World Cup 2023 Point Table : दुबळ्या नेदरलँडला हरवलं खरं पण पाकिस्तानला नेट रनरेटमध्ये फटका, कसं ते समजून घ्या
World Cup 2023 Point Table : वनडे वर्ल्डकप स्पर्धा आता हळूहळू पुढे सरकत चालली आहे. रॉबिन राउंड पद्धतीत प्रत्येक संघाला 9 सामने खेळायचे आहेत. त्यामुळे गुणांसह नेट रनरेटही महत्त्वाचा ठरणार आहे.
मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात झाली असून पहिल्या टप्प्यातील सामने सुरु आहेत. पहिल्या टप्प्यात काही संघांना कठीण, तर संघांना सोप्पा पेपर आला आहे. त्यामुळे कठीण संघासोबत दोन गुण आणि सोप्या संघासोबत 2 गुणांसह नेट रनरेट वाढवण्याची संधी आहे. असंच पहिल्या दोन सामन्यात पाहायला मिळालं. न्यूझीलंड आणि इंग्लंड हे दोन्ही तगडे संघ आहेत. त्यामुळे पहिला सामना चुरसीचा होईल अशी अपेक्षा होती. मात्र तसं झालं नाही न्यूझीलंडने एकतर्फी सामना जिंकत स्पर्धा पुढे कशी जाणार आहे याची झलक दाखवली. तर दुसरीकडे पाकिस्तानला जेतेपदाच्या दावेदारापैकी एक मानलं जात आहे. पण नेदरलँडने संपूर्ण संघ बाद करत आणखी मेहनतीचं गरज असल्याचं दाखवलं आहे.
पाकिस्तान विरुद्ध नेदरलँड
नाणेफेकीचा कौल जिंकत नेदरलँडने पाकिस्तानला फलंदाजीचं आमंत्रण दिलं. त्यामुळे पाकिस्तान आरामात 300 पार धावा करेल असा अंदाज होता. मात्र घडलं वेगळंच..पाकिस्तानचे आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाले. इतकंच काय तर मधल्या फळीच्या फलंदाजांना मोठ्या धावांसाठी झगडावं लागलं. पाकिस्तानने 49 षटकात 10 गडी गमवून 286 धावा केल्या आणि विजयासाठी 287 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान गाठताना नेदरलँड 150 च्या बाद होईल असं वाटत होतं. पण झालं भलतंच..नेदरलँडने 41 षटकं खेळत सर्वबाद 205 धावा केल्या.
पाकिस्तानला हा सामना जिंकून दोन गुण मिळाले खरे…पण त्यांच्या नेट रनरेटमध्ये तसा मोठा फरक दिसला नाही. उपांत्य फेरीसाठी शेवटी नेट रनरेटच कामी येणार आहे. समान गुण असले की नेट रनरेटच्या आधारावर उपांत्य फेरीचं गणित ठरतं. त्यामुळे अपेक्षित रनरेट न ठेवल्याने पाकिस्तानी क्रीडाप्रेमींचा हिरमोड झाला आहे.
संघ | सामने | विजय | पराभव | गुण | नेट रनरेट |
---|---|---|---|---|---|
भारत | 7 | 7 | 0 | 14 | +2.102 |
दक्षिण अफ्रिका | 7 | 6 | 1 | 12 | +2.290 |
ऑस्ट्रेलिया | 7 | 5 | 2 | 10 | +0.924 |
न्यूझीलंड | 8 | 4 | 4 | 8 | +0.398 |
पाकिस्तान | 8 | 4 | 4 | 8 | +0.036 |
अफगाणिस्तान | 7 | 4 | 3 | 8 | -0.330 |
श्रीलंका | 7 | 2 | 5 | 4 | -1.162 |
नेदरलँड्स | 7 | 2 | 5 | 4 | -1.398 |
बांगलादेश | 7 | 1 | 6 | 2 | -1.446 |
इंग्लंड | 7 | 1 | 6 | 2 | -1.504 |
गुणतालिकेत न्यूझीलंडचा संघ 2 गुण आणि +2.149 नेट रनरेटसह पहिल्या स्थानावर आहे. तर पाकिस्तानचा संघ 2 गुणांसह +1.620 गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. तर इंग्लंचा संघाला पराभवासह नेट रनरेटचा फटका बसला आणि सर्वात शेवटी आहे. तर नेदरलँडने पाकिस्तानला चांगलंच झुंजवल्याने 9व्या स्थानावर आहे.
दोन्ही संघांचे खेळाडू
पाकिस्तानचा संघ : बाबर आझम (कॅप्टन), इमाम उल हक, फखर जमान, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), सौद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, हसन अली, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ.
नेदरलँडचा संघ: स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार आणि विकेटकीपर), विक्रमजीत सिंग, मॅक्स ओडॉड, कॉलिन अकरमन, बास डी लीडे, तेजा निदामनुरु, साकिब झुल्फिकार, लोगन व्हॅन बीक, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, आर्यन दत्त, पॉल व्हॅन मीकरेन.