IND vs NZ : टीम इंडियाला सेमी फायनलआधी बसणार मोठा झटका, स्टार बॉलर बाहेर?

IND vs NZ : भारतासाठी सेमी फायनल सामना महत्त्वाचा आहे, कारण नॉक आऊट सामन्यात भारतीय संघाचा रेकॉर्ड न्यूझीलंडविरूद्ध इतका काही खास नाही. अशात आणखी दुष्काळात तेरावा म्हणजे भारताच्या स्टार बॉलरबाबत मोठी माहिती समजत आहे.

IND vs NZ : टीम इंडियाला सेमी फायनलआधी बसणार मोठा झटका, स्टार बॉलर बाहेर?
Follow us
| Updated on: Nov 15, 2023 | 3:55 AM

मुंबई : वर्ल्ड कप 2023 मधील पहिला सेमी फायनल सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात उद्या म्हणजेच बुधवारी 15 नोव्हेंबरला पार पडणार आहे. या सामन्यात न्यूझीलंड संघाचा पराभव करत भारतीय संघाचे शिलेदार 2019 चा बदला घेण्याच्या तयारीमध्ये असतील. या सामन्याआधी टीम इंडियालाच मोठा झटका बसणार असल्याचं दिसत आहे. कारण भारताच्या वेगवान गोलंदाजांमधील स्टार गोलंदाज या सामन्याला मुकणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे भारतीय संघाचं टेन्शन वाढलं आहे.

कोण आहे तो खेळाडू?

हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून भारताच्या वेगवान  गोलंदाजांच्या त्रिमूर्तींमधीलच एक आहे. नेदरलंँडविरूद्धच्या सामन्यात मोहम्मद सिराज याला झेल घेताना मोठी दुखापत झालेली. त्यावेळी त्याला चालू सामन्यात मैदान सोडून बाहेर बसावं लागलं होतं. काही वेळाने तो परतला होता मात्र बुधवारी होणाऱ्या सामन्यामध्ये त्याच्या खेळण्याबाबत साशंकता निर्माण केली जात आहे.

मोहम्मद सिराज याला दर दुखापतीमुळे बाहेर बसावं लागलं तर एका स्टार खेळाडूची संघात एन्ट्री होणार आहे. तो स्टार खेळाडू म्हणजे आर. अश्विन असल्याची चर्चा क्रीडा वर्तुळात होताना दिसत आहे. जर तीन वेगवान गोलंदाज खेळवायचे झाल्यास टीम मॅनेजमेंटसमोर प्रसिद्ध कृष्णा हासुद्धा एक पर्याय उपलब्ध असणार आहे. अनुभव पाहता अश्विनला संधी द्यावी तर संघात तीन स्पिनर आणि दोन वेगवान गोलंदाज राहतील. त्यामुळे नक्की काही सांगता येत नाही.

वर्ल्ड कप साठी टीम इंडियाचा संघ: रोहित शर्मा (C), विराट कोहली, जसप्रीत बुमराह, शुभमन गिल, केएल राहुल, प्रसिद्ध कृष्णा , श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, इशान किशन, सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव, मोहम्मद . सिराज, मो. शमी, अक्षर पटेल आणि शार्दुल ठाकूर.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.