World Cup 2023 : पाकिस्तान टीम वर्ल्ड कप सोडून गेली तरी भारताकडून ही सुविधा नाहीच मिळणार!
पाकिस्तान संघाला भारताकडून एक सुविधा जी मिळणार नाही, त्यासाठी पाकिस्तान संघ वर्ल्ड कप सोडून गेला तरी काही फरक पडणार नाही. अशी कोणाती सुविधा आहे जी पूर्ण करण्यासाठी भारताने नकार दिला आहे
मुंबई : आयसीसी वर्ल्ड कप 2023 ला सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस बाकी आहेत. वर्ल्ड कप साठी सर्व संघ भारतामध्ये दाखल झाले असून आता सराव सामनेही सुरू झाले आहेत. 5 ऑक्टोबर पासून वर्ल्ड कपच्या थरारला सुरुवात होणार आहे. बीसीसीआयनेही वर्ल्ड कप साठी जंगी तयारी केली असून सर्व खेळाडूंच्या राहण्याची आणि खाण्याची एकदम उत्तम व्यवस्था केली आहे. मात्र पाकिस्तान संघाला भारताकडून एक सुविधा जी मिळणार नाही, त्यासाठी पाकिस्तान संघ वर्ल्ड कप सोडून गेला तरी काही फरक पडणार नाही. अशी कोणाती सुविधा आहे जी पूर्ण करण्यासाठी भारताने नकार दिला आहे.
बीसीसीआयकडून ही गोष्ट नाही दिली जाणार
बीसीसीआय हे सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड असून यंदाच्या वर्ल्ड कपचं यजमानपद भारताकडे आहे. सर्व देशांची उत्तम व्यवस्था केली आहे. मात्र फक्त पाकिस्तानच नाहीतर सहभागी असलेल्या सर्वच खेळाडूंना एक गोष्ट दिली जाणार नाही. भारतामध्ये आलेल्या खेळाडूंना गोमांस (बीफ) दिलं जाणार नाही. पाकिस्तान संघ हैदराबादमध्ये दाखल झाला होता त्यावेळी त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं होतं. पाकिस्तान संघाच्या खेळाडूंना मांसाहार जेवणात मटण, चिकन आणि मासे दिलं गेलं होतं.
पाकिस्तानच्या खेळाडूंनाच नाहीतर कोणत्याच परदेशी खेळाडूंना जेवणात गोमांस दिलं जाणार नसल्याची प्राथमिक माहिती समजत आहे. भारतामध्ये गोमांस विक्रीवर अनेकदा बंदी घालण्यात आली आहे. सर्व खेळाडूंच्या राहण्याची व्यवस्था पंचतारांकित हॉटेलमध्ये केली गेलीये. 5 ऑक्टोबरपासून वर्ल्ड कपच्या थराराला सुरूवात होणार आहे.
दरम्यान, वर्ल्ड कपचा पहिला सामना न्यूझीलंड आणि इंग्लंड या दोन संघांमध्ये होणार आहे. भारताच्या मिशन वर्ल्ड कपला 8 ऑक्टोबरपासून सुरूवात होणार असून ऑस्ट्रेलियाविरूद्ध पहिला सामना होणार आहे. भारत-पाक हाय व्होल्टेज सामना 14 ऑक्टोबरला होणार आहे.
भारताचा वर्ल्ड कपसाठी संघ
भारत: रोहित शर्मा (C), हार्दिक पंड्या (VC), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन, सूर्यकुमार यादव.