World Cup 2023 : 2019 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियासाठी खलनायक ठरलेल्या संघातील ‘हा’ मॅचविनर खेळाडू परतला

2019 साली टीम इंडियाला न्यूझीलंड संघाने सेमी फायनलमध्ये पराभूत केलं होतं. 130 कोटी जनतेच्या मनात हा पराभव घर करून राहिला आहे. अशातच न्यूझीलंड संघाचा खेळाडू केन विलियमसन हा नेटमध्ये सराव करताना दिसत आहे. 

World Cup 2023 : 2019 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियासाठी खलनायक ठरलेल्या संघातील 'हा' मॅचविनर खेळाडू परतला
Image Credit source: AFP
Follow us
| Updated on: Aug 01, 2023 | 5:39 PM

मुंबई : यंदाच्या वर्ल्ड कप 2023 ला काही दिवस बाकी असून सर्व संघ तयारीला लागलेले दिसत आहेत. टीम इंडियाचा संघ नवनवीन प्रयोग करताना दिसत आहे. मात्र त्यांना हवं तसं यश अजून काही आलं नाही पण टीम मॅनेजमेंटने आपली पूर्ण तयारी करताना दिसत आहे. अशातच टीम इंडियासाठी वाईट बातमी समोर आली आहे.  2019 साली टीम इंडियाला न्यूझीलंड संघाने सेमी फायनलमध्ये पराभूत केलं होतं. 130 कोटी जनतेच्या मनात हा पराभव घर करून राहिला आहे. अशातच न्यूझीलंड संघाचा खेळाडू केन विलियमसन हा नेटमध्ये सराव करताना दिसत आहे.

केन विलियमसनने सराव करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. आयपीएलमधील पहिल्याच सामन्यात केनला दुखापत झाली होती त्यानंतर तो स्पर्धेतून बाहेर पडला होता. चेन्नई सुपर किंग्जविरूद्धच्या सामन्यामध्ये त्याला फिल्डिंग करताना पायाला लागलं होतं. केनला त्या सामन्यातून सहकारी खेळाडूंनी बाहेर नेलं होतं. इतकी गंभीर दुखापत त्याच्या पायाला झालेली होती.

केनेने आता जो व्हिडीओ शेअर केला आहे त्यामध्ये दर्जेदार फलंदाजी करताना दिसत आहे. केनचे चाहते त्याला सराव करताना पाहून आनंदी झाले आहेत. संपूर्ण आयपीएल स्पर्धा पार पडल्यावरही तो माघारी परतला नव्हता. वर्ल्ड कप 2023 साठी केन नेटमध्ये घाम गाळताना दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by Kane Williamson (@kane_s_w)

दरम्यान, 5 ऑक्टोबर सुरुवात, 19 नोव्हेंबर फायनल, पहिला आणि फायनल सामना नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये, एकूण 10 शहरांमधील स्टेडियममध्ये आयोजन, टीम इंडियाच्या वर्ल्ड कप मोहिमेची सुरुवात 8 ऑक्टोबरपासून, पहिला सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडियामध्ये रंगणार आहे. टीम इंडिया प्रबळ दावेदार असून यजमानपद असल्यामुळे संघाला याचा फायदा होऊ शकतो.

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.