World Cup 2023 Points Table : बांगलादेशनंतर इंग्लंडचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात, भारत सोडून 7 संघांमध्ये उपांत्य फेरीची शर्यत
World Cup 2023 Points Table : वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील उपांत्य फेरीचं गणित आता स्पष्ट होत चाललं आहे. सहाव्या टप्प्यात बांगलादेश आणि इंग्लंड या संघांचा आव्हान संपुष्टात आलं आहे. तर उपांत्य फेरीसाठी भारताचं स्थान निश्चित झालं आहे.
मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत गतविजेत्या इंग्लंड संघाची निराशाजन कामगिरी राहिली आहे. सहा पैकी पाच सामन्यात पराभव झाल्याने स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. बांगलादेश आणि इंग्लंड यांची स्पर्धेत फक्त आता सामन्यांसाठी उपस्थिती आहे. कारण उर्वरित सामन्यात विजय मिळवूनही तसा काही फरक पडणार नाही. भारताचं उपांत्य फेरीत स्थान निश्चित झालं आहे. तर तीन संघांसाठी 7 संघांमध्ये चुरस असणार आहे. सातव्या टप्प्यात हे चित्र स्पष्ट होईल. सध्या भारत, दक्षिण अफ्रिका, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया हे संघ टॉप 4 मध्ये आहेत. तर श्रीलंका, पाकिस्तान, नेदरलँड आणि अफगाणिस्तानचं उपांत्य फेरीचं गणित जर तरवर अवलंबून आहे.
गुणतालिकेचं गणित समजून घ्या
भारतीय संघ सहा पैकी सहा सामने जिंकत 12 गुण आणि +1.405 नेट रनरेटसह पहिल्या स्थानावर आहे. दक्षिण अफ्रिकेचा संघ 6 पैकी 5 सामन्यात विजय मिळवत 10 गुण आणि +2.032 नेट रनरेटसह दुसऱ्या स्थानावर आहे. न्यूझीलंड 8 गुण आणि +1.232 नेट रनरेटसह तिसऱ्या, ऑस्ट्रेलिया 8 गुण आणि +0.970 नेट रनरेटसह चौथ्या स्थानावर आहे. हे टॉप 4 संघ सध्यातरी उपांत्य फेरीसाठी पात्र आहेत. पण काही उलटफेर झाल्यास श्रीलंका, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि नेदरलँडला संधी मिळू शकते.
संघ | सामने | विजय | पराभव | गुण | नेट रनरेट |
---|---|---|---|---|---|
भारत | 7 | 7 | 0 | 14 | +2.102 |
दक्षिण अफ्रिका | 7 | 6 | 1 | 12 | +2.290 |
ऑस्ट्रेलिया | 7 | 5 | 2 | 10 | +0.924 |
न्यूझीलंड | 8 | 4 | 4 | 8 | +0.398 |
पाकिस्तान | 8 | 4 | 4 | 8 | +0.036 |
अफगाणिस्तान | 7 | 4 | 3 | 8 | -0.330 |
श्रीलंका | 7 | 2 | 5 | 4 | -1.162 |
नेदरलँड्स | 7 | 2 | 5 | 4 | -1.398 |
बांगलादेश | 7 | 1 | 6 | 2 | -1.446 |
इंग्लंड | 7 | 1 | 6 | 2 | -1.504 |
श्रीलंकेने 5 पैकी 2 सामन्यात विजय मिळवला आहे. 4 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. अजून चार सामने खेळायचे असून त्यात विजय मिळवल्यास 12 गुण होतील. अफगाणिस्तानच्या बाबतीतही असंच गणित आहे. पाकिस्तान आणि नेदरलँड या संघांचं तसं कठीण आहे. 4 गुण असले तरी तीनच सामने उरले आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त 10 गुण होतील. त्यामुळे एखादा चमत्कारच कामी येऊ शकतो.
बांगलादेश आणि इंग्लंडचा स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. पण एखाद्या संघाचं स्वप्न भंग करू शकतात. बांगलादेशचा पुढील सामना पाकिस्तान, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. तर इंग्लंडचा पुढील सामना ऑस्ट्रेलिया, नेदरलँड आणि पाकिस्तानशी होणार आहे. त्यामुळे हे दोन संघ कोणाचा पत्ता कापतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
उपांत्य फेरीचा सामना 15 नोव्हेंबर आणि 16 नोव्हेंंबरला होणार आहे. गुणतालिकेतील एक नंबरचा संघ चौथ्या क्रमांकाशी, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या लढत उपांत्य फेरीत होणार आहे. अंतिम फेरीचा सामना 19 नोव्हेंबरला होणार आहे.