World Cup 2023 Points Table : ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तानला दे धक्का, उपांत्य फेरीच्या शर्यतीत घेतली उडी
World Cup 2023, PAK vs AUS : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानला उतरती कळा लागली आहे. सलग दुसरा पराभव स्वीकारावा लागल्याने गुणतालिकेत फटका बसला आहे. तर ऑस्ट्रेलियाने कमबॅक केलं आहे.
मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान सामना पार पडला. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 9 गडी गमवून 367 धावा केल्या आणि विजयासाठी 368 धावांचं आव्हान दिलं. पण पाकिस्तानचा संघ सर्वबाद 305 धावाच करू शकला. ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला 62 धावांनी पराभूत केले. या सामन्याच्या निकालानंतर गुणतालिकेत मोठा फरक पडला आहे. पाकिस्तानला उतरती कळा लागली आहे असंच म्हणावं लागेल. सुरुवातीला नेदरलँड आणि श्रीलंकेला पराभूत केल्याने टॉप 4 मध्ये स्थान मिळवलं होतं. पण भारत ऑस्ट्रेलिया यासारखे संघ समोर आल्याने पितळ उघडं पडत चाललं आहे. अजूनही इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड सारख्या संघांशी लढत होणार आहे. त्यामुळे पाकिस्तानला उपांत्य फेरीत स्थान मिळवण्यासाठी धडपड करावी लागणार आहे.
गुणतालिकेत असा पडला फरक
न्यूझीलंडचा संघ 8 गुण आणि +1.923 नेट रनरेटसह अव्वल स्थानी आहे. तर भारताला नेट रनरेटमध्ये जबर फटका बसला आहे. भारत 8 गुणांसह +1.659 नेट रनरेटसह दुसऱ्या स्थानी आहे. दक्षिण आफ्रिका 4 गुण आणि +1.385 नेट रनरेटसह तिसऱ्या. तर ऑस्ट्रेलिया 4 गुण आणि -0.193 नेट रनरेटसह चौथ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाने सुरुवातीचे दोन सामने गमवल्यानंतर जबरदस्त कमबॅक केलं आहे. आता उपांत्य फेरीच्या शर्यतीत ऑस्ट्रेलिया देखील असणार आहे.
संघ | सामने | विजय | पराभव | गुण | नेट रनरेट |
---|---|---|---|---|---|
भारत | 7 | 7 | 0 | 14 | +2.102 |
दक्षिण अफ्रिका | 7 | 6 | 1 | 12 | +2.290 |
ऑस्ट्रेलिया | 7 | 5 | 2 | 10 | +0.924 |
न्यूझीलंड | 8 | 4 | 4 | 8 | +0.398 |
पाकिस्तान | 8 | 4 | 4 | 8 | +0.036 |
अफगाणिस्तान | 7 | 4 | 3 | 8 | -0.330 |
श्रीलंका | 7 | 2 | 5 | 4 | -1.162 |
नेदरलँड्स | 7 | 2 | 5 | 4 | -1.398 |
बांगलादेश | 7 | 1 | 6 | 2 | -1.446 |
इंग्लंड | 7 | 1 | 6 | 2 | -1.504 |
गुणतालिका पाहता पाकिस्तानला चौथ्या स्थानावरून पाचव्या स्थानावर समाधान मानवं लालं आहे. तसेच नेट रनरेटमध्येही जबरदस्त फटका बसला आहे. 4 सामन्यात दोन विजयामुळे 4 गुण -0.456 नेट रनरेटसह पाकिस्तान पाचव्या स्थानी आहे. उपांत्य फेरी गाठण्यासाठी आता पुढील सर्वच सामने जिंकावे लागणार आहेत. इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात शनिवारी सामना होत आहे. या निकालामुळे गुणतालिकेत अजून बदल होईल. तसेच पाकिस्तानला आणखी फटका बसू शकतो.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, जोश इंग्लिस (विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, अॅडम झाम्पा, जोश हेझलवूड.
पाकिस्तान (प्लेइंग इलेव्हन): अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), सौद शकील, इफ्तिखार अहमद, मोहम्मद नवाज, उसामा मीर, हसन अली, शाहीन आफ्रिदी, हरिस रउफ.