IND vs AFG : ‘मला माहित होतं की…’; शतकवीर कॅप्टन रोहित शर्मा याचं सामन्यानंतर मोठं वक्तव्य!

Rohit Sharma vs Afganistan : कॅप्टन रोहित शर्मा याच्या वादळासमोर अफगाणिस्तानचा संघ चारीमुंड्या चीत झालेला पाहायला मिळाला. या सामन्यातील शतकवीर रोहित शर्मा याने सामन्यानंतर बोलताना शतकाआधी एक गोष्ट माहित असल्याचं सांगितलं.

IND vs AFG : 'मला माहित होतं की...'; शतकवीर कॅप्टन रोहित शर्मा याचं सामन्यानंतर मोठं वक्तव्य!
Follow us
| Updated on: Oct 12, 2023 | 8:58 AM

मुंबई : वर्ल्ड कप 2023 मधील भारताने आपल्या दुसरा सामन्यामध्ये अफगाणिस्तान संघावर 8 विकेट्स मिळवला. या विजयासह भारतीय संघाने वर्ल्ड कपमधील सलग दुसरा विजय मिळवला आहे. कर्णधार रोहित शर्माच्या वादळी शतकाने अफगाणिस्तान नेस्तनाबूत झालं. अफगाणिस्तानच्या 273 धावांचा पाठलाग करताना रोहित शर्मा 131 धावा आणि विराट कोहलीच्या नाबाद 55 धावांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने सहज विजय मिळवला. सामन्यानंतर बोलताना रोहित शर्मा याने आपली प्रतिक्रिया देताना मी माझा नैसर्गिक खेळ केल्याचं सांगितलं.

नेमकं काय म्हणाला रोहित?

मी माझा नैसर्गिक खेळ केला आणि खेळपट्टीसुद्धा फलंदाजीसाठी अनुकूल होती. मला माहित होतं की एकदा जम बसला की विकेट आणखी सोपं होणार आहे. वर्ल्ड कपमध्ये शतक ही वेगळंच सुख आहे, वर्ल्ड कपमधील 7 शतकांबाबत जा्स्त विचार करून मी माझा फोकस हलवणार नाही. याआधीही अशा खेळी केल्या आहेत आणि मला अशाच पद्धतीने फलंदाजी करायला आवडतं. मात्र यामध्ये मी काहीवेळा यशस्वी तर काहीवेळा अपयश येतं. अशी पद्धतीची खेळी करणं गरजेचं आहे कारण विरोधी संघाचे गोलंदाज दहशतीत राहत असल्याचं रोहित शर्मा म्हणाला.

अफगाणिस्तान संघाने दिलेल्या 273 धावांचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि इशान किशन मैदानात उतरले होते. रोहितने सुरूवातीपासूनच टॉप गिअरमध्ये फलंदाजी करायला सुरूवात केली. अफगाणिस्तानच्या गोलंदाजांना विकेट सोडाच पण एकालाही त्याने सुट्टी दिली नाही. रोहितने अवघ्या 84 बॉलमध्ये 131 धावा केल्या, यामध्ये त्याने 16 चौकार आणि 5 षटकार मारले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सिक्स मारण्याचा विक्रम आपल्या नावावर केलाय.

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (C), ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (W), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

अफगाणिस्तान प्लेईंग ईलेव्हन | हशमतुल्लाह शाहीदी (C), रहमानउल्ला गुरबाज (W), इब्राहिम झद्रान, रहमत शाह, नजीबुल्ला झद्रान, मोहम्मद नबी, अजमातुल्ला उमरझाई, राशीद खान, मुजीब उर रहमान, नवीन-उल-हक आणि फजलहक फारुकी.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.