BAN vs NED : वर्ल्डकपमध्ये नेदरलँड संघाची भारी कामगिरी, बांगलादेशला 87 धावांनी केलं पराभूत

World Cup 2023, BAN vs NED : वर्ल्डकप स्पर्धेतील 28 वा सामना नेदरलँड आणि बांगलादेश यांच्यात रंगला. हा सामना नेदरलँडने 87 धावांनी जिंकला. बांगलादेशला 230 धावांचं आव्हान गाठता आलं नाही.

BAN vs NED : वर्ल्डकपमध्ये नेदरलँड संघाची भारी कामगिरी, बांगलादेशला 87 धावांनी केलं पराभूत
BAN vs NED : बांगलादेशला नेदरलँडनं पाजलं पराभवाचं पाणी, 230 धावांचं आव्हान गाठता आलं नाहीImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Oct 28, 2023 | 9:39 PM

मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत नेदरलँड विरुद्ध बांगलादेश यांच्यात सामना रंगला. नेदरलँडने 50 षटकात सर्व गडी गमवून 229 धावा केल्या. नेदरलँडने बांगलादेशसमोर विजयासाठी 230 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र बांगलादेशला 42.2 षटकात 142 धावा करता आल्या. नेदरलँडने बांगलादेशचा 87 धावांनी पराभूत केलं. बांगलादेशकडून मेहिदी हसन याने सर्वाधिक धावा केल्या. या व्यतिरिक्त एकही फलंदाज चांगली कामगिरी करू शकला नाही. नेदरलँडने दक्षिण आफ्रिकेनंतर बांगलादेशला पराभूत करत स्पर्धेत दुसरा सामना जिंकला आहे. दुसरीकडे बांगलादेशचं या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. आता फक्त तीन सामने उरले असून फक्त औपचारिकता राहिली आहे.

नेदरलँडचा डाव

नेदरलँडची सुरुवात अडखळत झाली विक्रमजीत सिंग आणि मॅक्स ओडाऊड स्वस्तात बाद झाले. तर वीस्ले बरेसी आणि स्कॉट अकरमॅन याने डाव सावरला. बरेसीने 41 चेंडूत 41 धावा केल्या. तर सायब्रँड इन्जेलब्रेच याने 35 धावा करत संघाच्या धावसंख्येत भर घातली. बांगलादेशकडून शोरिफुल इस्लाम, तस्किन अहमद, मुस्तफिझुर रहमान, महेदी हसन यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. तर शाकीब अल हसन याने एक गडी बाद केला.

बांगलादेशचा डाव

नेदरलँडने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना बांगलादेशचा डाव घसरला. एकही फलंदाज साजेशी कामगिरी करू शकला नाही. बांगलादेशचा निम्मा संघ एकेरी धावा करून बाद झाला. मेहदी हसन याने सर्वाधिक 35 धावा केल्या. नेदरलँडकडून पॉल व्हॅन मीकरेन याने 4 गडी बाद केले. तर बास डी लीडे याने 2. आर्यन दत्त 1, लोगान व्हॅन बीक 1 आणि कोलिन अकरमॅन याने 1 गडी बाद केला.

दोन्ही संघांचे खेळाडू

बांगलादेश (प्लेइंग इलेव्हन): तनझिद हसन, लिटन दास, नजमुल हुसेन शांतो, शकीब अल हसन (कर्णधार), मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), महमुदुल्ला, मेहदी हसन मिराझ, महेदी हसन, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान, शोरीफुल इस्लाम.

नेदरलँड्स (प्लेइंग इलेव्हन): विक्रमजीत सिंग, मॅक्स ओडाऊड, वेस्ली बरेसी, कॉलिन अकरमन, स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार/विकेटकीपर), बास डी लीडे, सायब्रँड एंजेलब्रेक्ट, लोगन व्हॅन बीक, शरीझ अहमद, आर्यन दत्त, पॉल व्हॅन मीकरेन.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.