World Cup 2023, Semi Final : उपांत्य फेरी गाठणं पाकिस्तानला शक्य आहे का? जाणून घ्या किचकट गणित
वनडे वर्ल्डकप स्पर्धा सुरु होण्यापूर्वी पाकिस्तानला उपांत्य फेरीसाठी पसंती मिळाली होती. दिग्गज खेळाडूंनी या संघाला उपांत्य फेरीसाठी दावेदार मानलं होतं. गोलंदाजी प्रभावी असल्याचं प्रमुख कारण दिलं जात होतं. पण पाकिस्तान स्पर्धेतील कामगिरी एकदम सुमार राहिली.
मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील उपांत्य फेरीचं चित्र स्पष्ट झालं आहे. भारत, दक्षिण अफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांचं उपांत्य फेरीतील स्थान निश्चित झालं आहे. अजूनही न्यूझीलंडला ग्रीन सिग्नल मिळालेला नाही. पण पाकिस्तान उपांत्य फेरी गाठेल असं चित्र नाही. उपांत्य फेरी गाठण्यासाठी पाकिस्तानला इंग्लंड विरुद्धचा सामना जिंकावा तर लागेलच. पण नेट रनरेट सुधारण्यासाठी चमत्कारी कामगिरी करावी लागेल. न्यूझीलंडचा संघ 10 गुण आणि नेट रनरेटसह चौथ्या स्थानावर आहे. पाकिस्तान पुढचा सामना जिंकून 10 गुण तर मिळवेल. पण नेट रनरेट गाठणं खूपच कठीण आहे. पण पाकिस्तानने सामना गमवला तर न्यूझीलंडचं स्थान निश्चित होईल. त्यामुळे उपांत्य फेरीत भारत विरुद्ध न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण अफ्रिका सामना पाहायला मिळेल.
उपांत्य फेरीसाठी पाकिस्तानचं समीकरण
न्यूझीलंडने श्रीलंकेचा 5 गडी राखून पराभूत केलं आहे. त्यामुळे पाकिस्तानचं उपांत्य फेरीचं स्वप्न भंगलं आहे. कारण पाकिस्तानला मोठ्या चमत्काराची गरज आहे. असा चमत्कार क्रिकेट इतिहासात कधीच झाला नाही. त्यात पाकिस्तानसमोर दिग्गज इंग्लंडचा संघ आहे. त्यामुळे 287 धावांच्या फरकाने इंग्लंडला पराभूत करणं अशक्यप्राय आहे. पाकिस्तानला 400 धावा करून इंग्लंडला 112 धावांवर ऑलआऊट करावं लागेल. त्यामुळे पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड सामना केवळ औपचारिकच असेल. दुसरीकडे इंग्लंडने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजी स्वीकारली तर मग न्यूझीलंडने स्थान पक्कं होईल. कारण 284 चेंडू राखून दिलेलं आव्हान गाठणं खूपच कठीण आहे.
इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात साखळी फेरीतील शेवटचा सामना 11 नोव्हेंबरला होणार आहे. पाकिस्तानचं गणित कठीण असलं तरी हा सामना इंग्लंडसाठी महत्त्वाचा आहे. कारण या सामन्यातील विजय चॅम्पियन ट्रॉफी 2025 मधील स्थान ठरणार आहे. त्यामुळे टॉप 8 मध्ये राहण्याचं आव्हान असणार आहे. तर ही स्पर्धा पाकिस्तानाच होणार असल्याने पाकिस्तानला थेट एन्ट्री मिळाली आहे.
पाकिस्तानचा संघ
अब्दुल्ला शफिक, बाबर आझम (कर्णधार), फखर झमान, इमाम उल हक, सौद शकील, सलमान अली अघा, इफ्तिखार अहमद, मोहम्मद नवाज, शादाब खान, मोहम्मद हरिस, मोहम्मद रिझवान, अबरार अहमद, हरिस रौफ, हसन अली, मोहम्मद वसिम ज्यु., शाहीन अफ्रिदी, उसामा मिर, झमान खान.