World Cup 2023, Point Table : उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण अफ्रिका, भारतासमोर कोणाचं आव्हान?

World Cup 2023, Point Table : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने 3 गडी राखून अफगाणिस्तानचा पराभव केला आहे. या विजयासह उपांत्य फेरी गाठणारा ऑस्ट्रेलिया हा तिसरा संघ आहे. आता चौथ्या स्थानासाठी तीन संघात चुरस आहे.

World Cup 2023, Point Table :  उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण अफ्रिका, भारतासमोर कोणाचं आव्हान?
World Cup 2023, Point Table : उपांत्य फेरीत भारताचा सामना कोणाशी? न्यूझीलंड, पाकिस्तान की अफगाणिस्तान? जाणून घ्या
Follow us
| Updated on: Nov 07, 2023 | 10:56 PM

मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. भारत, दक्षिण अफ्रिकेनंतर उपांत्य फेरीत धडक मारणारा ऑस्ट्रेलिया तिसरा संघ आहे. दक्षिण अफ्रिका दुसऱ्या आणि ऑस्ट्रेलिया तिसऱ्या स्थानावर असल्याने भारताचा सामना कोणाशी अशा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे. 1999 वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिका संघ आमनेसामने आले होते. चौथ्या स्थानासाठी आता न्यूझीलंड, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात चुरस असणार आहे.  या तिन्ही संघांचे प्रत्येकी 8 गुण आहेत. त्यामुळे पुढच्या सामन्यात विजयासोबत नेट रनरेट चांगला ठेवण्याचं आव्हान आहे.  त्यामुळे तिन्ही संघ एकमेकांचा पराभव व्हावा यासाठी साकडं घालतील. दुसरीकडे, तिघांनी शेवटचा सामना जिंकला तर मात्र गणित नेट रनरेटवर आधारित असेल.  म्हणजेच एका स्थानासाठी आता तीन संघांमध्ये चुरस असणार आहे.

भारताने साखळी फेरीत 8 सामने जिंकत 16 गुणांसह पहिलं स्थान गाठलं आहे. त्यामुळे आता भारताचं अव्वल स्थान कायम राहणार आहे. तर दक्षिण अफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांचा प्रत्येकी एक सामना शिल्लक आहे. त्यामुळे त्यात भर पडली तर 14 गुण होतील किंवा पराभव झाला तर 12 गुणच राहतील. चौथ्या संघाचे काहीही केलं तर दहाच गुण होतील. त्यामुळे उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण अफ्रिका सामना होईल. तर भारतासमोर न्यूझीलंड, पाकिस्तान किंवा अफगाणिस्ताचं आव्हान असेल.

उपांत्य फेरीचं गणित जाणून घेऊयात

अफगाणिस्तानचा शेवटचा सामना दक्षिण अफ्रिकेशी होणार आहे. त्यामुळे अफगाणिस्तानला पुढे खडतर आव्हान आहे. असं असलं तरी अफगाणिस्तानने मोठे उलटफेर केले आहेत. त्यामुळे दक्षिण अफ्रिकेला पराभूत केलं तर थेट उपांत्य फेरी गाठेल. पण पराभव झाला तर पाकिस्तान आणि न्यूझीलंडचा पराभव महत्त्वाचा ठरेल. त्याचबरोबर नेट रनरेट चांगला ठेवावा लागेल.

न्यूझीलंडने या सामन्यात सुरुवातीला चांगली कामगिरी केली होती. पण त्यानंतर गाडी रुळावरून घसरली आणि सलग 4 सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं. न्यूझीलंडचा शेवटचा सामना श्रीलंकेशी होणार आहे. उपांत्य फेरी गाठण्यासाठी हा सामना जिंकावाच लागेल. पण पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचा पराभव महत्ताचा आहे. दुसरीकडे, विजय मिळवला तरी नेट रनरेटही महत्त्वाचा आहे.

पाकिस्तानही उपांत्य फेरीच्या रेसमध्ये आहे. पाकिस्तानचं गणितही न्यूझीलंडसारखं आहे. 8 गुण असून उपांत्य फेरीसाठी 10 गुण खूप महत्त्वाचे आहेत. 11 नोव्हेंबरला इंग्लंडशी सामना होणार आहे. हा सामना जिंकला तरी न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानचा पराभव होणं महत्त्वाचं आहे. तरच नेट रनरेटच्या गणितात उपांत्य फेरीत स्थान ठरू शकते.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगाणिस्तान

अफगाणिस्तानने 50 षटकात 5 गडी गमवून 291 धावा केल्या होत्या आणि विजयासाठी 292 धावांचं आव्हान दिलं होतं. ऑस्ट्रेलियाची सुरुवात एकदम खराब झाली होती. असं वाटतं होतं की हा सामना ऑस्ट्रेलियाने गमवाल्यातच जमा आहे. ऑस्ट्रेलियाने 91 धावांवर 7 विकेट गमावले होते. पण ग्लेन मॅक्सवेलने द्विशतकी खेळी करत विजयाचा घास तोंडातून हिरावून घेतला.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.