NZ vs NED : नेदरलँडचा न्यूझीलंडवर पहिल्या तीन षटकात दबाव, मग कॉनव्हे आणि यंगने केलं असं की…
NZ vs NED, World Cup 2023 : वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील 6वा सामना न्यूझीलंड आणि नेदरलँड यांच्यात सुरु आहे. न्यूझीलंडचा संघ सध्या फॉर्मात असून पहिल्याच सामन्यात झलक दाखवून दिली आहे. गुणतालिकेत टॉपला असून नेदरलँड विरुद्ध सामना सुरु आहे.
मुंबई : नेदरलँड आणि न्यूझीलंड यांच्यात वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील सहावा सामना खेळला जात आहे. या सामन्यात नेदरलँडने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजी स्वीकारली. तसेच पहिल्या तीन षटकात न्यूझीलंडवर जबरदस्त दबाव आणला. पहिली तीन षटकं निर्धाव टाकली. त्यामुळे आघाडी आलेले डेविड कॉनव्हे आणि विलियम यंग अस्वस्थ झाले. मात्र चौथ्या षटकापासून या जोडीने आक्रमक खेळीडचं प्रदर्शन केलं. पण नेदरलँडची खेळी पाहून क्रीडाप्रेमींनी कौतुक केलं आहे. आतापर्यंत या स्पर्धेत लिंबूटिंबू समजल्या जाणाऱ्या नेदलँडने प्रतिस्पर्धी संघांना चांगलंच झुंजवल्याचं दिसलं आहे. पहिल्या सामन्यात नेदरलँडने पाकिस्तानशी सामना केला होता. हा सामना नेदरलँडने सहजासहजी सोडला नाही.
नेदरलँडकडून पहिलं षटक आर्यन दत्त याने टाकलं. स्ट्राईकला डेवॉन कॉनव्हे होता. त्याला एकही धाव घेता आली नाही. त्यामुळे पहिलं षटक निर्धाव गेलं. त्यानंतर विल यंग स्ट्राईकला असताना राय क्लेन याने षटक टाकलं आणि त्यालाही धाव घेण्यात अपयश आलं. तिसरं षटक पुन्हा एकदा आर्यन दत्त याने टाकलं आणि डेवॉन कॉनव्हेला धाव घेण्यास अपयश आलं. नेदलँडने तीन षटक टाकली आणि न्यूझीलंडला एकही धावही घेता आली नाही.
चौथ्या षटकापासून संघावर आलेलं दडपण दूर करण्यासाठी विल यंगने पुढाकार घेतला आणि पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकला. त्यानंतर पाचव्या चेंडूवर पुन्हा एकदा चौकार मारला. त्यानंतर दोघांनी आक्रमक खेळी आणि पहिल्या गड्यासाठी 8 षटकात अर्धशतकी भागीदारी केली. पाच षटकात 50 धावा काढल्या.
दोन्ही संघांचे खेळाडू
न्यूझीलंड प्लेईंग ईलेव्हन | डेव्होन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डेरिल मिचेल, टॉम लॅथम (कॅप्टन आणि विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमॅन, मिचेल सेंटनर, मॅट हेनरी, लॉकी फर्ग्यूसन आणि ट्रेन्ट बोल्ट.
नेदरलँड्स प्लेईंग ईलेव्हन | स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार आणि विकेटकीपर), विक्रमजीत सिंह, मॅक्स ओ’डॉउड, कॉलिन एकरमॅन, बास डी लीडे, तेजा निदामानुरु, सायब्रँड एंगेलब्रेक्ट, रूलोफ वॅन डेर मेरवे, रयान क्लेन, आर्यन दत्त आणि पॉल वॅन मीकेरेन.