WC 2023 IND vs PAK | वर्ल्ड कपमधील भारत-पाक महामुकाबला रद्द?

India vs Pakistan World Cup 2023 | टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत 15 ऑक्टोबर रोजी सामना खेळवण्यात येणार आहे.

WC 2023 IND vs PAK | वर्ल्ड कपमधील भारत-पाक महामुकाबला रद्द?
वर्ल्ड कप 2023 मध्ये भारत आणि पाकिस्तानचा सामना 15 ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये होणार आहे. वर्ल्ड कपमध्ये आठव्यांदा भारत-पाक एकमेकांना भिडणार आहेत. अवघ्या क्रिकेट जगताचं लक्ष या सामन्याकडे लागलेलं आहे. या सामन्याआधी पाकिस्तान संघाचा अष्टपैलू खेळाडू शादाब खान याने केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे.
Follow us
| Updated on: Jun 28, 2023 | 11:42 PM

मुंबई | भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांमधील राजकीय संबंध फार ताणले गेलेले आहेत. मात्र त्यानंतरही दोन्ही देशांमधील किंबहुना क्रिकेट विश्वाला टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामन्याची प्रतिक्षा असते. गेल्या काही वर्षांपासून या दोन्ही संघांमध्ये क्रिकेट सामने खेळवण्यात येत नाही. दोन्ही संघ फक्त आयसीसी स्पर्धेत आणि आशिया कप स्पर्धेतच एकमेकांविरुद्ध खेळतात. त्यामुळे या दोन्हीच स्पर्धेच क्रिकेट चाहत्यांना काय तो हायव्होल्टेज सामन्याचा थरार अनुभवता येतो. आता आयसीसीने ऑक्टोबर 2023 मध्ये होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेचं वेळापत्रक जाही केलंय.

या स्पर्धेत टीम इंडिया-पाकिस्तान यांच्यात लढत होणार आहे. वेळापत्रकानुसार या दोन्ही संघांमध्ये 15 ऑक्टोबर रोजी कडवी झुंज पाहायला मिळणार आहे. या सामन्याचं आयोजन हे अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. मात्र त्याआधी क्रिकेट चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. भारत विरुद्ध पाक हा बहुप्रतिक्षित सामान सामना रद्द होऊ शकतो. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे.

सामना रद्द होण्याचं कारण काय?

वर्ल्ड कप स्पर्धेचं आयोजन हे यंदा भारतात करण्यात आलंय. आता भारताचा आणि पाकिस्तानचा 36 चा आकडा आहे. पाकिस्तानने आधीच या वर्ल्ड कपमधील सामन्यांवरून हरकती घेतल्या आहेत. त्यानंतर अजूनही पाकिस्तान सरकारने क्रिकेट टीमला भारतात वर्ल्ड कप स्पर्धेत खेळण्यासाठी परवानगी दिलेली नाही. अजूनही पाकिस्तान सरकारच्या एनओसीची प्रतिक्षा आहे.

हे सुद्धा वाचा

त्यामुळे पाकिस्तानला सरकारकडून वर्ल्ड कपमध्ये खेळण्याबाबत ग्रीन सिग्नल मिळाला तर काहीच प्रश्न नाही. मात्र जर सरकारने पाकिस्तानला भारतात खेळण्यास नकार दिल्यास क्रिकेट चाहत्यांचा हिरमोड होईल. आता पाकिस्तान स्पर्धेत सहभागी झाला नाही, तर भारत पाक सामना कुठून होणार? त्यामुळे आता पाकिस्तान सरकारच्या परवानगीवर सर्व काही अवलंबून आहे.

भारत-पाक सामन्यातून मोठ्या प्रमाणात विविध माध्यमातून उत्पन्न मिळतं. तिकीट विक्री आणि अन्य माध्यमातून कोटींची उलाढाल होते. त्यामुळे हा सामना आर्थिकरित्याही महत्वाचा आहे. आता या सामन्याचं आणि पाकिस्तान क्रिकेट टीमचं भवितव्य हे त्यांच्या सरकराच्या हातात आहे. त्यामुळे सरकार आपल्या क्रिकेट टीमबाबत काय निर्णय घेतं, याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे.

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.