ind vs pak : भारत-पाक मॅचमध्ये हे 5 खेळाडू ठरणार गेमचेंझर, पाकिस्तानच्या हुकमी एक्क्याचा समावेश!

भारतीय संघाचे शिलेदार सहजासहज काही पाकिस्तान संघाला विजय मिळवून देणार नाहीत. भारतामध्ये सामना असल्याने टीम इंडियाचं पारडं मानलं जात आहे. दोन्ही संघामध्ये पाच मॅचविनर खेळाडू आहेत जे एकट्याच्या दमावर सामना पालटवू शकतात.

ind vs pak : भारत-पाक मॅचमध्ये हे 5 खेळाडू ठरणार गेमचेंझर, पाकिस्तानच्या हुकमी एक्क्याचा समावेश!
Follow us
| Updated on: Oct 14, 2023 | 1:26 PM

मुंबई : भारत आणि पाकिस्तामधील सामन्याला (IND vs PAK World Cup 2023) काही तासांचा अवधी बाकी आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये हा सामना पार पडला जाणार आहे. भारतीय संघ आतापर्यंत वर्ल्ड कपमध्ये एकदाही पाकिस्तान संघाकडून पराभूत झालेला नाही. आजच्या सामन्यात कर्णधार बाबर आझम याला इतिहास रचण्याची मोठी संधी आहे. मात्र भारतीय संघाचे शिलेदार सहजासहज काही त्यांना विजय मिळवून देणार नाहीत. भारतामध्ये सामना असल्याने टीम इंडियाचं पारडं मानलं जात आहे. दोन्ही संघामध्ये पाच मॅचविनर खेळाडू आहेत जे एकट्याच्या दमावर सामना पालटवू शकतात.

कोण आहेत ते खेळाडू?

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने मागील सामन्यामध्ये शतक करत सर्वच संघांना इशारा दिला आहे. वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक शतके करण्याच्या यादीमध्ये रोहित पहिल्या क्रमांकावर आहे. 2019 मध्ये पाकिस्तानविरूद्ध 140 धावांची खेळी केली होती. आजच्या सामन्यामध्ये रोहित गेमचेंझर ठरवू शकतो.

पाकिस्तानविरूद्ध स्टार खेळाडू विराट कोहली कायम मोठी खेळी करतो. आताच झालेल्या आशिया कपमध्ये विराटने पाकिस्तानविरूद्ध शतक केलं होतं. वन डे क्रिकेटमध्ये विराट पाकिस्तानविरुद्धचा रेकॉर्ड चांगला आहे. तो गेम चेंजर ठरू शकतो.

भारताचा फिरकीपटू कुलदीप यादवकडेही सर्वांच्या नजरा असणार आहेत. भारतासाठी 92 एकदिवसीय सामन्यांमध्ये 150 हून अधिक बळी घेतले आहेत. 2023 च्या वर्ल्ड कपवर नजर टाकली तर त्याने आतापर्यंत 2 मॅचमध्ये 3 विकेट घेतल्या आहेत.

पाकिस्तान संघाचा फलंदाज मोहम्मद रिझवानची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. पाकिस्तान संघासाठी कायम संकटमोचक ठरणार रिझवान गेमचेंझरच्या भूमिकेत असू शकतो. श्रीलंकेविरूद्ध शतर करत त्याने संघाला सामना जिंकून दिला होता.

पाचवा खेळाडू शाहिन आफ्रिदी याच्यावरही सर्वांचं लक्ष असणार आहे. शाहिनने सुरूवातीच्या विकेट्स घेतल्या तर भारतीय संघाच्या अडचणीत वाढ होऊ शकते. याआधी त्याने अनेकदा आपल्या घातक स्पेलने भारताला बॅकफूटवर ढकललं आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.