World Cup 2023 : ‘गेल्या आठवडाभरापासून आम्हाला…’; पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याचं मोठं वक्तव्य!
IND va PAK Babar Azam : भारतामध्ये आता वर्ल्ड कपचा थरार सुरू होणार आहे. याआधी सर्व कर्णधारांची एक बैठक आय़सीसीने बोलावलेली, यामध्ये पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम याने भारतात आल्यावर कसं वाटलं याबाबत सांगितलं.
मुंबई : वर्ल्ड कप 2023 च्या थराराला आजपासून सुरूवात होणार आहे. वर्ल्ड कपचा पहिला सामना इंग्लंड आणिस न्यूझीलंड यांच्यामध्ये रंगणार आहे. मागील वर्ल्ड कप फायनल याच दोन संघांमध्ये झाली होती. आयसीसीने वर्ल्ड कपआधी अहमदाबादमध्ये सर्व कर्णधारांची बैठक घेतली. या कार्यक्रमामध्ये सर्व दहा संघांचे कर्णधार होते. यातील पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम याने भारतात आल्यावर कसं वाटलं हे बोलताना सर्वांची मनं जिंकलीत. भारतीयांनी अतिथी देव भव: प्रमाणे कट्टर प्रतिस्पर्धी संघाचं स्वागत केलं.
बाबर आझम काय म्हणाला?
गेल्या आठवडाभरापासून आम्ही परदेशात आहोत असं आम्हाला वाटलंच नाही. भारतामध्ये गेल्यावर एकटं पडल्यासारखं होईल असं वाटलं होतं पण आम्हाला भारतातील लोकांनी भरभरून प्रेम दिलं असून आशा आहे यापुढेही असंच प्रेम आम्हाला मिळेल. बाकी हैदराबादची बिर्याणी खूप आवडल्याचं बाबर आझम याने सांगितंल.
रोहित शर्मा काय म्हणाला?
वर्ल्ड कप 2023 मध्ये भारताचं नेतृत्त्व करणं माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आमच्यावर दडपण असणार मात्र संघाला आता त्याची सवय झाली आहे. आम्ही केलेली तयारी वर्ल्ड कपमध्ये आम्हाला फायदेशीर ठरेल. प्रत्येक सामना आमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे. सराव सामने न झाल्याने इतका फरक पडणार नाही, उलट खेळाडूंना आराम करायला वेळ मिळाल्याचं रोहित शर्माने सांगितलं.
यंदाच्या वर्ल्ड करमध्ये 10 संघ असून ही स्पर्धा भारतातील दहा शहरांमधील स्टेडिअमवर होणार आहे. वर्ल्ड कपमध्ये 48 सामने होणार असून चेन्नई, दिल्ली, पुणे, अहमदाबाद, धर्मशाला, पुणे, लखनौ, मुंबई, कोलकाता, बेंगळुरू आणि अहमदाबाद या शहरांमध्ये सामने पार पडले जाणार आहेत. सर्व सामने राऊंड रॉबिन पद्धतीने खेळवले जातील.
दरम्यान, भारतामध्ये वर्ल्ड कप होणार असल्याने भारतीय संघ विजयाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड आणि पाकिस्तान हे तगडे संघसुद्धा या शर्यतीत आहेत. त्यासोबतच नेदरलँड, श्रीलंका, बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका या संघानाही कमी लेखून चालणार नाही.