिप्पट किंमत मोजून तिकीट खरेदी करण्यासाठी तयार आहेत. मात्र तिकीट मिळत नाहीये. मात्र बीसीसीआयने क्रिकेट चाहत्यांना मोठा दिलासा दिला आहे. बीसीसीआय टीम इंडिया-पाकिस्तान या सामन्याचे 14 हजार तिकीटांची विक्री करणार आहे. बीसीसीआयने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, क्रिकेट चाहत्यांना टीम इंडिया-पाकिस्तान सामन्याची तिकीटं रविवारी 8 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 नंतर खरेदी करता येणार आहेत. https://tickets.cricketworldcup.com या वेबसाईटवरुन क्रिकेट चाहते तिकीट मिळवू शकतात.
बीसीसीआयची मोठी घोषणा
🚨 NEWS 🚨
BCCI set to release 14,000 tickets for India v. Pakistan League Match on October 14, 2023.
Details 🔽 #CWC23 https://t.co/p1PYMi8RpZ
— BCCI (@BCCI) October 7, 2023
पाकिस्तान टीम | बाबर आझम (कॅप्टन), शादाब खान, फखर जमान, इमाम उल हक, अब्दुल्ला शफीक, मोहम्मद रिझवान, सौद शकील, इफ्तिखार अहमद, सलमान अली आगा, मोहम्मद नवाज, उसामा मीर, हरिस रौफ, हसन अली, शाहीन आफ्रिदी आणि मोहम्मद वसीम.
वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), हार्दिक पांड्या (उपकर्णधार ), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन आणि सूर्यकुमार यादव.