WC 2023 IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरूद्ध मोहम्मद शमीला बसवणं ठरणार मोठी चूक, एकदा रेकॉर्ड पाहाच!
भारतीय संघाच्या टीम मॅनेजमेंटने अंतिम 11 मध्ये मोहम्मद शमीला स्थान दिलं नव्हतं. त्याच्या जागी मोहम्मद सिराज याला जागा दिली होती. मात्र वन डे क्रिकेटमधील रेकॉर्ड पाहता यंदाच्या वर्ल्डकपमधील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाविरूद्ध शमीला बसवण्याचा निर्णय धोकादायक ठरू शकतो.
मुंबई : वर्ल्ड कप 2023 मध्ये भारतीय संघाचा सामना ऑस्ट्रेलियाबत होणार आहे. भारताने वर्ल्डकप साठी जो संघ जाहीर केला असून त्यामध्ये मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह यांच्याकडे वेगवान गोलंदाजीची धुरा आहे. मात्र आताच पार पडलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेमध्ये भारतीय संघाच्या टीम मॅनेजमेंटने अंतिम 11 मध्ये मोहम्मद शमीला स्थान दिलं नव्हतं. त्याच्या जागी मोहम्मद सिराज याला जागा दिली होती. मात्र वन डे क्रिकेटमधील रेकॉर्ड पाहता यंदाच्या वर्ल्डकपमधील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाविरूद्ध शमीला बसवण्याचा निर्णय धोकादायक ठरू शकतो.
मोहम्मद शमीचा रेकॉर्ड
मोहम्मद शमीची वनडे मधील कामगिरी पाहता शमीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध दमदार उत्कृष्ट गोलंदाजी केली आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या भारतीय खेळाडूंमध्ये शमी आताच्या संघातील एकमेव खेळाडू आहे.
मोहम्मद शमीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 37 बळी घेतले असून सर्वाधिक विकेट घेण्याच्या यादीमध्ये तो दुसऱ्या स्थानावर आहे. आपण ही यादी पाहिली तर आता वर्ल्ड कप साठी निवड झालेल्या संघामधील शमी हा एकमेव खेळाडू आहे जो टॉप 5 गोलंदाजांपैकी एक आहे. त्यामुळे शमीचा रेकॉर्ड पाहता शमीला जर खाली बसवलं तर भारतीय संघासाठी हा निर्यण घातक ठरू शकतो.
वनडे क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक विकेट घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये कपिल देव पहिल्या स्थानी असून त्यांनी 45 विकेट घेतल्या आहेत. दुसऱ्या क्रमांकावर मोहम्मद शमी असून त्याने 37 विकेट्स त्यानंतर अजित आगरकर ने 36 विकेट तर चौथ्या स्थानी श्रीनाथने 33 विकेट्स तर पाचव्या क्रमांकावर हरभजन सिंग असून त्याने 32 विकेट्स घेतल्या आहेत.
ऑस्ट्रेलिया : पॅट कमिन्स (C), स्टीव्ह स्मिथ, अॅलेक्स कॅरी, जोश इंग्लिस, शॉन अॅबॉट, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, मार्नस लॅबुशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झाम्पा, मिचेल स्टार्क
भारत: रोहित शर्मा (C), हार्दिक पंड्या (VC), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन, सूर्यकुमार यादव